Vetan Truti Samiti 2024 Update - राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ - प्रस्ताव सादर करणेबाबत शासन परिपत्रक दि. १५ मे २०२४.

 महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 15 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकनुसार राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ - प्रस्ताव सादर करणेबाबत सर्व मंत्रालयीन विभागांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


संदर्भ:-

१) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक वेपूर-११२३/प्र.क्र.१७/ सेवा-९, दिनांक १६.०३.२०२४.

२) या विभागाचे समक्रमांक दिनांक ०८.०४.२०२४ व दिनांक ०९.०५.२०२४ रोजीचे पत्र.


महोदय,

संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली आहे. प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून ६ महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनाला सादर करावयाचा आहे. यास्तव मंत्रालयीन विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयातील शासनाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ व ४ येथील नमूद तदतुदीप्रमाणे कार्यवाही करुन प्रस्ताव २ महिन्याच्या आत (दिनांक १६ मे २०२४ पूर्वी) वित्त विभाग / सेवा-९ कार्यासनाकडे सादर करण्याबाबत नमूद केले आहे. या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक १६.०५.२०२४ पूर्वी वित्त विभाग / सेवा-९ कार्यासनाकडे सादर करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक २ येथील पत्रांन्वये कळविण्यात आले आहे. तथापि, अद्याप काहीच मंत्रालयीन विभागांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कामकाजासाठी मंत्रालयीन विभागातील अधिकारी / कर्मचारी हे कर्तव्य बजावत असल्याने, वेतनत्रुटी निवारण समिती समोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव २ आठवड्याची (दिनांक ३१.०५.२०२४) पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सबब आपल्या विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयातील विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ व ४ येथील नमूद तदतुदीप्रमाणे कार्यवाही करुन दिनांक ३१.०५.२०२४ पूर्वी वित्त विभाग / सेवा-९ कार्यासनाकडे आपल्या अभिप्रायासह सादर करावेत, ही विनंती. तसेच दिनांक ३१.०५.२०२४ नंतर वेतन त्रुटी निवारण समितीकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही.


निवडनस्ती (वेतन त्रुटी समिती)

 (वि.अ. धोत्रे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.