महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११००१
शिसंमापु/शिक्षक शिक्षकेत्तर/२५-२६/ टी-७/थ दे/
दि.२७/०१/२०२६
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व
३. शिक्षण निरिक्षक मुंबई (उ, द, प)
४. लेखाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, कार्यालय सर्व
५. अधीक्षक वेतन व भनिनि पथक (माध्यमिक), सर्व
विषय- संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येणा-या थकीत देयकाबाबत.
संदर्भ-शासन निर्णय क्र. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकिर्ण २४१५/(३४/१५ अर्थसंकल्प दि.१५/०७/२०१७
विषयांकित प्रकरणी संदर्भ शासन निर्णयानुसार प्रलंबित थकित देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. मुख्याध्यापक, अधीक्षक वेतन पथक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक, व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पुर्ण तपासणी करून ती देयके नियमानुसार देय असल्याची खात्री करून सदर देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर होणे आवश्यक आहे.
संदर्भ शासन निर्णयानुसार प्रलंबित थकित देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करतांना लाभार्थी कर्मचा-याची वैयक्तीक मान्यतेची खात्री तसेच ज्या कालावधीतील त्याचे देयक आहे त्या कालावधीत सदर व्यक्तीने खरोखच त्या शाळेत/सैनिकी शाळेत / उच्च माध्यमिक शाळेत काम केले होते, त्याची मान्यता बैंक डेटेड केलेली नाही याची खातरजमा करूनच देयक पुढे पाठविण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
जर थकित देयकातील लाभार्थी कर्मचा-याची एसआयटी तपासणी मान्यता चूकीची निघाली तर देयके सादर करणा-या संबधित लाभार्थी कर्मचारी मुख्याध्यापक, कर्मचारी, अधिकारी यांचे वर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश या पत्रानुसार देण्यात येत आहेत.
प्रत्येक प्रलंबित / थकित देयकाची मान्यतेची खात्री डिजीटेशन मध्ये असणा-या दस्तावेजानुसार करावी त्यांच्या मान्यतेचे मुळ दस्तवेज कार्यालयात आहे का, या बाबत खात्री करूनच देयके मान्यतेसाठी सादर करण्यात यावी.
Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 27-01-2026 11:35:01
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय, म.रा.. पुणे १.
🚨थकीत देयकाबाबत महत्त्वाची सूचना🚨
शालार्थ प्रणाली अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांचे सातवा वेतन आयोग फरकाचा हप्ता तसेच मार्च 2023 पूर्वीचे प्रलंबित वेतन व वेतन फरक याबाबतचे देयकांचे claim शालार्थ प्रणालीमध्ये करण्यात आलेली होती. यापैकी वरील यादीत दिल्यानुसार जिल्हास्तरावरून सदर claim Approved करण्यात आलेले आहेत. तसेच जी देयके कालबाह्य आहेत त्यांच्या claim अद्याप approve करण्यात आलेले नाहीत.
तरी याद्वारे आपणास कळविण्यात येते की,
ज्या शाळांचे approval करण्यात आलेली आहेत. त्या शाळांची देयके शालार्थ प्रणाली अंतर्गत तयार करून आज सायंकाळी सात वाजेपर्यंत जिल्हा लॉगिनला फॉरवर्ड करण्यात यावी.
अशी देयके फॉरवर्ड करताना खालील सूचनानुसार कार्यवाही.
📌ज्या शाळेमध्ये कालबाह्य क्लेमची एन्ट्री केलेली आहे त्या शाळांची देयके पुढील सूचनेपर्यंत तयार करण्यात येऊ नये.
📌आपण शालार्थ प्रणाली मध्ये यापूर्वी देण्यात आलेल्या पीपीटी मध्ये दाखविल्याप्रमाणे supplementary bill तयार करावे यासाठी केवळ bill generation यावर जाऊन supplementary Bill group निवडावा व Bill generate करावे.
📌बिल जनरेट केल्यानंतर बिलाचे inner page तपासून घ्यावे. यामध्ये आपण यापूर्वी स्वाक्षरीनीशी जे देयके जिल्हा कार्यालय सादर केलेले आहे ती रक्कमच inner page मध्ये येत असल्याबाबत खात्री करण्यात यावी.
📌सर्वात महत्त्वाचे देयकांचे बँक स्टेटमेंट तपासून घ्यावे बँक खाते क्रमांक व IFSC code याची खात्री करूनच देयक फॉरवर्ड करावी.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 Comments