सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करणे बाकी असल्यास आवश्यक रकमेची माहिती सादर करणे नवीन आदेश

राज्यातील डिसीपीएस/एनपीएस किंवा जीपीएफ खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करणे बाकी असल्यास आवश्यक रकमेची माहिती सादर करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दि ८ जुलै २०२६ रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 

क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/डिसीपीएस/एनपीएस/2008188

Digital Sign Date

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व

३. अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (प्राथमिक/माध्यमिक) संबंधित सर्व

विषय- राज्यातील डिसीपीएस/एनपीएस किंवा जीपीएफ खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करणे बाकी असल्यास आवश्यक रकमेची माहिती सादर करणेबाबत.

संदर्भ- १. श्री. नागो गाणार, माजी वि.प.स. व राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे पत्र क्र. एन.जी/माजी/वि.प.स/१६६८/२५ दिनांक ३१/१२/२०२५.

२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र.प्राथ/संघटना/२०२५/१८६१७३४ दि.२३/४/२०२६

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये राज्यातील डिसीपीएस/एनपीएस किंवा जीपीएफ खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची थकबाकी रोखीने अदा करणेबाबत संदर्भिय निवेदन संचालनालयास प्राप्त झाले आहे.

तरी राज्यातील डिसीपीएस/एनपीएस किंवा जीपीएफ खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची थकबाकी अदा करणे बाकी असल्यास नियमानुसार पडताळणी करून आवश्यक रकमेची माहिती सोबतच्या विवरणपत्रामध्ये हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी (एक्सेल) मध्ये तात्काळ संचालनालयास ईमेलवर सादर करावी.

by Digitally sign Pushpavati Madhukar Pat Date: 08-07-2 17:00:26 6

(पी.एम. पाटील)

 शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

प्रत माहितीस्तव सविनय सादर.

१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२. स्नेहा चुरी, अवर सचिव, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२


संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download


 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै, २०२३ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत  राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 20 जून 2024 पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.


प्रस्तावना :-

शासन अधिसूचना, वित्त विभाग, दिनांक ३० जानेवारी, २०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी सन २०१९-२० पासून पुढील ५ वर्षांत, ५ समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक, वित्त विभाग, दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ अन्वये विहित केली आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षांत, ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक ३० मे, २०१९ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

तसेच निवृत्तिवेतनाच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षांत, ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे दिनांक २४ जानेवारी, २०१९ व दिनांक १ मार्च, २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे.

राज्यात कोविड - १९ (कोरोना) या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना दिनांक १ जुलै, २०२२ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान दिनांक २४ मे, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे. तथापि, या शासन निर्णयामध्ये उर्वरीत देय असलेल्या हप्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.

वरील पार्श्वभूमीवर थकबाकीच्या उर्वरीत ५ व्या हप्त्याच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.


शासन निर्णय :-

शासन आता असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै, २०२३ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी:-

(अ) निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२४ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी.

(ब) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२४ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.

(क) सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२४ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.

वरील (ब) आणि (क) मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत- 

() भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.

(ii) जे कर्मचारी (भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह) दिनांक १ जून, २०२३ ते या शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील, अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.

२. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या ५ व्या हप्त्याच्या रकमेवर शासन परिपत्रक, दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ मधील परिच्छेद क्र.१४ मधील तरतुदीनुसार दिनांक १ जुलै, २०२३ पासून व्याज अनुज्ञेय राहील.

3. भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शासन परिपत्रक, दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ मधील परिच्छेद क्र.१४ मधील तरतूदी प्रमाणे काढता येणार नाही.

४. थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी वरील वाचा क्रमांक १ ते ५ येथील शासन आदेशांतील अन्य तरतुदींचे अनुपालन करण्यात यावे.

५. सदर शासन निर्णय वित्त विभाग/सेवा ४ कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५३/२४ सेवा-४, दिनांक २४.०४.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेताक २०२४०६२०१७०२१६४९०५ हा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(वि.अ. धोत्रे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन



संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.