RTE 25% Admission 2024-25 Update - सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता प्रक्रिया सुरू!

 सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता जिल्हयांतील आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणेबाबत  प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 6 मार्च 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खालील व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

शासनाच्या संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत. तसेच त्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ अधिसूचना निर्गमित झालेली असून सदर अधिसूचनेमध्ये सुधारित नियम नमूद केलेले आहेत. त्यानुसार खालील नमूद व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करण्यात यावे.

शाळा व्यवस्थापन महानगरपालिका शाळा (Municipal Corporation)

नगरपालिका/नगरपरिषद/नगर पंचायत शाळा (Nagar Palika Nagar Parishad/Nagar

Panchayat) कैन्टीमेंट बोर्ड शाळा (Contonment Board)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (Zilla Parishad (Primary)

महानगरपालिका शाळा (स्वंय अर्थसहाष्यीत) (Municipal Corporation (self funded))

जिल्हा परिषद (माजी शासकोप) (EL.Govt)

खाजगी अनुदानित (Private Alded)

स्वंयअर्थसहाय्यीत शाळा (Self Financed)

पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) (Police Welfare (Unaided))

त्यानुसार दरवर्षीप्रमाणे सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. त्याकरीता आपल्या जिल्हयातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी दिनांक ६/०३/२०२४ ते दिनांक १८/०३/२०२४ या कालावधी मध्ये करण्यात यावी. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे.

तरी आपल्या जिल्हयातील शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन विहीत कालावधीत पूर्ण करण्यात यावे, ज्या जिल्हयांतील आरटीई अंतर्गत पात्र असलेल्या शाळांचे १०० टक्के रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही त्याची सर्वस्त्री जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व प्रशासन अधिकारी, यांची राहील याची नोंद घ्यावी.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१,


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.