एक पेड माँ के नाम २.० अंतर्गत शाळांमधील वृक्षारोपण सहभाग वाढवून उद्दिष्ट पूर्ती करणेबाबत आदेश २४/०९/२०२५

 एक पेड माँ के नाम २.० अंतर्गत शाळांमधील वृक्षारोपण सहभाग वाढवून उद्दिष्ट पूर्ती करणेबाबत म.प्रा.शि.प. मुंबई यांचेपत्र क्र. मप्राशिप / सशि/2024-25/२८४८ दि. २३/९/२०२५ नुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, सन 2020 नुसार शालेय शिक्षणाच्या माध्यमातून एकात्मिक पर्यावरण विषयक जागरूकता सातत्यपूर्णपणे विद्यार्थ्यांमध्ये टिकवून ठेवून नवोपक्रमशील असे विशिष्ट कौशल्ये आणि क्षमता विकसित करून उत्कृष्ट, उत्पादनशील नागरिक निर्माण करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने, इको क्लब स्थापना स्थापना करणे व एक पेड माँ के नाम२.० हे पर्यावरणविषयक उपक्रम शाळांमध्ये राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. हे आपणास अवगत आहेच. सदर उपक्रमांचा वरीष्ठ स्तरावरून प्राधान्याने आढावा घेतला जात आहे.

"एक पेड माँ के नाम Plant 4 Mother 2.0" या शिर्षांतर्गत जागतिक पर्यावरण दिना निमित्त दि.05.06.2025 रोजी देशभरात एक राष्ट्रव्यापी वृक्षारोपण चळवळ म्हणून सुरू करण्यात आली आहे. सर्व शाळांव्दारे दि.०५.०६.२०२५ ते दि.३०.०९.२०२५ या कालावधीत देशातील विविध कृषीक्षेत्रात लागवडीच्या हंगामात सुसंगतपणे सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहीमेत देशातील शाळा महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्थाही सहभागी होत आहेत. शाळांमधील वृक्षारोपणासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग (DOSEL) च्याव्दारे विकसित केलल्या इको क्लब्स फॉर मिशनलाइफ पोर्टलवर (https://ecoclubs.education.gov.in) माहिती गोळा होत आहे.

याबाबत देण्यात आलेल्या सविस्तर सूचनांनुसार "एक पेड मां के नाम 2.0" अंतर्गत सदर रोप लागवड करताना विद्यार्थी माता व रोप असे छायाचित्र घेऊन इको क्लब पोर्टलवर अपलोड फोटो अपलोड करणेबाबत सर्व शाळांना सूचना निर्गमित केल्या आहेत.

याबाबत इको क्लब पोर्टल निर्माण करण्यात आले असून त्यामध्ये सदर उपक्रमांची नोंद घेणेबाबत राज्यस्तरावरून वेळोवेळी online meeting द्वारे व youtube link द्वारे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. त्यानुसार https://ecoclubs.education.gov.in पोर्टलवर शाळांमध्ये एक पेड मां के नाम 2.0' शिर्षातंर्गत कार्यवाही बाबत करणे बाबत सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. तरी याबाबत पुढीलप्रमाणे सूचनाद्वारे उपक्रमाचा वेळोवेळी आढावा घेऊन अंमलबजावणी गतिमान करणेबाबत मार्गदर्शन करावे.

याबाबत एक पेड माँ के नाम अंतर्गत पंचायत समिती निहाय शाळा व शाळांनी लागवड करावयाच्या रोपांच्या संख्येचे पंचायत समिती निहाय उद्दिष्ट प्रपत्र अ नुसार सोबत जोडले आहे. आपल्या तालुक्या करीता प्रति शाळा ७० रोपे याप्रमाणे उद्दिष्ट निर्धारीत केले आहे. तथापि दिनाक 9/7/2025 रोजीच्या झूम मीटिंग मध्ये आदेशित केल्यानुसार आपल्या तालुक्याचे एकूण निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेच्या पटसंख्येच्या प्रमाणात (शाळेचा पट, रोप लागवड करणेसाठी उपलब्ध जागा, लागवडीसाठी उपलब्ध होणारी रोपे इत्यादी बाबी विचारात घेऊन) शाळांना उद्दिष्ट ठरवून द्यावे. व त्याप्रमाणे नियोजन करणेबाबत शाळांना सूचना द्याव्यात, व 'एक पेड मां के नाम 2.0 उपक्रमाचे उद्दिष्ट निर्धारित करून द्यावे जेणेकरून आपल्या तालुक्याला दिलेले साध्य पूर्ण होईल.

