लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 - मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कर्तव्य

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी कर्तव्य 


प्रशिक्षण दरम्यान 

भारत निवडणूक आयोग कायदे, तरतुदी आणि अद्ययावत सुचना माहिती EVM/VVPAT कार्यप्रणाली माहिती, टपाली मतपत्रिका व निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र अर्ज नमुने व अहवाल भरणे बाबत माहिती. 


संकलन केंद्रावर

EVM तसेच इतर मतदान साहित्य ताब्यात घेणे.

सुचीनुसार साहित्य तपासणी करणे.

EVM तपासणी करणे.

टपाली मतपत्रिका घेतली असेल तर स्वतःचे मतदान करून घेणे.


मतदानापूर्वी

मतदान केंद्र उभारणी अभिरूप (मॉकपोल)

मतदान घेणे.

कंट्रोल युनिट मधुन अभिरूप मतदान नष्ट करणे.

VVPAT मधिल अभिरूप मतदान चिठ्या सील करणे.


मतदानादरम्यान.. 

मतांच्या गोपनियतेबाबत माहिती देणे.

मतदान सुरु घोषणा करणे. मतदान केंद्राध्यक्ष. 

दैनंदिनी मध्ये घटनांची नोंद घेणे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतदान स्थिती आकडेवारी कळविणे.


मतदान समाप्तीवेळी.. 

रांगेत उभ्या मतदारांना चिठ्या देणे.

 सर्व मतदान पुर्ण झाल्यावर कंट्रोल युनिट CLOSE बटण दाबणे.

• VVPAT मधिल पॉवर पॅक काढून घेणे.

EVM व नमुने सीलबंद करणे.


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024..

निवडणुकीतील महत्वाचे बदल.. 

अनुपस्थित मतदार AVSC, AVPD, AVES, AVCO साठी टपाली मतदान.

• निवडणूक कर्तव्यावर अधिकारी/कर्मचारी टपाली मतदान साठी "सुविधा केंद्र" (Facilitation Center)

• क्षेत्रिय अधिकारी साठी अहवाल 1) अहवाल VM-2 2) अहवाल VM-3.

• फोटो व्होटर स्लिप (Photo Voter Slip) ऐवजी व्होटर सुचना स्लिप (Voter Information Slip) अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपीतील AVIS (Accessible Voter Information Slip).

• चिन्हांकित मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी व प्राधिकृत अधिकारी यांनी प्रमाणित केलेल्या असतील.

• मतदार यादीच्या एका प्रतिवर वरच्या बाजूवर निवडणूक निर्णय अधिकारी/सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सही केलेले जोडपत्र 4 मधिल प्रमाणपत्र.

 • गुलाबी कागदी मोहोर तसेच हिरवी कागदी मोहोर मध्ये बदल (मतदान यंत्र मोहोरबंद करण्यासाठी पट्टी सील ABCD आवश्यकता नाही.)

. अभिरूप मतदान वेळी VVPAT मधुन निघालेल्या 7 चाचणी चिठ्ठया देखिल मॉकपोलच्या 50 चिठ्ठया सोबत काळ्या लिफाफ्यात सीलबंद करणे आवश्यक.

• प्रत्यक्ष मतदान दरम्यान CU किंवा VVPAT बॅटरी सदोष झाल्यास बदलता येणार.

• मतदान साहित्य संकलन मध्ये बदल-नवीन प्रकारे सहा पाकिटे कलर कोडसह संकलित होणार. 

मतदान सुरुवात करताना मतदान अधिकारी 2 कडील मतदार नोंदवहीत (नमुना 17 अ) मध्ये केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करून "नियंत्रण युनिट तपासणी केली आहे. व एकूण शुन्य असल्याचे आढळले आहे" अशी शाईने नोंद करणे.

मतदान केंद्राध्यक्ष व सुक्ष्म निरीक्षक मतदान केंद्रात ध्वनीरहित (silent mode) मोबाईल वापरण्यास परवानगी.

• मतदान केंद्राला भेट देणारे अभ्यागत साठी VISIT SHEET नमुना. केंद्राध्यक्ष दैनंदिनी मध्ये तपशिल देणे आवश्यक (मुद्दा 19 ब)

• विधानसभा मतदार संघातील कोणताही मतदार त्या मतदारसंघात मतदान प्रतिनिधी म्हणुन नेमणुकीस पात्र. ग्रामपंचायत प्रधान/सरपंच/पंचायत सदस्य/परिषद सदस्य/महानगरपालिका सदस्य मतदान प्रतिनिधी राहू शकतात. 

• सर्व अतिसंवेदनशील मतदान केंद्र (Vulnerable) व असुरक्षित मतदान केंद्र (Critical) एकूण मतदान केंद्राच्या किमान 50% यापैकी जे अधिक असेल तेथे वेबकास्टिंग करण्यात येईल.

 • मतदान पथक यांना देण्यात येणाऱ्या साहित्यात विविध नमुने BOOKLET स्वरुपात देण्यात येतील.

• मतदानाच्या दुसऱ्या दिवशी छाननीत मतदार नोंदवहीं (नमुना 17 अ) मधिल शेरा व तिसरा रकान्यातील ओळखपत्र किंवा इतर पुरावे नमूद केलेबाबत तपासणी होईल.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

गंभीर चुका


अभिरुप मतदानानंतर नियंत्रण युनिटाचे CLOSE बटण दाबण्यात येऊ नये.

• अभिरुप मतदानानंतर नियंत्रण युनिटावर दिसणारा निकाल व्हीव्हीपॅट चिठ्ठयांशी न जुळणे.

• अभिरुप मतदानाच्या चिठ्ठया व्हीव्हीपॅट यंत्रातून काढून न टाकणे.

• नियंत्रण युनिटामधुन अभिरुप मतदानाची आकडेवारी निरंक न करणे.

थेट प्रकाशझोतात खाली व्हीव्हीपॅट यंत्र ठेवणे.

• खुल्या खिडकीजवळ व्हीव्हीपॅट यंत्र ठेवणे.


टिप -

• मतदान केंद्राध्यक्षाने, अभिरुप मतदान घेत असतांना तेथे उपस्थित असणाऱ्या प्रतिनिधींना यंत्राचे क्रमांक दाखवावेत.

• मतदान केंद्राध्यक्षाने, मतदान केंद्रात वापरात आणलेल्या नियंत्रण युनिट, मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्राचे अनुक्रमांक व क्रमांक आपल्या नोंदवहीत लिहून घ्यावेत.


प्रशिक्षण संदर्भात संपूर्ण पीपीटी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


मतदान केंद्राध्यक्ष तपासणी सूची पीडीएफ डाउनलोड

Download


मतदान केंद्राध्यक्षांनी काय करावे काय करू नये पीडीएफ डाउनलोड.

Download


मतदान केंद्राध्यक्षासाठी निदेश पुस्तिका पीडीएफ डाउनलोड.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

3 Comments

  1. नमस्ते सर ...मा.प्रदिप जाधव सर म्हणजे आम्हा शिक्षकांसाठी दैनंदिन जीवनाचा एक भाग झाले आहे, आँनलाईन सर्व माहिती रोजच्या रोज सर्व क्षेत्रातील कुठे नाही मिळाली तरी....ती आमच्या जाधव सरांनी अँडव्हान्स पाठवलेली असते,आम्ही रोज मोबाईल ओपन केला की प्रथम जाधव सरांना शोधतो,एवढी सवय सरांची झालेली आहे,खरंच या डिजिटल काळात अशी माणसं किती महत्वाची आहे,ते यावरून समजते,...सरांना आमचा सलाम...अशीच सेवा भविष्यात सरांच्या माध्यमातून आम्हाला मिळत राहो,हीच मनोमन सदिच्छा.......!!धन्यवाद!!!

    ReplyDelete
  2. सरजी 🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.