दहावी बारावी परीक्षा जून जुलै 2025 चा निकाल आज!
निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक..
दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://sscresult.mahahsscboard-result.in/
बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://hscresult.mahahsscboard-result.in/
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४
प्रकटन
विषय : जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करणेबाबत...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३.१० वी) पुरवणी परीक्षा दिनांक २४ जून, २०२५ ते दिनांक ०८ जुलै, २०२५ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) ची पुरवणी परीक्षा दिनांक २४ जून, २०२५ ते १६ जुलै, २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल पुढील संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक २९/०७/२०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजता जाहीर करण्यात येत आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा
२) ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक ३०/०७/२०२५ ते शुक्रवार, दिनांक ०८/०८/२०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking) याद्वारे भरता येईल.
३) जून-जुलै २०२५ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्याथ्यर्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
४) जून-जुलै २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेमध्ये सर्व विपयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी तरतुदींच्या अधीन राहून लगतच्या तीन संधी (फेब्रुवारी-मार्च २०२६, जून-जुलै २०२६ व फेब्रुवारी-मार्च २०२७) उपलब्ध राहतील.
५) फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा नियमित, पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) द्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.
Digitally signed by
Devidas Balkrishna Kulal
Date: 28-07-2025 16:11:58
दि. २८/०७/२०२५
सचिव,
राज्य मंडळ, पुणे-०४.
सुप्रसिद्ध वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार दहावी बारावीचा निकाल बाबत पुढील प्रमाणे माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल दि. १५ मेपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये निकालाबद्दल उत्सुकता वाढली आहे. परीक्षेचा निकाल डीजी लॉकर अॅपमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. अपार आयडी असलेल्या विद्यार्थ्यांना डीजी लॉकरमधील निकाल कायमस्वरूपी पाहता येणार आहे.
१५ मे पर्यंत दहावी , बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार!
गेल्या काही वर्षात बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात होता. परंतु, यावर्षी दोन्ही परीक्षांचा निकाल दि. १५ मेपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.
निकाल लवकर लागल्यास प्रवेश प्रक्रियाही लवकर!
दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची पुढील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. यावर्षी दहावी व बारावीचे निकाल दि. १५ मेपर्यंत जाहीर केले जाणार असल्यामुळे प्रवेश प्रक्रियाही वेळेवर सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेचे नुकसान वाचणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालयही वेळेवर सुरु होण्यास मदत होणार आहे.
HSC & SSC Result: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दहावी व बारावीच्या परीक्षा मागील एक महिन्यामध्येच झालेल्या आहेत. आणि आता विद्यार्थ्यांना आतुरता लागली आहे. की कधी निकाल लागतील. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो की निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. HSC & SSC Result निकाल कोणत्या दिवशी लागणार आहेत. हे आपण सविस्तर आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो जरा सा ही वेळ वाया न घालवता आपण माहिती पाहूयात की दहावी व बारावीचा निकाल कधी लागेल….! HSC & SSC Result
मित्रांनो दहावी व बारावीची परीक्षा झाली की लगेच विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना असे वाटते की निकाल लागावा. परंतु मित्रांनो शैक्षणिक अधिकारी पेपर चेक करूनच निकाल देतात. या कारणामुळे निकालाला थोडा उशीर होतो. (HSC & SSC Result) मित्रांनो निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. की नाही हे देखील आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो मागील वर्षी कोणत्या तारखेला निकाल लागला होता. यावर्षी किती तारखेला निकाल लागण्याची अपेक्षा आहे हे आपणास सांगणार आहोत.HSC & SSC Result
12विचा निकाल कधी लागणार
मित्रांनो बारावीचा निकाल हा मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची माहिती मिळाली आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागेल. परंतु याची फिक्स तारीख ही आणखी जाहीर झालेले नाही. (HSC & SSC Result) परंतु मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार आहे.
मित्रांनो बारावीचा निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला आईचे नाव व आपला सीट नंबर लागणार आहे. त्यानंतर निकाल प्रदर्शित झाल्यानंतर आपण आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने खालील वेबसाईटच्या मदतीने पाहू शकता. तसेच डाउनलोड देखील करू शकता.(HSC & SSC Result)
10वी निकाल कधी लागणार
मित्रांनो दहावीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच 1 जून ते 5 जून दरम्यान दहावीचा निकाल लागणार आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments