पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर!
खालील लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पहा त्यासाठी आपला सीट नंबर व आईचे नाव टाकून सबमिट बटन वर क्लिक करा.
संपूर्ण शाळेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व शाळेचे युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करून शाळेचा एकत्रित निकाल पहा.
पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी), दि. 09 फेब्रुवारी, 2025
अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची संक्षिप्त माहिती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या बुधवार दि. ०७ जुलै, 2025 रोजी सायं ०८-०० वाजता परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
दि. 09 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक 25/04/2025 रोजी जाहीर करण्यात आला होता. दि. 25/04/2025 ते 04/05/2025 या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.
अंतिम निकाल प्राप्त करणे-
सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव टाकून पाहता येईल तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्याध्यर्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र त्याच्या बैंक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता / डाऊनलोड करता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अहंता) पाहता येईल.
संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक
माहितीच्या Links खालीलप्रमाणे -
1. अंतिम निकाल (विद्याथ्यांसाठी)
2. गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय)
3. शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय तालुकानिहाय)
4. संचनिहाय कटऑफ (जिल्हानिहाय / तालुकानिहाय) विद्याथी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवर क्निक करुन माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल.
गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही.
1. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्याची
2. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्याथी.
3. विहीत कमाल वयोमयदिपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी.
4. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्याथी
5. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्याध्यांपैको शुल्क न भरलेले विद्याथी.
गुणपत्रक / प्रमाणपत्राबाबत -
परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते) गुणपत्रक दि. 25 एप्रिल, 2025 रोजी व अंतिम गुणपत्रक व प्रमाणपत्र दि. ०१ जुलै, 2025 रोजी उपलब्ध करून दिलेली आहे.
1. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून गुणपत्रक व प्रमाणपत्राची डिजिटल प्रत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शाळेने त्याची उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरीत करावी तसेच डिजिटल प्रतीची सॉफ्ट कॉपी मागणीनुसार उपलब्ध करून द्यावी.
2. गुणपत्रकाची डिजिटल प्रत देण्यात आलेली असल्याने छापील गुणपत्रक वितरीत केले जाणार नाही.
3. शाळेने सर्व विद्याव्यांच्या गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या डिजिटल प्रती कायम स्वरूपी जतन करुन ठेवाव्यात व विद्यार्थी / पालकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्याव्यात. केवळ शिष्यवृत्तीधारक व राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची रंगीत छापील प्रमाणपत्रे यचावकाश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांचेमार्फत संबंधित शाळांना उपलब्ध करुन दिले जातील,
महत्त्वाचे
1. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या एकूण प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात येतात. सदर एकूण शेकड़ा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
2. ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा मुख्याध्यापकांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. तसेच अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्हता रड केली जाईल.
3. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत मा. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेबाबतचा यापुढील पत्रव्यवहार सदर कार्यालयाकडेच करण्यात यावा. सुलभ संदर्भासाठी पत्ता खालीलप्रमाणे
मा. शिक्षण संचालक (योजना)
शिक्षण संचालनालय योजना,
17 डॉ. आंबेडकर रोड, पुणे 411 001.
फोन 020-26126726
ईमेल directorscheme.mh@gmail.com
सदर प्रसिध्दीपत्रक परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दिनांक ०१ जुलै, 2025
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
राज्यात नवे शैक्षणिक वर्ष आणि पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल रखडला आहे. अंतरिम निकाल एप्रिलमध्ये जाहीर करूनही अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, येत्या आठवड्यात अंतिम निकाल, गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण परीक्षा परिषदेने दिले.
राज्य परीक्षा परिषदेकडून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते. स्पर्धा परीक्षांचा पाया म्हणून या परीक्षांकडे पाहिले जाते. यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. पाचवीच्या ५ लाख ४६ हजार ८७४, तर आठवीच्या ३ लाख ६५ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यानंतर २५ एप्रिल रोजी परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या अंतरिम निकालानुसार पाचवीचा २३.९० टक्के, तर आठवीचा १९.३० टक्के निकाल लागला. त्यानंतर दोन महिने उलटूनही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध कधी होणार, याकडे विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे लक्ष लागले आहे.
गुणवत्ता याद्यांतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात अंतिम निकाल आणि गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात येतील.- डॉ. महेश पालकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
आपल्या संपूर्ण शाळेचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
https://2025.puppssmsce.in/school/login
विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी त्याच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश पत्रावरील सीट नंबर टाकून सबमिट करावे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
प्रसिद्धीपत्रक
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
दि. ०९ फेब्रुवारी, २०२५
अंतरिम निकाल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शुक्रवार, दि. २५ एप्रिल, २०२५ रोजी www.mscepune.in व https://puppssmsce.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
विद्याथ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २५/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. ०४/०५/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. ०४/०५/२०२५ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
(अनुराधा ओक)
आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४.
दिनांक :- २४/०४/२०२५.
ठिकाण :- पुणे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 2 जुलै 2024 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी व वर्ग आठवी 2024 अंतिम निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
https://2024.mscepuppss.in/FinalResult.aspx
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला 11 अंकी बैठक क्रमांक परीक्षा प्रवेश पत्रावर असलेला (हॉल तिकीट) नोंदवा व सबमिट बटन वर क्लिक करा आपल्याला निकाल दिसेल.
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://2024.mscepuppss.in/LoginPage.aspx
लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये शाळेचा लॉगिन आयडी व पासवर्ड टाका सबमिट बटन वर क्लिक करा शाळा लॉगिन झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण शाळेचा निकाल पाहता येईल.
जिल्हा निहाय तालुक्यांची गुणवत्ता यादी पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी लिंक.
https://2024.mscepuppss.in/Shalasankhyikiymahiti.aspx?RegisterFlg=PUP
• अंतिम निकाल प्राप्त करणे-
सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैटक क्रांक टाकून पाहता येईल तसेच शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येईल, तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्याच्या बैंक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता डाऊनलोड करता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येईल.
• संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या Links खालीलप्रमाणे
1. अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)
2. गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय तालुकास्तरीय)
3. शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय तालुकानिहाय)
विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना वरीलपैकी कोणत्याही हव्या असलेल्या लिंकवरक्लिक करून माहिती प्राप्त (DOWNLOAD) करून घेता येईल,
• गुणवत्ता यादीत कोणाचा समावेश नाही.
1. शासनमान्य मंजूर शिष्यवृत्ती संचांची संख्या मर्यादित असल्याने कटऑफ शेकडा गुणांइतके एकूण शेकडागुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्याथर्थी,
2. मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून (अनधिकृत शाळांमधून) परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी.
3. विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी.
4. परीक्षेतील गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी.
5. आवेदनपत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्याथ्यर्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी.
• गुणपत्रक / प्रमाणपत्राबाबत -
परिषदेने संकेतस्थळावर अंतरिम (तात्पुरते) गुणपत्रक दि. 30 एप्रिल, 2024 रोजी व अंतिम गुणपत्रक दि. 02 जुलै, 2024 रोजी उपलब्ध करून दिलेली आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र यथावकाश शाळांना पोहोच करण्यात येतील.
• महत्त्वाचे
1. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या एकूण प्राप्त गुणांवरून शेकडा गुण काढण्यात येतात. सदर एकूण शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
2. ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीची खोटी माहिती भरून शिष्यवृत्ती अर्हता प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळा प्रमुखांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. तसेच अशा विद्यार्थ्यांची अर्हता रद्द केली जाईल.
3. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत मा. शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती रकमेवावतचा यापुढील पत्रव्यवहार त्यांचे कार्यालयाकडेच करण्यात यावा, सुलभ संदर्भासाठी पत्ता
खालीलप्रमाणे
मा. शिक्षण संचालक (योजना)
शिक्षण संचालनालय योजना,
17 डॉ. आंबेडकर रोड, पुणे - 411 001.
फोन - 020-26126726
ईमेल - directorscheme.mh@gmail.com
हे प्रसिध्दीपत्रक परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दिनांक 02 जुलै, 2024
(डॉ. नंदकुमार बेडसे)
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments