📢 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024- 25
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024- 25 साठी ऑनलाइन स्वनामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .
🗓 ऑनलाइन रजिस्ट्रेशनसह स्व:नामांकन भरण्याचा कालावधी:
दिनांक 18 जुलै 2025 सकाळी 10.00वाजले पासून ते 31 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत
👩🏫🧑🏫 पात्रता:
राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक यांना ऑनलाइन स्व:नामांकन करता येईल.
🖥 ऑनलाइन स्व:नामांकन भरण्यासाठी लिंक:
🔗 https://forms.gle/ixTDiuvgqqEwVuaA7
तरी इच्छुक व पात्र शिक्षकांनी वरील लिंकवर जाऊन आपले ऑनलाइन स्व:नामांकन भरावे.
✍️
शिक्षण संचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण संचालनालय
महाराष्ट्र राज्य, पुणे
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे निकष सुधारित करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 जुलै 2025 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
प्रस्तावना :-
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते.
२. राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव पात्र शिक्षकांकडून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कडून ऑनलाईन मागविण्यात येतात. अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचना / निकषांनुसार जिल्हास्तरावर जिल्हा निवड समिती प्रस्तावांची छाननी करून प्रवर्गनिहाय पात्र प्रस्ताव शिक्षण संचालक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या राज्य निवड समितीकडे पाठवतात, सदर शिफारशींवर शिक्षकांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करून राज्य निवड समितीकडून शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येतात. सदर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार उपरोक्त शासन निर्णयांनुसार प्रदान करण्यात येतात. कालानुरूप त्यामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
सदर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सर्वसाधारणपणे १५ ऑगस्ट रोजी जाहीर करून त्याचे प्रत्यक्ष वितरण ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ अन्वये राष्ट्रीय / राज्य पुरस्कार मिळणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या दोन जादा वेतन वाढीऐवजी रु.१,००,०००/- इतकी ठोक रक्कम देण्यात येईल. तसेच शासन निर्णय दिनांक २८ डिसेंबर, २०१३ अन्वये पुरस्कार प्राप्त शिक्षकांना रु. १०,०००/- रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते प्रदान करण्यात येतात.
२. सदर पुरस्कारासाठी होणारा वाढीव खर्च (बक्षिसाची रक्कम व समारंभाचा इतर खर्च) मागणी क्र. इ- २, २२०२ सर्व साधारण शिक्षण ८०, सर्व साधारण, ८०० इतर खर्च (०२) संकीर्ण (०२) (०१) आदर्श शिक्षकांना पुरस्कार, ३४ शिष्यवृत्त्या/विद्यावेतने (२२०२ २२९२) या लेखाशीर्षाखाली मंजूर तरतुदीमधून भागविण्यात येतात.
शासन परिपत्रक पीटीसी २०२२ / प्र.क्र.३४/ टीएनटी-४ दि. २८ जून, २०२२ येथून पुढे अधिक्रमित करुन राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारित करण्यात आले आहे.
३. राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारित करून सदर योजना 'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार 'या नावाने राबविण्यात शासन मान्यता देण्यात आली आहे. 'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार' साठी अटी व निकष पुढीलप्रमाणे :-
'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार' प्रस्तावासाठी आवश्यक अटी :-
१) शिक्षकांनी नामनिर्देशासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.
२) मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.
३) शिक्षक/मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक.
४) शिक्षकाचे / मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.
५) विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.
६) शिक्षकांनी केलेल्या लगतच्या ५ वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाव्दारे करण्यात येईल.
७) प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.
८) शिक्षकाच्या सेवेतील कार्यपध्दतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
९) एकदा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाही.
१०) एक शिक्षक कोणत्याही एकाच प्रवर्गासाठी अर्ज करण्यास पात्र असले. एकापेक्षा जास्त सवंर्गात अर्ज केल्यास त्यांचे अर्ज निवड प्रक्रियेतून रद्द केला जाईल.
५. जिल्हा निवड समितीचे गठण :-
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचना / निकषांनुसार जिल्हा स्तरावर प्राप्त प्रस्तावांची छाननी करून जिल्ह्यातून गुणानुक्रमे प्रथम, व्दितीय व तृत्तीय निवड होणाऱ्या प्रवर्गनिहाय पात्र शिक्षकांची शिफारस राज्य निवड समितीकडे करण्याकरिता जिल्हा स्तरावर जिल्हा निवड समिती गठित करण्यात यावी.
जिल्हा निवड समितीची रचना:-
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य
अध्यक्ष
जिल्हाधिकारी नामनिर्देशित जिल्ह्यातील शैक्षणिक सदस्य
सदस्य
क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे शिक्षण तज्ञ (१)
मुख्य कार्यकारी अधिकारी नामनिर्देशित प्राथमिक/माध्यमिक शाळेतील कार्यरत राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त एक मुख्याध्यापक/शिक्षक (१)
सदस्य
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
सदस्य
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
सदस्य सचिव
(* दरवर्षी, क्र. २ व ३ च्या व्यक्ती बदलण्यात याव्यात. मागील ३ वर्षामध्ये सदर समितीत काम केलेले सदस्य असू नयेत)
६. राज्य निवड समितीचे गठण :-
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी, जिल्हा निवड समितीकडून जिल्ह्यातून प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय शिफारस पात्र शिक्षकांना राज्य निवड समिती प्रत्यक्ष मुलाखतीस पाचारण करेल, अस्तित्वात असलेल्या निकषांनुसार ऑनलाईन पडताळणी व छाननी करुन, शिक्षकांची अंतिम निवड करताना शिक्षकांचा शैक्षणिक, सामाजिक दर्जा तसेच सामाजिक समता, श्री-पुरुष समानता याबाबत संवेदनशीलता व त्यासाठी केलेले विशेष प्रयत्न, राष्ट्रीय दृष्टीकोनाबाबत विचार व कार्य/उपक्रम राज्य निवड समितीने विचारात घ्यावेत. सदर शिफारशीवर शिक्षकांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करून राज्य निवड समितीकडून शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास पाठवावा.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रक्रियेसाठी निवड करण्याकरिता राज्य स्तरावर पुढीलप्रमाणे राज्य निवड समिती गठित करण्यात यावी.
राज्य निवड समितीची रचना :-
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
अध्यक्ष
२ संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे सदस्य
३ शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
सदस्य
४ संचालक (महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ सदस्य (बालभारती), पुणे
५ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
सदस्य
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेले शासन नियुक्त प्रतिनिधी (एकूण २) सदस्य
७ शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
सदस्य सचिव
19. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराची निवड प्रक्रिया शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून राबविली जाईल. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रक्रियेसाठी निवड करण्याकरिता ऑनलाईन प्रक्रिया राबविण्याची तांत्रिक जबाबदारी शिक्षण आयुक्तालयातील/संचालनालयातील e governance cell ची राहील.
८. प्रत्येक शिक्षकाने फक्त एकाच प्रवर्गामधून एकच आवेदन करावे. दोन प्रवर्गात आवेदने केल्यास आवेदने रद्द करण्यात येतील.
९. शिक्षकांनी सादर केलेली माहिती खोटी अथवा प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्यास आवेदने रद्द करण्यात यावेत. राज्य निवड समितीची बैठक घेण्यापूर्वी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शिक्षकांनी सादर केलेली प्रमाणपत्रे संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडून प्रमाणित करून घ्यावीत व त्यानंतर ती राज्य निवड समितीपुढे ठेवावीत.
१०, प्रतिवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया वेळापत्रक सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे राहील.
एप्रिल/मे
जाहिरात प्रसिध्दी
ऑनलाईन नामांकन नोंदणी (शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण आयुक्तालयातील/संचालनालयातील e governance cell यांनी निर्धारित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी. ही कार्यवाही करण्याची जबाबदारी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील.
जून
जिल्हास्तर समितीव्दारे नामांकनाची प्रत्यक्ष पडताळणी.
जुलै
राज्यस्तर समिती पडताळणी.
ऑगस्ट
नामांकन अंतिम करणे व शासनास सादर करणे.
सप्टेंबर
पुरस्कार वितरण समारंभ.
*सदर वेळापत्रक हे सन २०२४-२०२५ साठी लागू राहणार नाही. सन २०२४-२०२५ साठीचे वेळापत्रक स्वंतत्रपणे कळविण्यात येईल.
सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०७१६१७३६३२११२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठीखालील Download वर क्लिक करा.
शिक्षण संचालक माध्यमिक यांनी दिनांक 21 जून 2024 रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३-२४आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर
https://forms.gle/7yYfYGJ5YGxVFAlu7
या लिंकवर आपली आवेदने दिनांक २५ जून, २०२४ रोजी पासून दिनांक ०५जुलै, २०२४ रोजी मुदतवाढ ११ जुलै पर्यंत सादर करावीत. सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.
सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे.
(महेश पालकर)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे १.
१) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई ४०० ०३२ माहितीसाठी सविनय सादर
२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मुंबई ४०० ०३२ माहितीसाठी सविनय सादर
३) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे ४११००१ माहितीस्तव सविनय सादर.
४) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव.
५) शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव.
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments