ऑल इंडिया सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE)-2024 ऑनलाइन अर्ज भरणे सुरू

 नॅशनल टेस्टिंग एजन्सी

(उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत स्वायत्त संस्था)

सार्वजनिक सूचना

०७.११.२०२३

ऑल इंडिया सैनिक स्कूल्स प्रवेश परीक्षा (AISSEE)-2024

वर्ग पाचवीत शिकणारे विद्यार्थी वर्ग सहावीच्या प्रवेशासाठी व वर्ग आठवीत शिकणारी विद्यार्थी वर्ग नववीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा देऊ शकतात.

महाराष्ट्रात सातारा व चंद्रपूर अशा दोन ठिकाणी सैनिकी शाळा आहेत.


NTA शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी देशभरातील 33 सैनिक शाळांमध्ये इयत्ता VI आणि इयत्ता IX च्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE)-2024 आयोजित करणार आहे. सैनिक शाळा या सीबीएसईशी संलग्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा आहेत. ते नॅशनल डिफेन्स अकादमी, इंडियन नेव्हल अकादमी आणि इतर ट्रेनिंग अकादमींमध्ये ऑफिसर्ससाठी सामील होण्यासाठी कॅडेट्स तयार करतात.

संरक्षण मंत्रालयाने (MoD) 19 नवीन सैनिक शाळांना मान्यता दिली आहे, ज्या NGOS/ खाजगी शाळा/ राज्य सरकारांच्या भागीदारीत कार्यरत आहेत. या मान्यताप्राप्त नवीन सैनिक शाळा सैनिक स्कूल सोसायटीच्या अंतर्गत कार्यरत आहेत. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी नवीन सैनिक शाळांच्या इयत्ता 6 च्या सैनिक शाळेतील प्रवेश देखील AISSEE-2024 द्वारे आहे.


परीक्षेची तारीख

21.01.2024 (रविवार)


परीक्षेची पद्धत

पेन पेपर (OMR शीट्स आधारित)

एकाधिक निवड प्रश्न

परीक्षा शहरे

माहिती बुलेटिनमध्ये नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण भारतातील 186 शहरे


इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी पात्रता

31.03.2024 रोजी उमेदवार 10 ते 12 वर्षांच्या दरम्यान असावा. इयत्ता VI साठी मुलींसाठी प्रवेश खुला आहे, रिक्त पदांच्या उपलब्धतेच्या अधीन. माहिती बुलेटिनमध्ये तपशीलवार माहिती दिलेल्या मुलांप्रमाणेच वयाचा निकष आहे.

इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी पात्रता

उमेदवार 31.03.2024 रोजी 13 ते 15 वर्षांच्या दरम्यान असावा आणि प्रवेशाच्या वेळी मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता आठवी उत्तीर्ण असावा. इयत्ता नववीसाठी मुलींसाठी प्रवेश खुला आहे, रिक्त पदांच्या उपलब्धतेच्या अधीन. माहिती बुलेटिनमध्ये तपशीलवार माहिती दिलेल्या मुलांप्रमाणेच वयाचा निकष आहे.


परीक्षा शुल्क

श्रेणी जनरल/ संरक्षण कर्मचारी आणि माजी सैनिक/ ओबीसी (NCL)

फी देय रु. ६५०/-

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती

रु. ५००/-

जमा करण्याची शेवटची तारीख १६.१२.२०२३ ("सायंकाळी ५.०० पर्यंत)

ऑनलाइन अर्ज फॉर्म

शुल्क भरण्याची अंतिम तारीख १६.१२.२०२३ (रात्री ११.५०). परीक्षेचे शुल्कही ऑनलाइन भरता येते ऑनलाइन

डेबिट/ क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग/ UPI द्वारे

योजना/ कालावधी/ मध्यम/ परीक्षेचा अभ्यासक्रम, सैनिक शाळा/ नवीन सैनिक शाळांची यादी आणि त्यांचे तात्पुरते सेवन, जागांचे आरक्षण, परीक्षेची शहरे, उत्तीर्णतेची आवश्यकता, महत्त्वाच्या तारखा इ.

परीक्षा www.nta.ac.in/ वर होस्ट केलेल्या माहिती बुलेटिनमध्ये समाविष्ट आहे

https://exams.nta.ac.in/AISSEE/ परीक्षेला बसू इच्छिणारे उमेदवार सविस्तर वाचू शकतात

AISSEE-2024 साठी माहिती बुलेटिन आणि फक्त https://exams.nta.ac.in/AISSEE/ वर ऑनलाइन अर्ज करा.

०७.११.२०२३ आणि १६.१२.२०२३. परीक्षा शुल्क देखील पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.

डेबिट/ क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वापरणे.


व्हॉट्सअॅप हेल्पलाइन

क्रमांक ८३२९८८२९९७

हेल्पलाइन क्रमांक: +91-11-40759000

वेबसाइट www.nta.ac.in


(डॉ. साधना पराशर)

वरिष्ठ संचालक (परीक्षा)


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏


*सैनिक स्कूल  प्रवेश परीक्षा 2024  प्रक्रिया सुरू*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

*इयत्ता सहावी व नववी साठी प्रवेश*

( 4 थी ,5 वी ,6 वी व 8 वी त शिकत असणाऱ्या खालील वयोगटातील मुले व मुली यांचे साठी)

*A to z सर्व माहिती.*
✍🏻 *नवनाथ धांडोरे*
*सातारा सैनिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य*
8329882997 


*परीक्षा दिनांक -  रविवार   21 Jan 2024.*

फॉर्म भरण्याची मुदत 16 डिसेंबर पर्यंत 

*अर्ज सादर करण्यासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे:*- 

🎯 *वयोगट*
*अर्ज करण्याकरिता वय मर्यादा -*
6 वी साठी 
*०१ एप्रिल २०12 ते ३१ मार्च २०14*


