शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रश्न परीक्षा 2025 26 संदर्भात वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्र.१) इयत्ता ११ वी (FYJC) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीकृत ऑनलाईन प्रणाली आहे.
प्र.२) कोण अर्ज करू शकतो?
इयत्ता १० वी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून (MSBSHSE, CBSE, ICSE, IB, IGCSE, NIOS किंवा इतर राज्य मंडळे) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, जे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात.
प्र.३) ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे का?
होय, ऑफलाईन अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
प्र.४) नोंदणी कशी करावी?
यासाठी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर भेट द्या, Student Registration वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि पासवर्ड तयार करा. Login ID तुम्हाला SMS द्वारे मिळेल.
प्र.५) नोंदणी नंतर प्रवेश अर्जात सुधारणा करता येते का?
होय, आपल्या अर्जाच्या पडताळणीपूर्वी Unlock Form पर्याय वापरून किंवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करून आपल्या प्रवेश अर्जात सुधारणा करता येते.
प्र.६) मी किती उच्च माध्यमिक विद्यालयांची पसंती देऊ शकतो?
विद्यार्थी किमान १ व जास्तीत जास्त १० उच्च माध्यमिक विद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवू शकतो.
प्र.७) प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
इयत्ता १० वीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला आणि आवश्यकतेनुसार आरक्षण संदर्भात व विशेष प्रवर्गाची प्रमाणपत्रे (प्रवेश माहितीपुस्तिकेत नमूद केल्यानुसार)
प्र.८) मी इतर मंडळाचा विद्यार्थी आहे, मी काय करू?
आपल्या श्रेणी गुणांचे रुपांतरण गुणांमध्ये करा आणि ते गुण आपल्या अर्जात भरा, आपले इयत्ता १० वीचे हॉलतिकीट व गुणपत्रिका अपलोड करा आणि मार्गदर्शन केंद्रात जाऊन पडताळणी करा. जवळचे केंद्र शोधण्यासाठी पोर्टलवर माहिती पहा.
प्र.९) जर मी इयत्ता १० मध्ये १-२ विषयांमध्ये नापास झालो आहे तर मी इ.११ वी प्रवेशासाठी अर्ज करू शकतो का?
होय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी ATKT (Allowed to Keep Terms) अंतर्गत अर्ज करता येतो.
प्र.१०) कोटा प्रकार कोणते आहेत?
इन-हाऊस कोटा (१०%), व्यवस्थापन कोटा (५%), अल्पसंख्याक कोटा (मायनॉरिटी महाविद्यालयांमध्ये ५०% पर्यंत).
प्र.११) कोटा जागांसाठीही ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे का?
होय, सर्वप्रकारच्या कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे.
प्र.१२) प्रवेशासाठी किती फेऱ्या घेतल्या जातात?
चार नियमित फेऱ्या व त्यानंतर सर्वांसाठी खुली फेरी (Open to All Round).
प्र.१३) जर मी प्रथम पसंतीचे विद्यालय मिळून देखील प्रवेश निश्चित केला नाही तर काय होईल?
जर विद्यार्थ्यास प्रथम पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले तरीही प्रवेश घेतला नाही, तर संबंधित विद्यार्थी पुढील फेरीसाठी अपात्र ठरेल. इतर विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीसाठी पात्र असतील.
प्र.१४) मी एकापेक्षा अधिक फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकतो का?
होय, पण प्रत्येक फेरीपूर्वी पोर्टलवर Consent (संमती) देणे आवश्यक आहे.
प्र.१५) नोंदणी फी किती आहे आणि ती कशी भरावी?
नोंदणी फी ₹१०० आहे. ती Net Banking, Debit/Credit Card, UPI किंवा डिजिटल वॉलेटद्वारे ऑनलाईन भरावी लागेल.
प्र.१६) ऑफलाईन पेमेंट चा पर्याय उपलब्ध आहे का?
नाही, फक्त ऑनलाईन पेमेंटच स्वीकारले जाते.
प्र.१७) जर मी Login तपशील विसरलो तर?
यासाठी Forgot Password पर्याय वापरा किंवा जवळच्या मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करा.
प्र.१८) विद्यार्थ्याला प्रवेश अर्जासंदर्भात अडचणी संदर्भात कुठे मदत मिळेल?
शाळा, जवळचे मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाईन (८५३०९५५५६४) किंवा ईमेल support@mahafyjcadmissions.in यांच्याशी संपर्क करा.
प्र.१९) मी उच्च माध्यमिक विद्यालयांचा प्राधान्यक्रम बदलू शकतो का?
होय, प्रत्येक फेरीपूर्वी तुम्ही तुमचा Option Form (Part-२) अद्ययावत करू शकता.
प्र.२०) प्रवेश यादीत नाव आल्यावर लगेच प्रवेश निश्चित होतो का?
नाही, विहित कालावधीत यासाठी Proceed for Admission वर क्लिक करा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर व संबंधित विद्यालयाने प्रवेश निश्चित केल्यावरच आपला प्रवेश निश्चित होतो.
प्र.२१) प्रवेश प्रक्रियेमधून माघार घेण्यासाठी काय येईल?
यासाठी पोर्टलवरील Withdrawal पर्याय वापरा यामुळे एक जागा इतर विद्यार्थ्यांसाठी मोकळी होईल.
प्र.२२) मूळ कागदपत्रांची पडताळणी कोण करेल?
जे उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला प्रवेशासाठी मिळालेआहे, तेच उच्च माध्यमिक विद्यालय आपण अपलोड केलेल्या कागदपत्रांशी तुलना करून, इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संबधित मंडळाच्या वेबसाईटवरून / डिजी लॉकर वरून आपल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करेल.
प्र.२३) मी माझ्या प्रवेश अर्जातील शाखेची निवड (Stream) बदलू इच्छितो तर?
जर तुम्ही प्रवेश घेतलेला नसेल, तर तुम्ही पुढील फेरीपूर्वी तुमच्या अर्जामध्ये शाखेचा पर्याय व उच्च माध्यमिक विद्यालयांचा प्राधान्यक्रम बदलू शकता.
प्र.२४) जर अर्जातील माहिती व मूळ कागदपत्रांतील माहिती वेगळी आढळली तर काय?
अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थी नियमित फेऱ्यांमधून अपात्र ठरेल व त्याला फक्त Open to All फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येईल.
प्र.२५) जर विद्यार्थ्याचे इयत्ता १० वीचे गुणपत्रक बनावट/फेरफार केलेले आहे, असे आढळून आल्यास ?
अशा विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेण्यापासून प्रतिबंधित केले जाईल आणि गुणपत्रक बनावट ठरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
प्र. २६) शून्य फेरी म्हणजे काय ?
शून्य फेरी म्हणजे संस्थांतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक कोटा यामधील प्रवेशाचे कामकाज हे काम नियमित फेरी क्रमांक १ सोबत चालणार आहे.
प्र. २७) सर्वांसाठी खुली फेरी (Open to All Round) म्हणजे काय ?
नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर ज्या फेरीमध्ये विद्यार्थ्याच्या फक्त इ. १० च्या गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार करून त्यानुसार विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय वाटप करण्याची फेरी होय.
अधिक तपशीलवार मार्गदर्शक सूचना व माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in संकेतस्थळावर भेट द्या किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधा.
वरील संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments