राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद च्या दिनांक 15 जानेवारी 2024 परिपत्रकानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षकांनी गणित विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन गणित वेबिनार सत्रा साठी उपस्थित राहणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील गणित अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व खान अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विषयासाठी ऑनलाईन गणित वेबिनार सत्राचे आयोजन दि. १७ जानेवारी, २०२४ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत करण्यात आले आहे. सदर ऑनलाईन वेबिनार सत्राची यूट्यूब लिंक पुढीलप्रमाणे :
https://youtube.com/live/nnl7BQPOuqfeature=share
सदर वेबिनार सत्रामध्ये गणित विषयाचे अध्यापन प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे :
• महाराष्ट्र शासन व खान अकॅडमी सहकार्यात्मक भागीदारी
• राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व खान अकॅडमी यांच्या संयुक्त
विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या गणित साहित्याचे शिक्षकांकडून उपयोजन शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या दृष्टीने खान अकॅडमीकडून सहकार्य व आवश्यक तयारीसाठी मार्गदर्शन विद्यार्थी संपादणूकीचे मूल्यांकन मुख्याध्यापक व शिक्षक भूमिका सदर ऑनलाईन वेबिनार सत्राबाबतची माहिती आपल्या अधिनस्थ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, संबंधित शाळा, मुख्याध्यापक यांच्यापर्यंत पोहोचविण्यात यावी तसेच सदर ऑनलाईन वेबिनार सत्रास संबंधितानी वेळेवर उपस्थित राहणेबाबत निर्देशित करण्यात यावे.
डॉ.शोभा खंदारे
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०.
वरील परिपत्रक PDF Download
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments