महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर (सर्व व्यवस्थापनाच्या) कर्मचाऱ्यांना आपला दर महिन्याचा पगार किंवा वेतन प्रमाणपत्र मिळवा शालार्थ प्रणाली वरून.
प्रत्येक महिन्यांची Salary Slip आता ऑनलाईन पाहता येणार आहे.
आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता.
यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID.(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)
यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा
https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
या वेबसाईटला जा.
लॉग इन पेजवर जाऊन Username म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.
तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.
लॉग इन केल्यानंतर Old password
ifms123 हा टाका.
New password बनवा
(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).
तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.
लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा.
2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा.
शालार्थ वेतन प्रमाण प्रणाली वरून डाऊनलोड केलेली पे स्लिप वर आपल्या कार्यालयीन प्रमुख घेतल्यानंतर कोणत्याही व्यवहारा साठी सदर पे स्लिप वापरता येते.
महत्त्वाची सूचना
आपण शालार्थ प्रणालीवर सेट केलेला पासवर्ड हा काळजीपूर्वक लक्षात ठेवावा किंवा लिहून ठेवावा कारण जर पासवर्ड विसरला तर शालार्थ प्रणालीमध्ये सध्याच्या परिस्थिती मध्ये तरी पासवर्ड रिसेट करता येत नाही.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
3 Comments
Shaley kamgar mandhan wad kab tak hogi
ReplyDeleteDon't know 🙏
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete