असर चा असर पर्यवेक्षकीय यंत्रणेवर? - शिक्षण व्यवस्थेच्या पर्यावेक्षकीय यंत्रणेला राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या सूचना

 असर २०२३ अहवालाच्या पार्शभूमीवर शिक्षण व्यवस्थेच्या पर्यवेक्षणाची यंत्रणा मजबूत करण्याबाबत. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. ३१ जानेवारी, २०२४.

प्रथम या संस्थेने दि.१७ जाने, २०२४ रोजी प्रसिध्द केलेला (ASER २०२३: Beyond Basics) अहवाल


परिपत्रक


संदर्भाधिन अहवालान्वये देशातील २६ राज्यातील २८ जिल्ह्यातील १४ ते १८ वयोगटातील ३४७४५ युवक-विद्यार्थी यांच्या नमूना निवडी आधारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे परिणाम प्रसिध्द करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील नांदेड (ग्रामीण) या जिल्ह्यातील ६० गावातील १३७४ युवकांची नमूना निवड करण्यात आली होती. सदर सर्वेक्षणासाठी कृती कौशल्य, मूलभूत क्षमता तसेच डिजिटल साक्षरता व कौशल्य हे प्रमूख निकष निर्धारित करण्यात आले होते. यापैकी कृती कौशल्य वगळता मूलभूत क्षमता व डिजिटल साक्षरता व कौशल्य यानिकषाच्या आधारावरील नांदेड (ग्रामीण) या जिल्ह्याची व पर्यायाने राज्याची कामगिरी निराशाजनक आहे. हे सर्वेक्षण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित असले तरी व ते काही मोजक्या निकषांच्या आधारे करण्यात आले असले तरी, त्यातून संपूर्ण राज्याच्या ग्रामीण भागातील स्थितीचे आकलन होऊ शकते.


२. शासन व अधिनस्थ संस्था शैक्षणिक गुणवत्ता वाढी संदर्भात पुरेपूर प्रयत्न करित असताना अशा प्रकारचे परिणाम समोर येणे हे चिंताजनक आहे. याची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात येत असून पर्यवेक्षकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.


अ) केंद्रप्रमुखांनी त्यांच्या अधिनस्थ शाळांना सातत्याने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक भेटी (Surprise Visit) द्याव्यात.


आ) कोणत्याही इयत्तेतील विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी जाणून घेण्यासाठी त्यांनी इयत्तेनुसार चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना कितपत आकलन झाले आहे याची तपासणी करावी.


इ) उपरोक्त प्रमाणे केलेल्या तपासणीचा अहवाल असमाधानकारक असल्यास संबंधित शिक्षकाला अधिकच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याची शिफारस त्यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याकडे करावी.


ई) शिक्षणाधिकाऱ्यानी उपरोक्तप्रमाणे शिफारस प्राप्त झाल्यास संबंधित शिक्षकास अधिकच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे पाठवावे.


उ) शिक्षकाने अतिरीक्त प्रशिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत फारशी वाढ झाली नसल्याची बाब निदर्शनास आल्यास शिक्षणाधिकाऱ्याने तशा आशयाचा अहवाल यथास्थिती शिक्षण संचालक, प्राथमिक / माध्यमिक यांना सादर करावा.


ऊ) संबंधित शिक्षणाधिकाऱ्याने केंद्रप्रमुखाच्या उपरोल्लेखित पर्यवेक्षणाच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवावे व त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल दरमहा प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी.


3. सदरचे आदेश तात्काळ प्रभावाने अंमलात येतील व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची असेल.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०१३११२३५५८२३२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(शरद माकणे)

 कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन



वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.