त्या अनुषंगाने तालुका नोडल अधिकारी /संबंधित विषय सांभाळणा-या विषयसाधनव्यक्ती यांना अनुधावनासाठी तालुकानिहाय, शाळानिहाय शाळांची माहिती नियमितपणे व्हॉटसअप ग्रुप वर पाठविण्यात येते. तसेच तालुका इमेल वर सुद्धा पाठवण्यात येते.

तथापि आजमितीस इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवरील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता जिल्ह्यातील 2261 शाळांनी 105789 रोपांचे वृक्षारोपण केल्याचे पोर्टलवर अपलोड केलेल्या माहितीनुसार दिसून येत आहे. जिल्हयाचे काम हे फक्त 61 % एवढेच झालेले दिसून येते. जिल्ह्यातील मोताळा, बुलढाणा व मलकापूर तालुका वगळता इतर तालुक्यांची समाधानकारक उद्दिष्ट पूर्ती झालेली दिसून येत नाही.

याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी केंद्रप्रमुख यांचे द्वारे केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेचा पट, रोप लागवड करणेसाठी उपलब्ध जागा, लागवडीसाठी उपलब्ध होणारी रोपे यांचा आढावा घेऊन शाळानिहाय तसेच दिलेले उद्दिष्ट पूर्तीसाठी विविध विभागाच्या योजनेअंतर्गत उपलब्ध होऊ शकणारी रोपे, अथवा काही शाळा, रोपवाटिका, सामाजिक संस्था यांचेद्वारे उपलब्ध होऊ शकणारी रोपे याबाबत संबंधित संस्थेशी समन्वय साधून रोपे प्राप्त करून घ्यावे व उद्दिष्ट पूर्ती करावी..

संदर्भीय क्र ८ अन्वये मा विभागीय वन अधिकारी बुलढाणा यांचेही संपर्क साधून तालुकास्तरावरील शासकीय रोपवाटिकेना शाळांना रोपे उपलब्ध करून देणे बाबत विनंती करण्यात आलेली आहे. याकरिता शाळांनी निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नजीकच्या शासकीय रोपवाटिकांशी संपर्क साधून आवश्यक त्या संख्येत रोपे उपलब्ध करून घेण्यात यावी.

याबाबत उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये देण्यात आलेल्या सविस्तर सूचनांनुसार "एक पेड मां के नाम 2.0" अंतर्गत सदर रोप लागवड करताना विद्यार्थी, माता व रोप असे छायाचित्र घेऊन इको क्लब पोर्टलवर अपलोड फोटो अपलोड करणेबाबत सर्व शाळांना सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

याबाबत, सदर उद्दिष्ट पूर्तीची online नोंद होण्याकरिता " एक पेड मां के नाम 2.0" अंतर्गत सदर रोप लागवड करताना विद्यार्थी, माता व रोप असे छायाचित्र घेऊन इको क्लब पोर्टलवर https://ecoclubs.education.gov.in अपलोड करणे गरजेचे आहे. सदर फोटो अपलोड केल्याशिवाय, आपल्या तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ती झाली असे ग्राह्य धरल्या जाणार नाही.

सदर उपक्रमाचे निर्धारित उद्दिष्ट दिनाक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावयाचे असल्याने ज्या शाळा अद्यापही एक पेड माँ के नाम २.० अंतर्गत आई/विद्यार्थी सोबत चा वृक्ष लागवड फोटो अपलोड करण्याबाबत सहभागी नाहीत अथवा कमी सहभाग आहे प्रामुख्याने अशा शाळांना सदर उपक्रम ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एखाद्या दिनाला विशेष औचित्य साधून अथवा सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक शनिवारी राबविण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात व पर्यवेक्षकीय यंत्रणेद्वारे आढावा घेऊन ecoclubs.education.gov.in या लिंक वर वरीलप्रमाणे अपलोड करणेबाबत कार्यवाही करणे बाबत निर्देश द्यावेत. व आपल्या तालुक्यासाठी दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण होईल असे पाहावे.

सहपत्र-एक पेड मां के नाम 2.0 पं. स. निहाय उद्दिष्ट प्रपत्र अ

सहभागी शाळांची पं. स. निहाय यादी


 शिक्षणाधिकारी 

(प्राथमिक) जिल्हापरिषद, बुलढाणा

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.