पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती 2022 दिनांक 21 फेब्रुवारी 2024 चे नवीन अपडेट - संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण सुरू! संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने!

दिनांक २१/०२/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


• पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदींनुसार करण्यात येत आहे. या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक १४/०२/२०२४ अखेर प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत.


• उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयाचे गट, माध्यम, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - २०२२ मध्ये प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण, विषय इत्यादी बाबींची संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे.


• संगणकीय आज्ञावलीचे परीक्षण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणतत्ता यादी जाहीर करण्यात येईल.


• सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सूरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे.




 संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने! 


दिनांक १८/०२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शंका समाधान


• शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे. अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याच्या तरतुदी विचारात घेवून उमेदवारांचे योग्यक्रम तपासण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

• शिक्षक पदभरती प्रकरणी मा. न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत, याबाबत उचित दक्षता घेणेबाबतची विनंती मा. उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे.

• शिक्षक भरती आता महत्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था/जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे.

• असे असतानाही अभियोग्यताधारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करुन देतो जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासने देवून फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. याबाबींकडे सर्व अभियोग्यताधारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

• संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेवून काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करु शकतात. या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्याचे टेलीफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल.

• दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांचेवर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगरणी ठेवणेत येत आहे.

• सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सूरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे.


वरील सूचना पवित्र पोर्टलवर देखील उपलब्ध आहेत.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.