Composite School Grant 2025-26 Update - समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान MPSP द्वारे जिल्हास्तरावर वितरित खर्च करणे मार्गदर्शक सूचना

महत्वाची सूचना – संयुक्त शाळा अनुदान 2025-26 

🗓 PAB दिनांक 02/05/2025 च्या मान्यतेनुसार, समग्र शिक्षा अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता PM SHRI (827 शाळा वगळून) शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे.

📌 प्राथमिक शाळा (इयत्ता 1वी ते 8वी):

👥 62493 शाळांसाठी ₹15695.50 लाख तरतूद


📌 माध्यमिक शाळा (इयत्ता 9वी ते 12वी):

🏫 1741 शाळांसाठी ₹5009.6 लाख तरतूद


📝 सदर निधी वितरीत करताना मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.

📂 जिल्हा परिषद / महापालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतुदीचे तक्ते (अ) व (ब) संलग्न आहेत.

📌 नोंद: PM SHRI योजनेतील 827 शाळा या अनुदानातून वगळण्यात आलेल्या आहेत.

🔎 कृपया पात्रता व शाळांची यादी तपासून पुढील नियोजन करावे.

✅ निधी वितरण अचूकतेने व वेळेत होण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधावा.

समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२५-२६ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या दि.०२/०५/२०२५ रोजीच्या बैठकीत PMSHRI पहिला टप्पा ५१६ व दुसरा टप्पा ३११ अशा एकूण (८२७) शाळा वगळून संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजूरी मिळाली आहे. सन २०२५-२६ मध्ये इयत्ता ८वी पर्यंतचे वर्ग असलेल्या एकूण ६२४९३ शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकूण रु. १५६९५.५ लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तसेच इयत्ता १०वी किंवा १२ वीचा वर्ग असलेल्या एकूण १७४१ शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांसाठी एकूण रु.१००९.६ लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरीता (PM SHRI ८२७ शाळा वगळून) सोबत जोडण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निधी वितरीत करण्यात यावा. जिल्हा परिषद / महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतूदीबाबतचा तक्ता (अ) व (ब) सोबत जोडण्यात आलेला आहे. जिल्हा / महानगरपालिकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात येणारा निधी हा ज्या शाळांचा खर्च होईल अशाच शाळांना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात यावा. तथापि, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या एकूण मंजूर तरतूदीच्या मर्यादेत आणि शाळांना मंजूर असलेल्या तरतूदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच सदर उपक्रमाच्या अनुषंगाने अंमलबजावणीकरीता या कार्यालयाकडून निधीच्या उपलब्धतेनुसार निर्गमित होणारा निधी अपणांस वेळोवेळी पत्रानुसार कळविण्यात येईल. तद्नंतर समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व जिल्हा व महानगरपालिका यांनी सदरचा निधी प्राप्त होताच तात्काळ खर्च करुन प्रबंध पोर्टलवर माहिती अद्यावत करण्यात यावी.

टिप्पणी:- मा. राज्य प्रकल्प संचालक यांच्या मान्यतेने


सोबत :- मार्गदर्शक सूचना

 (गोविंद कांबळे)

राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.

समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान मार्गदर्शक सूचना (सन २०२५-२६)

समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास इयत्ता १ ते इयत्ता ८वीचा वर्ग असणाऱ्या तसेच इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चा वर्ग असणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांना शाळेच्या पटसंख्येच्या निकषानुसार भारत सरकार यांचेकडून दिनांक दि.०२/०५/२०२५ रोजीच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या बैठकीमध्ये संयुक्त शाळा अनुदानास मंजूरी मिळाली आहे. सदर अनुदान हे शासकीय आदिवासी विकास विभागाकडून चालविलेल्या आश्रम शाळा, समाज कल्याण विभागाकडून चालविलेल्या शाळा, विद्यानिकेतन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, कटक मंडळे इत्यादी) साठी मंजूर आहे.

संयुक्त शाळा अनुदानांतर्गत शाळांसाठी मंजूर निधी प्राथमिकस्तर व माध्यमिक स्तरावरील तक्ता खालीलप्रमाणे :-

अ) इयत्ता १ ली ते इयत्ता ८वी पर्यंत वर्ग असलेल्या प्राथमिक शाळांसाठी (Composite School Grant) :-


उपरोक्त निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरीता (PM SHRI पहिला टप्पा शाळा वगळून) वितरीत करण्यात यावा. जिल्हा परिषद / महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतूदीबाबतचा तक्ता (अ) व (ब) सोबत जोडण्यात आलेला आहे. जिल्हा / महानगरपालिकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात येणारा निधी हा ज्या शाळांचा खर्च होईल अशाच शाळांना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात यावा. तथापि, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या एकूण मंजूर तरतूदीच्या मर्यादेत तसेच शाळांना मंजूर असलेल्या तरतूदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी.

उपरोक्त तक्तयातील सद्यःस्थितीत उपलब्ध अनुदानाच्या मयदित वितरीत करण्यात येत असलेली तरतूद शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने शाळास्तरांवरुन खालील उपक्रमावर खर्च करण्यात यावी.

1. सदर अनुदान निकष पात्र शाळांना या कार्यालयाकडून वितरीत करण्यात येईल.

2. शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन, सदर अनुदानाचा विनियोग करावा.

3. संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग हा शाळेतील नादुरुस्त असलेल्या भौतिक वस्तू दुरुस्ती करणे तसेच इतर आवर्ती खर्च, खेळाचे साहित्य, क्रीडा साहित्य, शाळेचे वीज बील (Electricity Charges), Internet, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मिती वर्ग अध्यापनाकरिता, प्राथमिक शाळांच्या दर्शनी भागामध्ये भिंतीवर Logo painting साठी सदर अनुदान खर्च करता येईल. (यापुर्वी केला नसल्यास)

4. सदर उपक्रमांतर्गत निधीचा विनियोग वार्षिक देखभाल शाळा इमारत, शौचालयाची दुरुस्ती आणि इतर भौतिक सुविधा सुस्थितीत ठेवण्यासाठी करता येईल. भारत सरकारच्या स्वच्छताविषयक मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छ भारत स्वच्छ-विद्यालय या संकल्पनेचा उद्देश अधिक दृढ होईल, यासाठी करावा. याकामी आवश्यकतेनुसार शौचालयाची स्वच्छता व देखभाल व्यवस्थेसाठी, शौचालयासाठी पाण्याची उपलब्धता, हात धुण्याचा साबण, फिनेल, ब्लिचिंग पावडर, डांबर गोळ्या, झाडू, कचरा पेटी इत्यादी वस्तू खरेदीसाठी या अनुदानाचा विनियोग करावा.

5. साथीच्या आजार लक्षात घेता, मूलभूत सुविधांच्या तरतूदीकरीता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हात धुण्यासाठी द्रव्य स्वरुपातील अत्यावश्यक वस्तू उदा. Liquid soap, alcohol rub / hand sanitizer आणि chlorine solution च्या आवश्यकतेनुसार वापराकरीता देखील सदर अनुदानातून खर्च करता येईल. 

6. भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) ने दिलेल्या मंजूरीनुसार सदर उपक्रमाकरीता मंजूर असलेल्या एकूण निधीच्या १०% निधी हा स्वच्छ कार्ययोजना (Swachhata Action Plan) या उपक्रमावर खर्च करण्यात यावा.

7. प्रत्येक शाळेने स्वच्छतेबाबत मूलभूत सुविधांची तरतूद लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करावी. मुलांसाठी व मुलींसाठी स्वच्छतागृहांची सुव्यवस्थेसाठी (SAP) करीता मंजूर असलेला १०% निधी या नियोजीत उपक्रमावरच खर्च करण्यात यावा.

8. शाळेची स्वच्छता व शाळा परिसरातील सर्व भागाचे निर्जंतुकीकरण नियमितपणे करण्यात यावे. शाळा परिसर बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनुकुल राहील, याकरीता सदर उपक्रमांतर्गत अनुदानाचा विनियोग करण्यात यावा, तथापि, या कामी समाज सहभाग देखील घेता येईल.

9. सदर उपक्रमांकरिता अनुदान प्राप्त झाल्याची नोंद संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने ठेवणे आवश्यक राहील. 

10. सदर उपक्रमावरील झालेल्या खर्चाची माहिती शाळा पटसंख्यानुसार मंजूर असलेल्या निधीच्या अनुषंगाने विहित वेळेत भारत सरकारच्या प्रबंध पोर्टलवर प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत उपक्रमधारक व लेखा विभाग यांच्या समन्वयाने अचूक भरण्यात यावी.

11. संयुक्त शाळा अनुदान उपक्रमांवरील सदरचा मंजूर निधी सन २०२५-२६ च्या दिनांक ३१ मार्च, २०२५ या आर्थिक वर्षाकरीता आहे. सदरचा खर्च आवर्ती स्वरुपाचा असल्याने याच आर्थिक वर्षात खर्च होणे आवश्यक आहे. निधी अखर्चित राहील्यास निधी प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी.

12. संयुक्त शाळा अनुदानाचा जिल्हा व महानगरपालिका निहाय मंजूर भौतिक लक्ष व आर्थिक तरतूदीबाबतचा तपशिल सोबत जोडला आहे.

13. अनुदान विनियोग विहित वेळेत होईल यासाठी जिल्हास्तरावरुन व महानगरपालिका स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी, तसेच संयुक्त शाळा अनुदान व Swachata Action Plan च्या अनुषंगाने आपल्या जिल्हा महानगरपालिका अंतर्गत निवडक 10 शाळांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल फोटोसह या कार्यालयात पाठविण्यात यावा,

14. जिल्हास्तरावरुन किंवा तालुकास्तरावरुन तसेच महानगरपालिका स्तरावरुन संयुक्त शाळा अनुदान निधी विनियोग झाल्यांनतर सदरच्या शाळांकडील झालेल्या खर्चाच्या अनुषंगाने जिल्ह्याकडील एकत्रित खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी तसेच प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करुन दयावयाचे आहे.

15. उपयोगिता प्रमाणपत्र वरील रक्कम व प्रबंध पोर्टल प्रणालीवर नमूद करण्यात येणारी रक्कम यात तफावत नसणार याची खात्री उपक्रमधारक व लेखा विभाग यांनी समन्वयाने करावी.

संयुक्त शाळा अनुदान उपक्रमांच्च्या मार्गदर्शक सूचना पर्यवेक्षकीय यंत्रणा व शाळेपर्यंत पोहोच करण्यात याव्यात जणेकरुन निधीचा विनियोग योग्यरित्या होईल व त्याचे पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून संनियंत्रण करता येईल. सदरचे अनुदान हे शाळेची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन विनियोगात आणण्यात यावे, याकरीता शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ठराव घेऊन नियोजन करावे व त्याप्रमाणे सदर अनुदानाचा विनियोग करावा. कोणत्याही परिस्थितीत अवाजवी व अनावश्यक बाबींवर या अनुदानाचा विनियोग करण्यात येऊ नये. अनुदान विनियोगाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार उद्दभवणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी,

तसेच सदरचा निधी समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर आहे. त्यामुळे PM SHRI टप्पा 1 व टप्पा 2 अंतर्गत मंजूर शाळा सदर निधी विनियोगात आणू नये / आणता येणार नाही याची दक्षता घ्यावी.


गोविंद कांबळे, 8/7/2025

राज्य प्रकल्प समन्वयक तथा

सह संचालक (प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


 सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान दुसरा टप्पा ५०% टक्के करणेबाबत MPSP ने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 

समग्न शिक्षा अंतर्गत सन २०२४-२५ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या दि. ०५/०३/२०२४ रोजीच्या बैठकीत संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजूरी मिळाली आहे. सन २०२४-२५ मध्ये सर्वात वरची इयत्ता ८वी पर्यंतचे वर्ग असलेल्या एकूण ६३०१० शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकूण रु.१६३०७.२५ लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तसेच सर्वात वरची इयत्ता १०वी किंवा १२वीचा वर्ग असलेल्या एकूण १७७१ शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांसाठी एकूण रु. १०३१.४० लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

संदर्भिय पत्र क्र. ३ अन्वये या कार्यालयाकडून PM SHRI (३११) शाळा वगळून मंजूर निधीपैकी उपलब्ध तरतूदीतून तुर्तास प्राथमिक ६२७६१ शाळांसाठी ५०% निधी म्हणजे रु. ८०७४.७५ लक्ष व माध्यमिक १७०७ शाळांकरीता ५०% निधी म्हणजे रु.४९१.२० लक्ष इतका निधी संबंधित जिल्हा परिषद / महानगरपालिका यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

उपरोक्त नमूद PM SHRI (३११) शाळा वगळून मंजूर निधीपैकी उपलब्ध तरतूदीतून तुर्तास प्राथमिक ६२७६१ शाळांसाठी ५०% निधी म्हणजे रु. ८०७४.७५ लक्ष व माध्यमिक १७०७शाळांकरीता ५०% निधी म्हणजे रु.४९१.२० लक्ष इतका निधी संबंधित जिल्हा परिषद /महानगरपालिका यांना उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.

अ) इयत्ता ८वी पर्यंत वर्ग असलेल्या प्राथमिक शाळांसाठी मंजूर निधी व ५०% वितरीत करावयाच्या निधीचा तक्ता खालीलप्रमाणे:-

संयुक्त शाळा अनुदान (प्राथमिक)


उपरोक्त निधी हा केवळ समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असणाऱ्या शाळांकरीता (PM SHRI ३११ शाळा वगळून) संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वित्तरीत करण्यात यावा. जिल्हा परिषद / महानगरपालिका निहाय भौतिक व आर्थिक तरतूदीबाबतचा तक्ता (अ) व (ब) सोबत जोडण्यात आलेला आहे. जिल्ह्यांना /महानगरपालिकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी हा ज्या शाळाचा खर्च होईल अशाच शाळांना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात यावा. तथापि, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या एकूण मंजूर तरतूदीच्या मर्यादेत आणि शाळांना मंजूर असलेल्या तरतूदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी. समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व जिल्हा व महानगरपालिका यांनी सदरचा निधी प्राप्त होताच तात्काळ खर्च करुन प्रबंध पोर्टलवर माहिती अद्यावत करण्यात यावी.

मूळ प्रत मा. राज्य प्रकल्प संचालक यांच्या मान्यतेने


गोविंद कांबळे 

23/3/2025

मा. राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई,


प्रत माहितीस्तव सादर :-

1) मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई

2) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई

3) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव

१) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

३) शिक्षणाधिकारी (प्राथ), जिल्हा परिषद, सर्व जिल्हे,

४) प्रशासनाधिकारी/शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, सर्व महानगरपालिका.


समग्र शिक्षा अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांना संयुक्त शाळा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दिनांक 12 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयात तील आदेशानुसार राज्य प्रकल्प संचालकांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


-: कार्यालयीन आदेश :-


12 MAR 2024


समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय (प्राथमिक व माध्यमिक) शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान (Composite School Grant) या उपक्रमासाठी PM SHRI अंतर्गत मंजूर असलेल्या शाळा वगळून प्राथमिक स्तरावर रक्कम रु.२५,२९,८१,७५०/- (Child Limit) व माध्यमिक स्तरावर रक्कम रु.३,०६,७५,०००/- (Child Limit) असे एकूण रक्कम रु.२८,३६,५६,७५०/- (अठ्ठावीस कोटी छत्तीस लक्ष छप्पन्न हजार सातशे पन्नास) Composite School Grant या लेखाशिर्षाखाली मंजूर असलेल्या तरतूदीतून नमूद केलेल्या उपक्रमांसाठी रकमांची पडताळणी उपक्रमधारकांनी केली व अंतिम केलेल्या आकडेवारीनुसार जिल्हानिहाय निधी वितरीत करण्याकरिता जिल्हा परिषद व महानगरपालिका यांना प्राथमिक व माध्यमिक आवर्ती (Recurring - GEN, SC, ST) साठी Withdrawl limit PFMS प्रणालीवर (Child Limit) तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वितरित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद व महानगरपालिका यांनी देखील सदर निधीचे वितरण Withdrawl limit PFMS द्वारेच वितरण करणे आवश्यक आहे. मंजूर तरतूदी नुसार वितरित केलेला निधी विचारात घेऊन खर्च दिलेल्या कार्यक्रमावरच करावयाचा आहे. प्रकल्प मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तातील सूचना, FMP Manual व इतर लागू असलेले नियम यांचे पालन करून व आवश्यक मंजूरी घेऊन खर्च करण्यात यावे. निधी प्राप्त होताच त्याची पोच या कार्यालयास तातडीने देण्यात यावी.


(प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से.) 

राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.



वरील संपूर्ण कार्यालयीन आदेश विवरण पत्रासह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.