इयत्ता 3 री ते 12 वी इयत्तांचा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक ठरणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे.
सदर आराखड्यानुसार..
अकरावीला कला, वाणिज्य, विज्ञान विभाजन बंद
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीची संधी; इंग्रजी अनिवार्य नाही; राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यात समावेश.
अकरावी व बारावीला सध्या असलेल्या कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा विविध शाखांमध्ये असलेले विभाजन आता भविष्यात राहणार नाही. तर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीची संधी दिली जाणार आहे. त्यानुसारच अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आता भाषा शिक्षणातून दोन विषयांचाच अभ्यास करावा लागणार आहे. किमान एक भाषा मूळची भारतातील असावी लागणार आहे. विशेष म्हणजे या वर्गासाठी आता इंग्रजी हा विषय अनिवार्य राहणार नाही.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे. तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा नागरिकांसाठी जाहीर करण्यात आला
आहे. ३ जूनपर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येणार आहेत. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अभ्यासक्रमात महत्त्व-
पूर्ण बदल होणार आहेत. अकरावी आणि बरावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आशयाचे ओझे कमी करुन चिंतनासाठी अधिक वेळा दिला जाणार आहे. शाखांचे ओझे आता असणार नाही विद्यार्थी संगणक विज्ञान किंवा बँकिंग यांसारख्या बायफोकल विषयाची निवड करून दुसरी भाषा सोडू शकणार आहे. ही तरतूद नव्या धोरणात आली आहे. यामुळे शालेय शिक्षण व्यवस्थेत यापुढे कला, विज्ञान आणि वाणिज्य या विषयांची संकल्पना राहणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या आवडीचा विषय निवडण्याचा पर्याय असणार आहे. मसुद्यानुसार नवीन आराखड्यातील निवडक विषयांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे ज्यात विज्ञान आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन, सामाजिक विज्ञान, कला शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, गणित आणि संगणकीय विचार आणि आंतरविद्याशाखीय क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना तीन गटांपैकी किमान दोन गटांमधून चार विषय (वैकल्पिक पाचवा विषय अस- लेले) निवडण्याची सक्ती असणार आहे.
• तीन भाषा शिकणे प्रत्येक विद्यार्थ्यांला तीन भाषा येणे आणि त्यासाठी त्याला सक्षम बनवणे हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयाचे ध्येय आहे. बहुभाषिकता मुळे विद्यार्थ्याला संवादाचे अनेक पैलू, सांस्कृतिक समृद्धता आणि बहुविध बोधात्मक क्षमतांचा विकास असे अनेक फायदे होतात. विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात तीन भाषा शिकतील. या तीन भाषांतील पर्याय म्हणून संस्कृत भारतीय भाषादेखील उपलब्ध असेल. ज्यामुळे प्राचीन भारतीय परंपरेची ओळख विदयार्थ्यांना होईल, हा हेतूही व्यक्त करण्यात आला आहे.
• धार्मिक व्यक्तींच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्याची सूचनाही मसुद्यात करण्यात आली आहे. तसेच शेती, पशुपालन, भारतीय सण, भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी, खगोलशास्त्र आणि इतर विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

दहावीसाठी दहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार
पॅटर्न बदलला, बारावीसाठी दोन भाषा विषयांसह किमान दोन गटांतील विषयांत व्हावे लागणार उत्तीर्ण.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षा पध्दतीत बदल करण्यात येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी दहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा विषयांसह किमान दोन गटांमधील सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्या प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या तिसरी ते बारावीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावी-बारावी परीक्षेच्या बदलांबाबत नमूद करण्यात आले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला तिसरी ते बारावीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा जनतेसाठी खुला करण्यात आला असून त्यावर जनतेचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
आराखड्यावर आता अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानंतर मसुदा अंतिम होईल. त्यानंतर दहावी-बारावी परीक्षासंदर्भात शासन धोरण निश्चित करेल, शासनाच्या धोरणानुसार दहावी- बारावीच्या परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात येणार असून शासनाच्या निर्देशानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
- शरद गोसावी, अध्यक्ष राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
नवीन राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
विषय - राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्याबाबत.
इयत्ता 3 री ते 12 वी इयत्तांचा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक ठरणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे.
सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/index.php?tcf=scf_se या संकेतस्थळावर दिनांक. 23/05/2024 पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुद्याबाबत सर्व समाज घटक यांनी आपले अभिप्राय दिनांक. 03/06/2024 पर्यंत खालील लिंकवर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
अभिप्राय नोंदविण्याचा कालावधी दिनांक- 23/05/2024 ते 03/06/2024
अभिप्राय नोंदविण्यासाठी LINK https://forms.gle/7r5ZRR7eYZ9WtUZ17
(राहूल रेखावार,भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments