Scholarship For Education in Foreign Countries Update - विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२५ संपूर्ण माहिती अर्ज लिंक

 विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन २०२४-२५.


परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्रता तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इच्छूक विद्यार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यासाठी जाहिरात.


अटी व शर्ती

विद्यार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.

विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा जास्त नसावे.

विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत QS (Quacquarelli Symodes) Ranking २०० च्या आतील असावी.

शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागा मुलींसाठी राखीव असतील.

निवडीसंदर्भातील अन्य अटी व शर्ती ह्या जाहिराती मध्ये नमूद केल्यानुसार व शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांक ३०.१०.२०२३ व शासन निर्णय नियोजन विभाग दिनांक २०.०७.२०२३ मध्ये नमुद केल्याप्रमाणे राहतील.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्वाच्या अटी शर्ती इ. सविस्तर माहितीसाठी विभागाच्या पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी.


https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in


वरील संकेतस्थळा (वेबसाईट) वरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांच्याकडे जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते दिनांक:- ३०/०६/२०२४ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत जमा करावा


लाभाचे स्वरुप

विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम.

विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च.

विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासन वेळोवेळी जाहीर करेल या पैकी जी कमी असेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल.

विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारतात परत येताना नजिकच्या मार्गाने (Economy Class) विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय असेल.


(स्वा/-)

(ज्ञानेश्वर खिलारी (भा.प्र.से.)

संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय,

महाराष्ट्र राज्य, पुणे.


संपूर्ण माहिती पत्रक जाहिरात व पीडीएफ अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏


शिष्यवृत्ती मंजूरीसाठी अनिवार्य अटी :-

१. नोकरीमध्ये असलेल्या उमेदवाराने तो जेथे नोकरी करतो त्या यंत्रणेचे (organization Employer) ना हरकत प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.

२. पात्र विद्यार्थ्याने (Non Judicial Stamp Paper वर public Notary) समोर विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक असेल,

३. विद्यार्थ्यांचे दोन जामिनदार देणे बंधनकारक असेल, प्रत्येक जामिनदाराने स्वतंत्र Surety Bond करुन देणे बंधनकारक असेल.

४. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वास्थ चांगले असले पाहीजे त्याकरीता त्यांनी नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

५. विद्यार्थ्यास शिक्षणासाठी आवश्यक असलेला कालावधी किंवा शिक्षण त्यापूर्वी पूर्ण झाल्यास जो कालावधी लागेल या दोघांपैकी जो कमी आहे त्या कालावधी पुरतेच परदेशात राहण्याचे बंधपत्र (Bond) राज्य शासनास तसेच परदेशातील भारतीय दुतावासास लिहून द्यावे लागेल. या आवश्यक कालावधीपेक्षा जास्त कालावधी करीता परदेशात राहण्यास विद्यार्थ्यास परवानगी मिळणार नाही.

६. विद्यार्थ्यांचा शासनाने विहीत करुन दिलेल्या नमून्यात Record Release Consent from हा बंधपत्राच्या स्वरुपात द्यावा लागेल.

७. विद्यार्थ्यास परदेशामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी QS world Ranking मधील २०० च्या आतील अद्ययावत जागतिक क्रमावारीत असणारी विद्यापीठ / शिक्षण संस्था मध्ये प्रवेशासाठी स्वतः प्रयत्न करावा लागेल व त्यासाठी आवश्यक त्या सर्व पात्रता परिक्षा देणे बंधनकारक असेल.

८. परदेशी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी GRE (Graduate Record Examination) TOEFL (Test of English as a foreign language), IELTS (International English Language Testing System) इ. प्रकारच्या परीक्षा जेथे अनिवार्य आहेत, त्या उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यावर बंधनकारक असेल.

९. ज्या विद्यार्थ्यांना परदेशी शैक्षणिक संस्थाकडून Unconditional Offer letter मिळालेले असेल त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील यासाठी conditional Offer letter गृहीत धरले जाणार नाही. Unconditional Offer असल्याचे विद्यापीठाचे पत्र/ई-मेल सोबत जोडावे.

१०. विवाहीत उमेदवाराच्या पत्नी व मुले यांना परदेशामध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहाय्य दिले जाणार नाही. त्यासाठी पासपोर्ट मिळविणे, व्हिसा मिळविणे, आर्थिक तरतूद करणे परदेशातील निवास व दैनंदिन खर्चाची व्यवस्था करणे ही उमेदवाराची वैयक्तिक जबाबदारी असेल.

११. नोकरी करणा-या उमेदवाराने सर्व प्रशासकीय बाबी उदा. रजा, वेतन, आणि इतर सेवेच्या बाबी स्वतः प्रत्यक्षपणे निराकरीत करावयाचे आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची सवलत शासनाकडून मिळणार नाही.

१२. अ) अचानक उद्भवलेल्या परिस्थीतीमध्ये, परदेशामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यास भारतामध्ये यावयाचे असल्यास त्यासाठी त्यास संबंधित शैक्षणिक संस्था व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल आणि याबाबतची माहिती संबंधित विद्यार्थी भारतीय दुतावासास कळवतील.

ब) जेवढ्या कालावधीमध्ये परदेशातील शैक्षणिक संस्थेमधील दूर असेल तेवढया कालावधीचा कोणताही खर्च त्यास अनुज्ञेय होणार नाही. तथापि, तो पुन्हा त्याच शैक्षणिक संस्थेत त्याच अभ्यासक्रमाचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी हजर झालेल्या दिवसापासून त्यास देय लाभ अनुज्ञेय होतील.

क) अशा परिस्थीतीत विद्यार्थ्यांने परत त्याच परदेशी शिक्षण संस्थेमध्ये हजर न होता शिक्षण अर्धवट सोडल्यास त्यास अदा करण्यात आलेले शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क इतर शुल्क व निर्वाह भत्याची व्याजासह वसुली करण्यात येईल. याबाबतचे लेखी हमीपत्र विद्यार्थ्यांस दयावे लागेल.

१३. पासपोर्ट व व्हिसा मिळविण्याची जबाबदारी उमेदवार/विद्यार्थ्यांची असेल

१४. उमेदवारास/विद्यार्थ्यांना केवळ ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे व शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्याच कारणासाठी व्हिसा घेणे बंधनकारक असेल.

१५. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे व आवश्यक ते करारनामे देणे बंधनकारक असेल.

१६. निवड झालेल्या विद्यार्थ्यांस त्याच्या शैक्षणिक कालावधीमध्ये जास्तीची रक्कम अदा झाली असल्यास त्याची परतफेड करणे विद्यार्थ्यावर बंधनकारक असेल. अथवा ती वसुल करणेबाबत प्रचलित कायदे व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारक असेल.

१७. विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा त्यांना नोकरी मिळेल किंवा तो स्वतःचा व्यवसाय सुरु करेल किंवा अभ्यासक्रम पूर्ण केल्यापासून दोन वर्षांनंतर यापैकी कमी असलेल्या कालावधीपासून त्याच्या शिक्षणासाठी शासनामार्फत जो खर्च करण्यात आलेला आहे त्या खर्चाच्या साधारण १० टक्के रक्कम महाराष्ट्र शासनाच्या यासाठी उघडण्यात आलेल्या स्वीय प्रपंजी लेखा (PLA) लेख्यामध्ये जमा करावी लागेल.

१८. सदर शिष्यवृत्तीबाबत महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने घेतलेला निर्णय अंतिम असेल.

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.