दिनांक दहा ते बारा जुलै 2024 दरम्यान होणाऱ्या पायाभूत चाचण्या बाबत शिक्षक सूचना व उत्तर सूची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या कार्यालयाने उपलब्ध करून दिल्या आहेत.
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक(सर्व)
२) उपसंचालक, प्रादेशिक
विद्याप्रधिकरण (सर्व)
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण
संस्था(सर्व)
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक,
माध्यमिक),सर्व
५) शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/
दक्षिण/ पश्चिम
६) प्रशासन अधिकारी (म.न. पा., न.
पा.,न. प.),सर्व
विषय- पायाभूत चाचणी(PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत.
Baseline Test PAT 1 Teachers Guide AnswerKey Payabhut Chachani Shikshak Margadarshika Uttarsuchi.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३ री ते ९वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी दि १० ते १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे . सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत . शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी .
शिक्षकसूचना लगेच पाहता येतील मात्र उत्तरसूची या परीक्षा नियोजनाप्रमाणे १० जुलै रोजी प्रथम भाषा, ११ जुलै रोजी गणित आणि १२ जुलै रोजी तृतीय भाषा या विषयाप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर प्रसिद्ध केल्या जातील .
मराठी उत्तर सूची सर्व वर्ग
इंग्रजी विषयाच्या सर्व वर्गाच्या उत्तर सूची
गणित विषयाच्या सर्व वर्गाच्या सर्व विषयाच्या उत्तर सूची
शिक्षक सूचना पाहण्यासाठी लिंक 👉
( राहूल रेखावार, भाप्रसे)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील सदर शिक्षक मार्गदर्शिका व उत्तर सूची उपलब्ध आहेत. लिंक👇
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments