भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना एकवेळचे (One time) मानधन अदा करणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 28 जुलै 2016 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निमित केला आहे
भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना एकवेळचे (One time) मानधन अदा करणे.
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक:- ईएलआर-२०२६/प्र.क्र.८५/नि-६ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २८ जुलै, २०२६
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रः ईएलआर-२०१९/प्र.क्र.९१८/१९/३३. दिनांक २६ सप्टेंबर, २०१९
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, ईएलआर-२०२५/प्र.क्र.७०/२५/नि-६, दिनांक ०१ सप्टेंबर, २०२५
३) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. २३/बीएलओ /२०२६-ईआरएस, दिनांक १४ जुलै, २०२६.
प्रस्तावना:-
भारत निवडणूक आयोगाने दिनांक १४ मे, २०२६ रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह १६ राज्य व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये घोषित केला आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरु झाली आहे.
२. विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना घरोघरी जाऊन सर्व मतदारांशी संपर्क साधून मतदार याद्यांचे सखोल पुनरिक्षण करावयाचे आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे मतदारांच्या घरोघरी जाऊन गणना पत्रक (Enumeration form) वाटप करणे, मतदारांनी गणना पत्रक (Enumeration form) भरल्यावर मतदारांकडून फॉर्म गोळा करणे, फॉर्मचे डिजिटायझेशन करणे इ. कामे करीत आहेत. तसेच, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमादरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून बिनचूक व विहीत कालावधीत काम करुन घेण्याकरीता, त्यांच्यावर देखरेख करण्याकरीता, त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) नियुक्त करण्यात आले आहेत. सदर कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) हे त्यांची मूळ कार्यालयीन कामे सांभाळून करीत आहेत.
३. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक १४.०७.२०२६ च्या पत्रान्वये, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना प्रत्येकी रु.६,०००/- इतके एकवेळचे (One time) मानधन मंजूर केले आहे. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना मानधन देण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत क्षेत्रीय स्तरावर कराव्या लागणाऱ्या कामाकरीता प्रत्येकी रु.६,०००/- इतके एकवेळचे (One time) मानधन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर मानधन त्यांना देण्यात येणाऱ्या नियमित मानधनाच्या व्यतिरिक्त राहील.
४. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च मागणी क्र. ए-२, लेखाशिर्ष "२०१५-निवडणूका, १०३-मतदारांच्या याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण (००) (०१) मतदार याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण (२०१५००३२)", "१३ कार्यालयीन खर्च, या उद्दिष्टाखाली सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
५. सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र. अनौप ४३८/व्यय-४, दिनांक १७.०४.२०२६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२६०७२८१७४२०६२७०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
PRASHANT ATMARAM NAVGE
(प्रशांत नावगे)
अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
भारताचा निवडणूक आयोग
निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली-110001
क्रमांक २३/बीएलओ/२०२६-ईआरएस
दिनांक: १४ जुलै २०२६
मुख्य निवडणूक अधिकारी,
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, दिल्लीचे एनसीटी, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा आणि उत्तराखंड
मतदार यादीची उप-विशेष सघन पुनर्तपासणी (SIR) - बीएलओ आणि पर्यवेक्षक यांना मानधन मंजूर करण्यासंबंधी.
लेख
मॅडम/सर.
मला असे कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत की, विशेष सघन पुनरावलोकन (SIR) कार्यवाहीमध्ये समाविष्ट असलेल्या कामाचे प्रमाण आणि स्वरूप लक्षात घेता, आयोगाने या कार्यवाहीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक BLO आणि BLO पर्यवेक्षकाला त्यांच्या वार्षिक मानधनाव्यतिरिक्त 6,000/- रुपयांचे एकरकमी मानधन देण्यास मान्यता दिली आहे.
२. अनुपालनासाठी ही सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणली जाईल.
