शिक्षक पदभरतीबाबत प्रसिध्दीपत्र
आजची कार्यवाही -
पवित्र पोर्टलवर दिनांक ०५/०२/२०२४ पासून सर्व व्यवस्थापनांच्या जाहिराती डाऊनलोड करण्यासाठी होम स्क्रिनवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच उमेदवारांच्या लॉगीनवर त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पोर्टलवरील एकूण जाहिरातीनुसार उमेदवाराच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती व प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
उमेदवारांना पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसतील, अशा उमेदवारांनी दिनांक ५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून, त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेली माहिती पडताळून पहावी. तरीही पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्यास, विभागाने पुरविलेल्या ईमेलवर थोडक्यात संदेश पाठवावा. त्यामध्ये त्यांचा परीक्षा क्रमांक व नाव आवर्जुन नोंद करावे. सदर ईमेलवरील संदेशांना योग्य उत्तरे दिली जात आहेत. ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी प्रतिक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
शंका समाधान -
१. इ. ६ वी ते ८ वी व इ ९ वी ते १० वी गटातील भाषा विषयासाठी अर्हतधारक उमेदवाराने ज्या भाषा विषयातून पदवी प्राप्त केली असेल, तसेच इ.११ वी ते १२ वी या गटातील पदांसाठी ज्या भाषा विषयातून पदव्युत्तरपदवी प्राप्त केली असेल, अशा उमेदवारांना सर्व माध्यमांच्या व्यवस्थापनांचे त्या त्या भाषा विषयाचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. त्यामुळे वर नमूद अर्हता असेल व प्राधान्यक्रम जनरेट होत असतील, तर उमेदवारांनी असे प्राधान्यक्रम लॉक करण्यास हरकत नाही.
२. सन २०१७ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार सन २०१९ मध्ये पदभरती करताना शासन पत्र दिनांक २२/०२/२०१९ नुसार ज्या जिल्हा परिषदांकडे अनारक्षित प्रवर्गाच्या जागा जाहिरातीसाठी उपलब्ध नाहीत, तेथे पदभरती करताना ५० टक्के पदभरती करण्याचे शासन निर्देश होते. त्यानुसार तत्कालिन परिस्थितीत ती कार्यवाही झाली आहे. याबाबत मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक ६७०१/२०१९ दाखल असून ती सध्या प्रलंबित आहे. यास्तव सद्यःस्थितीत याबाबत कार्यवाही करता येत नाही.
३. बिंदुनामावल्या माध्यमनिहाय ठेवण्यात येतात व त्यानुसार पोर्टलवर बिंदुनामावल्यांमधील रिक्त पदासाठी संबंधित व्यवस्थापनांकडून जाहिराती देण्यात येतात. त्या त्या माध्यमातील अर्हताधारक उमेदवार अशा रिक्त पदांसाठी पात्र असतात. त्यामुळे एका माध्यमातील रिक्त पदे अन्य माध्यमासाठी वर्ग करता येत नाहीत. उदा., उर्दू माध्यमाच्या जाहिरातीतील काही आरक्षणाची पदे रिक्त असतील, तर अशी रिक्त पदे अन्य माध्यमासाठी वर्ग करता येत नाहीत.
४. उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे चुकीचे प्राधान्यक्रम जनरेट होत असतील, तर उमेदवाराने असे चुकीचे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत. याबाबत पवित्र पोर्टलवर यापूर्वीच मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
सर मी स्वयंघोषणा प्रत्र पून भरले नसल्यामुळे प्राधान्य क्रम आले नाही सर काही मार्ग सुचवा
ReplyDeleteपरीक्षा परिषदेला ई-मेल द्वारे संपर्क करावा
Delete