सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी संयुक्तपणे दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
क्र. प्रशिसं/संकीर्ण-८०२/माशाव्य/२०२६/
परिपत्रक -
विषय : सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत
संदर्भ :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय क्र. माशाव्य १२०४ (११४/०४) माशि-३, दि.११ जून, २००४
२) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, म. शासन, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. विपप्र-२०२५/प्र.क्र.१०८/एस.एम-६, दि.१ जुलै, २०२५
३) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/संकीर्ण-८०२/माशाव्य/२०२५/१३९३२०४, दि.२६/०८/२०२५
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भ क्र.२ चे शासनाचे निर्देशानुसार, संचालनालयाने शासन निर्णय दि.११ जून, २००४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत संदर्भ क्र.३ चे परिपत्रक निर्गमित केले आहे. सदर परिपत्रकानुसार याअनुषंगाने शासन निर्णय दि.११ जून, २००४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत पुनश्च निर्देश देण्यात येत आहे.
सदरील विषयाचे गांभीर्य पाहता सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. याबाबतच्या सूचना सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना दयाव्यात. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी यांनी त्याबाबत शहानिशा करुन तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करावी.
राज्य मंडळ, C.B.S.E., I.C.S.E. मंडळाच्या शाळांनी NCERT / SCERT (बालभारतीची) पाठ्यपुस्तके वापरावीत. अन्य मंडळांच्या शाळांनी त्या त्या मंडळांनी प्रमाणित केलेली पाठ्यपुस्तके वापरावीत. कोणत्याही शाळेने विशिष्ट खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा वापर करण्याचे बंधन / सक्ती विदयार्थ्यांवर करु नये.
याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्याबाबत शहानिशा करुन तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करावी.
सहपत्र- संदर्भिय पत्र क्र. २ व ३ दि.११.०६.२००४ चे शा.नि. सह
Digitally signed by
Mahesh Madhukar Palkar
Date: 14-04-2026
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 13-04-2026 18:09:55
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / (माध्यमिक), जिल्हा परिषद, (सर्व)
शिक्षण निरीक्षक, (उत्तर, दक्षिण, पश्चिम), बृहन्मुंबई महानगरपालिका
शिक्षणाधिकारी / शिक्षण प्रमुख / प्रशासन अधिकारी, मनपा/ नपा / नप (सर्व)
प्रत :- १) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई २) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
जिल्हा परिषद प्राथमिक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 27 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार शाळेमधील वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, शुज व युनिफॉमची शाळेतून खरेदी करण्याची सक्तीवर कार्यवाही करुन शाळेच्या मान्यता रद्द करण्याबाबत सर्व मुख्याध्यापक अनुदानित /अंशतः अनुदानित/विना अनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित छत्रपती संभाजीनगर जिल्हा यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
1 श्री. योगेश गुलाबराव बन, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, छत्रपती संभाजीनगर यांचे निवेदन दि. 27.05.2024
2. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011
वरील विषयान्वये कळविण्यात येते की, छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील अनुदानित/ अंशतः अनुदानित / विना अनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा विद्यार्थ्याच्या पालकांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य शाळेतुनच खरेदी करण्याची सक्ती करित असल्या बाबत पालकांच्या तक्रारी प्राप्त आहे.
शाळा व्यवस्थापनाने गणवेश, बुट, स्कुलबॅग इत्यादी साहित्य एका विशिष्ट विक्रेत्याकडुनच खरेदी करण्याची सक्ती पालकांना करण्यात येऊ नये. याद्वारे कळविण्यात येते की, विद्यार्थ्याच्या पालकांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य तसेच गणवेश, बुट, स्कूल बॅग इत्यादी साहित्य विशिष्ट दुकानातुनच खरेदी करण्याची सक्ती करित असल्या बाबत पालकांच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झाल्यास महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 नुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची सर्व शाळा व्यवस्थापनाने नोंद घ्यावी.
(जयश्री चव्हाण)
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर
प्रतिलीपी -
श्री. योगेश गुलाबराव बन, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, छत्रपती संभाजीनगर.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 Comments