तुमचा विश्वासू,
(पवन दिवाण)
सचिव
विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून शिक्षकांच्या नियुक्ती व शाळांच्या वेळेबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचा आदेश दि ०७/०७/२०२६ पुढील प्रमाणे.
क्र. शिसंमा-२६/म.के.अ./निवडणूक /2004028
दि. 07 JUL 2026
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व
२) प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिका सर्व
३) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका
४) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषदा, सर्व
५) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
विषय :- विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून शिक्षकांच्या नियुक्ती व शाळांच्या वेळेबाबत.
संदर्भ :- मा. उपसचिव तथा सह मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र.ईएलआर-२०२६/प्र.क्र.७०/निवडणूक-६, दि.०३/०७/२०२६
विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत राज्य शासकीय / स्थानिक प्राधिकारी / कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनाही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या दोषविरहीत व अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण सुमारे २४ वर्षांनंतर राबविण्यात येत आहे. सदर काम राष्ट्रीय कर्तव्य असुन भास्त निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या कालमर्यादेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सबब, शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज पार पाडण्याकरीता त्यांना पुरेसा वेळ मिळावा, तसेच सदर काम विहित कालावधीत पूर्ण व्हावे आणि त्यांच्यावर कामाचा ताणही येवू नये, याकरीता सर्व शाळा प्रशासनांना आपल्या स्तरावरुन सूचना देण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत.
अ) त्यानुषंगाने आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात. विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त शिक्षकांच्या अध्यापनाचे नियोजन करताना त्यांच्या शिकवणीच्या तासिका शक्यतो कमीत कमी ठेवाव्यात व त्या प्राधान्याने सलग ठेवून शक्यतो शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरविण्याचे नियोजन दि.३० जुलै, २०२६ पर्यंत करण्यात यावे. जेणेकरुन संबंधित शिक्षकांना त्यांचे शैक्षणिक कार्य सलगपूर्ण करुन उर्वरित वेळेत (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेली जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडता येईल.
ब) ज्या शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नाही, अशा शिक्षकांनी आवश्यकतेनुसार BLO म्हणून नियुक्त शिक्षकांना शैक्षणिक व संबंधित कामकाजामध्ये सहकार्य करावे, तसेच शाळा प्रमुखांनी अशा प्रकारे अंतर्गत कामाचे नियोजन करावे की BLO म्हणून नियुक्त शिक्षकांवर अतिरीक्त कामाचा ताण पडणार नाही.
वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, तसेच आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अनुपालन अहवाल विहित नमुन्यात व विहित कालावधीत शिक्षण संचालनालयास सादर करण्यात यावा. सदर सूचना तात्काळ अंमलात आणण्यात याव्यात.
Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 07-07-2026 12:27:38
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत :- १) मा.उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांना माहितीस्तव सविनय सादर.
२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांना माहितीस्तव
सविनय सादर.
३) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
४) मा. जिल्हाधिकारी, सर्व यांना माहितीस्तव सविनय सादर.
५) मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व यांना माहितीकरीत सादर,
६) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा, सर्व यांना माहितीकरीत सादर.
SIR कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून शिक्षकांच्या नियुक्तीबावत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयाने दिनांक 3 जुलै 2026 रोजी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय
क्रमांक : ईएलआर २०२६/प्र.क्र. ७०/निवडणूक-६ सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ०३ जुलै, २०२६.
प्रति. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
विषय : विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision- SIR) कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून शिक्षकांच्या नियुक्तीबावत.
संदर्भ : या कार्यालयाचे समक्रमांकाचे दिनांक २७ जून, २०२६ रोजीचे पत्र.
महोदय,
भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक १४.०५.२०२६ रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision- SIR) कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये दिनांक २० जून, २०२६ पासून सुरु झाला आहे. दिनांक ३० जून, २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer- BLO) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांना गणना प्रपत्र देणे व भरुन घेण्याची कार्यवाही करत आहेत.
२. विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत राज्य शासकीय/ स्थानिक प्राधिकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनाही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल सिव्हील अपील क्र. ५६५९/२००७ (भारत निवडणूक आयोग विरुध्द सेट मेरी स्कूल व इतर) या प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशानुसार भारत निवडणूक आयोगाने दिनांक २८.०१.२००८ च्या पत्रान्वये शिक्षकांना रजेच्या दिवशी, अशैक्षणिक दिवशी तसेच अशैक्षणिक तासांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची कर्तव्ये पार पाडण्याबाबत सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
3. मा. सर्वोच्च न्यायालयाचे वरील प्रकरणी दिलेले आदेश तसेच त्यानुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या सुचना विचारात घेऊन तसेच शिक्षकांच्या अध्यापन कामामध्ये खंड पडु नये या कारणास्तव विशेष सखोल पुनरिक्षणाच्या कामासाठी (SIR) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना सुट्टीच्या दिवशी तसेच शैक्षणिक कर्तव्याच्या वेळेनंतर सोपविण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना या कार्यालयाच्या दिनांक २७.०६.२०२६ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत. (पत्राची प्रत सोबत जोडली आहे.)
४. विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या दोषविरहीत व अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण सुमारे २४ वर्षांनंतर राबविण्यात येत आहे. सदर काम राष्ट्रीय कर्तव्य असुन भारत निवडणूक आयोगाने विहीत केलेल्या कालमर्यादेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सबब, शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज पार पाडण्याकरीता त्यांना पुरेसा वेळ मिळावा, तसेच सदर काम विहित कालावधीत पूर्ण व्हावे आणि त्यांच्यावर कामाचा ताणही येवू नये,
याकरीता सर्व शाळा प्रशासनांना आपल्या स्तरावरुन खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात, अशी आपणांस विनंती आहे.
अ) विशेष सखोल पुनरिक्षणाच्या कालावधीत, ज्या शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे त्यांच्या शिकवणीच्या तासिका शक्यतो कमीत कमी व सलग कालावधीत ठेवण्यात याव्यात जेणेकरुन सदर शिक्षकांना त्यांचे दिवसाचे शैक्षणिक काम सलग पूर्ण करुन उर्वरित वेळेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कर्तव्य पार पाडता येईल.
ब) ज्या शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती देण्यात आलेली नाही, अशा शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना त्यांच्या BLO च्या कामात सहाय्य करण्याबाबत सूचित करण्यात यावे. ज्यायोगे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांवर अतिरीक्त भार येणार नाही.
आपला,
(मनोहर पारकर)
उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य,
प्रतः
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीस्तव अग्रेषित.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकाच्या नियुक्तीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 27 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय
क्रमांक :- ईएलआर-२०२६/प्र.क्र.७०/२६/३३
सामान्य प्रशासन विभाग,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २७ जून, २०२६
प्रति,
१) आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई व मुंबई उपनगर.
२) सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर.
३) सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून).
विषय :- मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकाच्या नियुक्तीबाबत.
महोदय/महोदया,
भारत निवडणूक आयोगाने दिनांक १४ मे, २०२६ रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्याचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह १६ राज्य व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये घोषित केला आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरु झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अधिनस्त निवडणूकांचे संचालन करणे तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या तयार करणे व त्यांचे वेळोवेळी पुनरिक्षण करणे या निवडणूक विषयक कामासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ अन्वये तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाच्या पर्यवेक्षण, नियंत्रण व आदेशानुसार मुख्य निवडणूक अधिकारी व अधिनस्त जिल्हा निवडणूक अधिकारी/मतदार नोंदणी अधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून निवडणूक विषयक कामे केली जातात.
२. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम १३ ब नुसार विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या तयार करणे व त्यांचे पुनरिक्षण करणे याबाबतची जबाबदारी मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यातील कलम १३ ब (२) नुसार या प्रयोजनार्थ आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून करण्यात येते. निवडणूकांसाठी मतदारयाद्या तयार करणे व त्यांचे वेळोवेळी पुनरिक्षण करणे हे निवडणूक विषयक महत्त्वाचे कामकाज आहे. भारत निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांच्या विशेष पुनरिक्षणाचा कार्यक्रम नियमितरित्या राबविण्यात येतो. त्याचप्रमाणे मतदारयाद्याचे अद्ययावतीकरण ही सतत सूरु असणारी प्रक्रिया आहे व त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer) कार्यरत असणे आवश्यक आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या नियुक्त्याबाबत भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक ०५ जून, २०२५ रोजीच्या सुधारित निर्देशानुसार राज्य शासनाच्या /स्थानिक प्राधिकरणांच्या कोणत्याही गट 'क' किंवा त्यावरील कर्मचाऱ्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून संबंधित मतदार नोंदणी अधिकारी नियुक्ती करु शकतो. राज्य शासन/स्थानिक प्राधिकरणाचे गट 'क' चे कर्मचारी उपलब्ध न झाल्यास अंगणवाडी, कंत्राटी शिक्षक किंवा केंद्र शासन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत तरतुद आहे. वरील निर्देशाच्या अनुषंगाने, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आपल्या जिल्हयांतर्गत राज्य शासकीय कर्मचारी/स्थानिक प्राधिकरणाचे कर्मचारी यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मोठयाप्रमाणात शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्याबाबत खालील मुद्दयांकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.
अ. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणावरील अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २७ येथे खालील प्रमाणे तरतूद आहे.
"No Teacher shall be deployed for any non-educational purposes other than the decennial population census, disaster relief duties or duties relating to elections to the local authority, or to the State Legislatures or Parliament, as the case may be."
वरील तरतूदीनुसार शिक्षकांना निवडणूक विषयक कामकाजाठी नियुक्त करण्यास कोणताही प्रतिबंध नाही. मतदारयाद्या तयार करणे व त्याचे पुनरिक्षण करणे हा निवडणूक विषयक कामकाजाचा अविभाज्य भाग आहे. याअनुषंगाने मा. अलाहबाद उच्च न्यायालयाने Writ A No.४५०५/२०२४ (Dhruvika Pandey vs Additional Chief Secretary & others) याप्रक्ररणामध्ये खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे.
I have carefully perused the judgment of Sunita Sharma (supra) and observations therein. It does not impose any bar to appoint petitioner being Assistant Teachers to work as Booth Level Officer a work relating to elctions, rather Section 27 of Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 has specifically carved out an exception that teacher could be appointed to conduct duties relating to elections to the local authority, or to the State Legislatures or Parliament as the case may be.
ब. मा.राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठासमोरील सिव्हील रिट याचिका क्र. १७९४५/२०२१ (श्री. महेश स्वामी विरुध्द राजस्थान) या प्रकरणात सुध्दा उपरोक्त कलम २७ च्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे.
"A bare reading of the above reveals that the section, which deals with prohibition of deployment of teachers for non-educational purposes, by way of execption provides that the teachers can, inter-alia, be deployed for duties relating to elections to the local authority or the State Legislature or Parliament, as the case may be and it cannot be said that the work of BLO would not fall within the said category.
In view therof, the various plea sought to be raised in the petitons seeking mandate to the respondents not to deploy teachers as BLOs has no substance."
क. मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल सिव्हील अपील क्र. ५६५९/२००७ (भारत निवडणूक आयोग विरुध्द सेंट मेरी स्कूल व इतर) याप्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयाने खालील प्रमाणे आदेश दिलेले आहेत.
"33. We would, however, notice that the Election Commission before us also categorically stated that as far as possible teachers would be put on electoral roll revision works on holidays, non-teaching days and non-teaching hours: whereas non-teaching staff be put on duty any time. We, therefore, direct that all teaching staff shall be put on the duties of roll revisions and election works on holidays and non-teaching days. Teachers should not ordinarily be put on duty on teaching days and within teachin hours. Non-teaching staff, however, may be put on such duties on any day or at any time, if permissible in law.
३. मा. सर्वोच्च न्यायालयाचे वरील आदेश विचारात घेवून भारत निवडणूक आयोगाने दिनांक २८.०१.२००८ च्या पत्रान्वये शिक्षकांना रजेच्या दिवशी, अशैक्षणिक दिवशी तसेच अशैक्षणिक तासांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची कर्तव्ये पार पाडण्याबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. (प्रत सोबत जोडली आहे.)
४. काही जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांनी शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती देतांना शिक्षकांच्या सेवा कायमस्वरुपी अधिग्रहीत करण्याचे आदेश निर्गमित केले असून, संबंधित आस्थापनांना सदर शिक्षकांना पुर्णवेळेकरीता कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले असल्याचे निर्दशनास आले आहे. वेळोवेळी यासंदर्भात दाखल झालेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामाच्या दिवशी व शैक्षणिक कामाच्या वेळेत निवडणूक विषयक कामकाज न देता सुट्टीच्या दिवशी तसेच, शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर निवडणूक विषयक कामकाज देण्याबाबत आदेशित केलेले आहे. विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्या दोषविरहीत व अचूक करण्यासाठी तसेच, हा राष्ट्रीय कार्यक्रम योग्यरितीने व विहीत कालमर्यादेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकांची भुमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. विशेष सखोल पुनरिक्षणाचे कामकाज विहीत कालावधीत पुर्ण करणेही तितकेच महत्वाचे असल्याने, शिक्षकांना संपूर्ण वेळेसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती न देता त्यांना सुट्टीच्या दिवशी तसेच, शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कामकाज करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात व मा. न्यायालयांच्या निर्देशाचे योग्यरितीने पालन करण्यात येईल, याची कृपया दक्षता घ्यावी.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील नियम २९ नुसार स्थानिक प्राधिकरणाच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी पुर्णवेळेकरीता अधिग्रहित करता येऊ शकतील. असे करतांनाही, शिक्षक या प्रवर्गाबाबत मा. न्यायालयांच्या आदेशाचे पालन करणे अनिवार्य राहील.
आपला,
(मनोहर पारकर)
उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
सोबत : वरील प्रमाणे
प्रत,
सर्व उप जिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी.
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयातील दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी आदेशानुसार लोकसभा निवडणूका-2024 च्या कामाकरिता तसेच मतदार याद्यांच्या अद्यावती करणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी वर्गासंदर्भात पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या दि.२०.०२.२०२४ च्या पत्रान्वये शालेय विद्यार्थाचे शैक्षणित नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना आगामी लोकसभा/विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीकरिता ०५ दिवसांपेक्षा अधिक काळ जुंपण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे श्री. कपिल पाटील, विपस, यांनी १०वी व १२वी च्या परिक्षा तोंडावर असल्याने शिक्षकांना BLO कर्तव्यातुन तातडीने मुक्त करण्याची विनंती केली आहे.
या अनुषंगाने आपले लक्ष भारत निवडणूक आयोगाच्या दि.०४.१०.२०२२ च्या पत्राकडे वेधण्यात येत आहे (प्रत सोबत जोडली आहे). त्यानुसार मतदार याद्या तयार करणे व त्यांच्या पुनरिक्षणाच्या कामासाठी नियुक्ती करावयाच्या मतदान केंद्रस्तरिय अधिका-यांच्या (BLO) नियुक्त्या करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार सदर पत्रातील परि.१.२ मध्ये १३ प्रकारच्या प्रवर्गातील शासकीय/निम शासकीय कर्मचा-यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करता येते. त्याच प्रमाणे सदर १३ प्रवर्गातून आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध झाल्यास त्याच पत्रातील परि.१.३ मध्ये नमूद ०४ प्रवर्गातील कर्मचारी सुध्दा BLO म्हणून घेता येतात. त्या मध्ये केंद्र शासनाचे कर्मचारी, गट-ब अधिकारी, इच्छूक असलेले सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे.
मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाच्या कामासाठी शिक्षकांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने भानिआने दि.०५.०९.२०१६ च्या पत्रान्वये काही सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच पाठविण्यात आलेल्या आहेत. सदर पत्राची प्रत सुलभ संदर्भासाठी सोबत जोडली आहे. त्यानुसार सेंट मेरि स्कूल व इतर या न्यायालयीन प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक कर्तव्यावरील कर्मचा-यांना (teaching staff) केवळ रजेच्या दिवशी, शैक्षणिक काम नसलेल्या दिवशी (non-teaching days) तसेच शैक्षणिक काम नसलेल्या वेळेत (non-teaching hours) मतदार यादीच्या पुनरिक्षणाचे काम देता येईल.
त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.३३५/२०१३ (S.P. R. J. Kanya Shala Trust Vs. ECI) या न्यायालयीन प्रकरणात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम २९ व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम १५९ अन्वये उपलब्ध करुन द्यावयाच्या कर्मचारी वर्गा संदर्भात निर्णय दिलेला आहे. त्यापैकी कलम २९ मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन असून कलम १५९ सदर कलम प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामासाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील आहे. त्यानुसार खाजगी अनुदानित/विना अनुदानित शाळांतील (Private aided/non-aided Schools) शैक्षणिक तसेच अशैक्षणिक कर्मचारी वर्ग प्रत्यक्ष निवडणूकीच्या कालावधीत ०३ दिवस प्रशिक्षणाकरिता व ०२ दिवस मतदानाच्या दिवसाकरिता उपलब्ध करुन देण्याबाबतची तरतूद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच श्री. कपिल हरिश्चंद्र पाटील, विपस यांच्या पत्रातील आशय विचारात घेता फेब्रुवारी ते एप्रिल हा कालावधी शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचा कालावधी आहे. याच कालावधीमध्ये विविध शाळांच्या परिक्षा घेण्यात येत असतात. त्यामुळे सरसकट शिक्षक वर्गाला निवडणूक कर्तव्यार्थ तसेच मतदार यादीच्या कामासाठी कायमस्वरूपी काम देणे हे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे ठरू शकते ही त्यांची भावना रास्त स्वरुपाची वाटते. मात्र, निवडणूकीचे कामही महत्वाचे व. तातडीचे असल्याने तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील विवक्षित तरतूदी नुसार या प्रयोजनार्थ संबंधित स्थानिक प्राधिकारी संस्थेने तसेच शासनाने आवश्यक तो कर्मचारी उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे. मात्र, सदर कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देत असताना शिक्षकांव्यतिरिक्त भानिआच्या दि.०४.१०.२०२२ च्या पत्रात नमूद केलेल्या अन्य प्रवर्गातील कर्मचारी वर्ग सुध्दा उपलब्ध करुन देता येईल.
सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने भानिआने दिलेले आदेश विचारात घेऊन मा. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी या संदर्भात तातडीने एकत्रित बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी वर्ग अधिगृहित करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीने उपाययोजना करावी/निर्णय घ्यावा. त्यामध्ये इच्छूक सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांना BL.O ची ड्युटी देण्याबाबत सुध्दा पर्याय वापरण्यात यावा. त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्तव्यार्थ असलेल्या कोणत्याही कर्मचा-यास निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्ती दिल्यास शैक्षणिक दिवशी (teaching
days) व शैक्षणिक वेळी (teaching hours) निवडणूकीचे काम दिले जाणार नाही, याबाबतही दक्षता घेण्यात यावी.
आपला,
(श्रीकांत देशपांडे)
अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.













2 टिप्पण्या
Thanks sir
उत्तर द्याहटवाWelcome🙏
हटवा