ग्राम विकास विभागाच्या दि. १० ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरठयावर असलेल्या (सेवा निवृत्तीस १ वर्ष राहिलेल्या) वर्ग ३ व ४ कर्मचा-यांच्या प्रकरणामध्ये अतिप्रदानाची वसुली करण्यात येवू नये असे निर्देश दिले आहेत.
उपरोक्त विषयाच्या अनुसरून कळविण्यात येते की, सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या (सेवा निवृत्तीस १ वर्ष राहिलेल्या) वर्ग ३ व ४ कर्मचा- यांच्या प्रकरणामध्ये अतिप्रदानाची वसुली खालील दिलेल्या अभिप्रायानुसार करण्यात येवू नये.
अ) सेवानिवृत्त वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांना करण्यात आलेल्या अतिप्रदानाची वसूली करण्यात येवू नये.
ब) निवृत्तीच्या उंबरठयांवर असणा-या वर्ग- ३ व वर्ग-४ च्या कर्मचा-यांकडून अतिप्रदानाची वसूली करण्यात येवू नये.
क) पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अतिप्रदान करण्यात आले असल्यास वसूली करण्यात येवू नये.
ड चूकीने लाभ देण्यात आले असल्यास चूकीची दुरूस्ती करता येईल.
इ दि. २८ जुलै, २०१४ चे परिपत्रक भावी (prospective) प्रभावाने लागू करणे योग्य व न्यायोचित होणार नाही.
वरील अ ते इ बाबत यापूर्वीच विधी व न्यार विभाग ने दिलेल्या सूचनांनुसार आस्थापना- १० कार्यासनाने परिपत्रक क्र. डब्ल्यूपीटी-२०१४/प्र.क्र.३२९ 'आस्था-१०, दि. १९ डिसेंबर, २०१५ च्या परिपत्रकान्वये सर्व जिल्हा परिषदांना स्वयंस्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. परंतु काही जिल्हा परिषदा शासनाच्या स्वयंस्पष्ट परिपत्रकानुसार कार्यवाही न करता शासनाकडे विनाकारण पत्रव्यवहार करत आहेत. या पत्राव्दारे सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात येते की शासनाच्या दि. १९.१२.२०१५ च्या परिपत्रकान्वये तसेच या पत्रात नमूद केलेल्या अ ते इ मुदयांनुसार तात्काळ कार्यवाही करावी. शासनाकडे अनावश्यक पत्रव्यवहार टाळावा.
कात्र (र.ई. गिरी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments