भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याबाबत.
प्रस्तावना:-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक युग पुरुष व आधुनिक भारताच्या निर्मितीचे शिल्पकार होते. ते एक विद्वान कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, समाजसुधारक आणि द्रष्टे नेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधानात लोकशाही, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मुल्यांच्या आधारे आधुनिक भारताच्या विकासाचा पाया रचला आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेनुसार सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय निश्चितपणे प्राप्त करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. राज्य घटनेच्या कलम ४६ मध्ये "राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करेल." असे नमूद करण्यात आले आहे. वरील निर्देशांचे अनुषंगाने अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पीड़ीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. आपल्या संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाली असून, भारत देश एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान आहे.
मा. मुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे १५० वे वर्ष व महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष साजरा करण्याचा विशेष उल्लेख केला आहे. "महाड येथील चवदार तळे सत्याग्रह हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठीचा आहे" असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. सबब, या सर्व उपक्रम/योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, या करीता राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दि.०८ एप्रिल, २०२६ ते १४ एप्रिल, २०२६ या कालावधीत साजरा करण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात येत आहे. राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या कार्यालयांना खाली नमूद केल्याप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश या शासन निर्णयान्वये देण्यात येत आहेत:-
दिनांक
दि.०८ एप्रिल, २०२६ ते दि.१४ एप्रिल, २०२६
कार्यक्रम भारतीय संविधानाची उद्देशिका / प्रस्ताविका याची प्रत प्रत्येक कुटुंबास वितरीत करणे.
कार्यक्रम राबविणारी यंत्रणा सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, सर्व सहायक आयुक्त व सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संबंधित जिल्हा.
दि.०८ एप्रिल, २०२६
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन करणे व पत्रकार परिषदेचे आयोजन करणे. सामाजिक समता कार्यक्रमनिमित्त कार्यक्रमांची माहिती देणे,
सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, सर्व सहायक आयुक्त व सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संबंधित जिल्हा
दि.०९ एप्रिल, २०२६
१. विभागातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावर तसेच, सन २०२६ हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून त्यानिमित्ताने चवदार तळे, महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्यानुषंगाने मानवी हक्कांचे महत्व प्रतिपादन करणारे व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन करणे.
२. संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांच्या कार्याचे महत्व प्रतिपादन करणारे व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन करणे,
३. जिल्हा स्तरावर व विभागीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करुन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभप्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना वाटप करणे.
सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, सर्व सहायक आयुक्त व सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संबंधित जिल्हा
दि.१० एप्रिल, २०२६
१. विभागामध्ये समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका या द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करणे,
२. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे मार्फत प्रत्येक जिल्हयात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा आयोजित करणे, मार्जिन मनी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे,
सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, सर्व सहायक आयुक्त व सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संबंधित जिल्हा
दि.११ एप्रिल, २०२६
सन २०२६ हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष असल्याने महात्मा ज्योतिबा फुले जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करणे, महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य या विषयी विविध स्तरावर कार्यक्रम घेण्यात यावेत.
सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, सर्व सहायक आयुक्त व सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संबंधित जिल्हा
दि.१२ एप्रिल, २०२६
संविधान जागर भारतीय संविधाना विषयी सर्वसाधारण माहिती देणे जसे की, संविधानाची निर्मिती, संविधान निमिती समिती, अनुच्छेद, विशेषतः मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करणे (किमान ६० ते ९० मि.३. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण या कार्यालयात महिला मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे.
सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, सर्व सहायक आयुक्त व सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संबंधित जिल्हा
दि.१३ एप्रिल, २०२६
१. प्रत्येक जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिचीर व नागरिकांचा मेळावा घेणे. तसेच, प्रत्येक जिल्हयात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करणे.
सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, सर्व सहायक आयुक्त व सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संबंधित जिल्हा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे,
२. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने जिल्हयातील सर्व महत्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविणे.
अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (सर्व).
३. सदर दिवशी विभागातील सर्व जिल्हा जात पडताळणी कार्यालयात Online-Validity प्रमाणपत्र प्रदान करणे.
दि.१४ एप्रिल, २०२६
१. सामाजिक न्याय विभागांतर्गत अधिनस्त सर्व शासकीय कार्यालय, महाविद्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रम व्याख्यान, चर्चासत्र इ. सदर कार्यक्रमास संबंधित लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे.
सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, सर्व सहायक आयुक्त व सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संबंधित जिल्हा
२. जिल्हास्तरावर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करतांना बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करणे.
3. तसेच, महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून दि.२० मार्च, २०२६ पासून साजरे
करण्यात येत असून त्यानिमित्ताने चवदार तळे, महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्यानुषंगाने मानवी हक्कांचे महत्व प्रतिपादन करणारे व्याख्याने आयोजित करावेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे समारोप.
२ उपरोक्त कार्यक्रमात परिस्थितीनुसार स्थानिक स्तरावर बदल करावयाचा असल्यास तो संबंधित प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या स्तरावर करता येईल. ३. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी त्या त्या जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांची राहील व कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पर्यवेक्षणाची जबाबदारी संबंधित प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण यांची राहील.
४. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीतून प्रत्येक जिल्हयाकरीता रु.३.०० लक्ष (अक्षरी रु. तीन लक्ष) इतका निधी संबंधित सहाय्यक आयुक्त यांना तात्काळ उपलब्ध करुन द्यावा.
4. व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित, मुंबई. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, मुंबई, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांनी त्यांचे स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच, आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा अहवाल शासनास सादर करावा,
६. सदर कार्यक्रम साजरा करतांना ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगर पालिका व राज्य निवडणूक आयोगाने घोषित/लागू केलेल्या अन्य कोणत्याही निवडणूक/पोटनिवडणूकीची आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
७. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०३३०१३४६४१०४२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
HARSHADEEP SHRIRAM KAMBLE
(डॉ. हर्षदीप कांबळे)
प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
१) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
५) अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव, सर्व प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई.
६) सर्व विभागीय आयुक्त, महसुली विभाग
७) आयुक्त, समाजकल्याण, पुणे
८) सर्व जिल्हाधिकारी.
संपूर्ण शासन निर्णय PDF स्वरूपात डाउनलोड करण्या साठी खालील Download वर क्लिक करा
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य कार्यालायतुन निर्गमित दि. ०५.०४.२०२४ रोजीच्या परिपत्रका नुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सन 2024 मध्ये आयोजित करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक 27.12.2023 च्या परिशिष्टानुसार कळविण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारतीय लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करण्याबरोबरच त्यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्टया मौलीक असे योगदान भारतीय समाजाला दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला व विशेषतः शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी संबंधीत विषयावर परिसंवाद, त्यांच्या विचारधारांवर आधारित ग्रंथोत्सव, निबंधस्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच त्यांच्या कार्याशी संबंधीत इतर नाविन्यपूर्ण उपक्रम / कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
संदर्भाधीन शासन निर्देशानुसार कार्यवाही करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.
प्रति,
1. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. (सर्व)
3. शिक्षण निरीक्षक, बृहमुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
4. प्रशासन अधिकारी (मनपा) (सर्व)
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे- 1
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 Comments