Mahajyoti JEE/NEET Free Books Update - जेईई नीट पूर्व परीक्षा मोफत पुस्तक संच अर्ज लिंक माहिती

JEE/NEET पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत NEET प्रशिक्षणाकरीता नव्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देणेबाबत.


महाज्योती मार्फत JEE/NEET- 2026 पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

1. सदर योजनेकरीता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी दि.26/12/2024 रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करुन त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पुर्तता करण्याकरीता दि.31/12/2024 रोजी पर्यंत मुदतवाढ तसेच JEE/NEET पुस्तक संच वाटप योजनेकरीता नव्याने अर्ज करण्याची संधी देखील देण्यात आलेली होती.

2. दि.31/12/2024 रोजी पर्यंत एकूण 5024 अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेले होते त्यापैकी एकूण - 3473 अर्ज पात्र व एकूण - 1551 अपात्र ठरलेले आहे.

3. सदर योजनेकरीता पात्र ठरलेल्या तसेच ज्या विद्यार्थ्यांची JEE/NEET/MHT-CET-2026 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड झालेली आहे व ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तक संचाबाबत पर्याय निवडलेला आहे, अशा विद्यार्थ्यांची JEE/NEET पुस्तक संच योजनेकरीता मेरीटद्वारे निवड यादी तसेच NEET करीता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी दि.30/01/2025 रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

4. NEET पुस्तक संच योजनेकरीता NEET प्रशिक्षणाकरीता पुरेशा प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्याने NEET करीता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्तता करण्याकरीता तसेच NEET पुस्तक संच वाटप योजनेकरीता नव्याने अर्ज करण्यासाठी दि. 15/02/2025 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

5. प्राप्त अर्जाची छाननी करुन महाज्योतीच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून मेरीटद्वारे पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.


(स्वा.) विकास गडपायले 

प्रकल्प व्यवस्थापक

 महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर,


अर्ज करण्यासाठी लिंक

https://mahajyoti.org.in/jee-neet


JEE/NEET/MHT-CET-2026 परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करणेकरिता मुदतवाढ! 

महाज्योतीमार्फत JEE/NEET/MHT-CET-2026 परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरीता दि.26/06/2024 रोजी पासुन ते दि.10/08/2024 रोजी पर्यंत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अर्ज देखील या कार्यालयास सादर केलेले आहे. परंतु काही विद्यार्थ्यांकडे आवश्यक असलेले कागदपत्रे उपलब्ध नसल्याने महाज्योती या कार्यालयास सदर योजनेकरिता अर्ज सादर करू शकले नाही अश्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या कॉल सेंटरला सदर प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत विनंती सुध्दा केलेली आहे. विद्यार्थ्यांनी या कार्यालयास केलेली विनंती विचारात घेता सदर प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्यासाठी दि.10/09/2024 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच अर्ज करण्याची लिंक महाज्योतीच्या संकेतस्थळावर सदर परिपत्रकासोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.


(राजेश खवले)

व्यवस्थापकीय संचालक

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर,




यावर्षी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! 


 महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारे  2026 मध्ये होणाऱ्या जेईई नीट एमएचटी-सीईटी पूर्व परीक्षा ट्रेडिंगसाठी मोफत प्रशिक्षण व दररोज सहा जीबी डेटा ऑनलाइन अर्ज लिंक माहिती पुढील प्रमाणे.

JEE/NEET/MHT-CET - Batch - 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील.


महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यांना JEE/NEET/MHT-CET Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल,


अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता :-

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.

2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्याथी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी,

3. सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील,

4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.

 5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल,

 6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुणअसणे आवश्यक आहे. 

7. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.


व. अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :-

1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)

2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)

3 . जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)

5. 10 वी ची गुणपत्रिका

6. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) 

7. दिव्यांग असल्यास दाखला

8. अनाथ असल्यास दाखला


सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

सामाजिक प्रवर्ग

इतर मागास वर्ग (OBC)

59%

निरधीसुचती जमाती अ (VJ-A)

10%

भटक्या जमाती व (NT-B)

8%

भटक्या जमाती क (NT-C)

11%

भटक्या जमाती - ड (NT-D)

6%

विशेष मागास प्रवर्ग (SBC)

6%

एकूण

100%


समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-

1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे. 2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.

3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

Note: शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात येईल.


ड. अर्ज कसा करावा :-

1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for JEE/NEET/MHT-CET Batch -2026 Training यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत 'ब' मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कैन करुन जोडावे.


> अटी व शर्ती :-

1. अर्ज करण्याची अंतिम दि.10/07/2024 आहे.

2. 3 . जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

4. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टण्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्याथ्यर्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल, 5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संपर्क क्र 0712-2870120/21

E-mail Id: mahajyotimpsc21@gmail.com


(प्रशांत वावगे)

मुख्य लेखा व वित्त अधिकारी

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था,

(महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर.


अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक.

https://mahajyoti.org.in/en/application-for-jee-neet-mht-cet-batch-2026-training-2/


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.