🎯 *खालील महिन्यात जन्म झालेले  पात्र विद्यार्थी*
🎯 *एप्रिल ते डिसेंबर 2012*
🎯 *संपूर्ण वर्ष 2013*
🎯  *जानेवारी फेब्रुवारी मार्च 2014*

(  अत्यंत महत्वाचे-)

*खालील महिन्यात  जन्म झालेले विद्यार्थी पात्र नाहीत*

🎯 *जानेवारी ,फेब्रुवारी ,मार्च  2012*

🎯 *एप्रिल ते डिसेंबर 2014*

*सैनिक शाळा प्रवेश परीक्षा साठी प्रसन्न पब्लिकेशन ची 20 आदर्श सराव प्रश्न पत्रिका संच*
मागणीसाठी* 8329882997 
या whatsapp नंबर वर मेसेज पाठवा किंवा खालील कॅटलॉग वर क्लिक करा*
https://wa.me/c/918329882997

*सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा* *अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे:-*

१) *विद्यार्थ्यांचा फोटो* - 
*फोटो काढताना त्या फोटोवर विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव व फोटो काढल्याचा दिनांक असावा.फोटोचे background white असावे.*

२) *विद्यार्थ्यांची सही*

३) *विद्यार्थ्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा*

४) *Domicile Certificate* - विद्यार्थ्यांचे domicile certificate असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांचे domicile certificate नसल्यास त्याच्या पालकांचे सर्टिफिकेट चालेल.

५) *जात प्रमाणपत्र* - विद्यार्थी जर SC/ST/OBC असेल तर त्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे पालक Ex - Servicemen असतील तर त्यांचे Defence Service Certificate किंवा PPO आवश्यक.
NT असेल तर सेंट्रल चे OBC प्रमाणपत्र काढावे.

६) *जन्माचा दाखला*- विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला आवश्यक.७) *परीक्षा फी* - विद्यार्थी SC/ST असल्यास फी ५००/- तर बाकी सर्वांसाठी फी ६५०/- रुपये.

महाराष्ट्रातील सैनिकी शाळा
शासकीय
1) सातारा 
2) चंद्रपूर

*खासगी सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त

1) अहमदनगर 
2) कोल्हापूर 


*सैनिक स्कूल सातारा*
*सैनिक शाळा, सातारा* *माहिती*

स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य राखायचे असेल तर त्याचे रक्षण करणारे आपले सैन्यदल सतत तयार असले पाहिजे. त्यासाठी त्याच ताज्या दमाचे, जिद्दीचे अधिकारी पाहिजेत. हे अधिकारी तयार करण्याचे केंद्र आपल्या संरक्षण खात्याचे राष्ट्रीय प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) या नावाने काढले आहे. या संस्थेत भूदल,विमानदल व नौसेना या तिन्ही दलांसाठी च्या अधिकाऱ्यांना सामायिक शिक्षण दिले जाते. त्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास ही आहे.
                      या संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची लेखी ,स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. त्यात उत्तम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत व वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन दर सहामाहीस 350 उमेदवार निवडण्यात येतात. एकदा प्रवेश मिळताच त्या तरुणाच्या आयुष्याच्या सर्व चिंता संपतात.
           भरपूर पगार, बढतीच्या नियमित संधी, देशसेवेची, समाजसेवेची संधी, साहसाची संधी यापैकी कोणत्याही दृष्टीने सैन्यदलातील अधिकाऱ्यांची नोकरी दुसऱ्या कोणत्याही नोकरी पेक्षा व व्यवसाया पेक्षा अधिक चांगली आहे.
           पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात सैन्यदलातील अधिकाऱ्यात शहरातील, श्रीमंत वर्गातील, उच्चवर्णीयातील व देशाच्या ठराविक भागातील लोकांचा भरणा अधिक असे. समाजातील सर्व थरातील व देशाच्या सर्व भागातील लोकांना सैन्यदलात अधिकारी होता यावे म्हणून भारत सरकारने संरक्षण खात्याच्या आधिपत्याखाली देशाच्या निरनिराळ्या भागात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ( नॅशनल डिफेन्स अकॅडमी N.D.A) प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या संस्था काढावयाचे ठरवले. त्याच या सैनिक शाळा होत. या निवासी,इंग्रजी माध्यमाच्या व केंद्रीय परीक्षा मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांना मुलांना बसविणाऱ्या शाळा आहेत. देशाच्या निरनिराळ्या भागात अशा 27 शाळा आहेत.त्यावर केंद्रीय संरक्षण खात्याचे प्रशासनिक नियंत्रण असते.अखिल भारतीय स्वरूपामुळे  केंद्रीय परीक्षा मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांना मुलांना बसावे लागते.N.D.A. च्या  प्रवेश परीक्षेचे माध्यम इंग्रजी असल्यामुळे या शाळेतही इंग्रजी माध्यम आहे. अकरावी व बारावी न.द.A च्या लेखी  प्रवेश परीक्षेची व मुलाखतीची खास तयारी करून घेतली जाते.
          या शाळांचा आणखी एक उद्देश म्हणजे एन. डी. ए मधील सैन्यदलातील वातावरणाचा प्रथमपासून परिचय व्हावा व ते मुलांच्या अंगवळणी पडावे हा आहे.त्याचप्रमाणे शाळेतील वातावरण ठेवलेले असते. सैनिक शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक व रजिस्ट्रार हे तीन अधिकारी प्रत्यक्ष सैन्य दलातील अधिकारी असतात आणि ते शाळेत प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशनवर) आलेले असतात.
                 महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी घटना म्हणजे सर्व 27 सैनिक शाळांपैकी पहिली शाळा महाराष्ट्रात सातारा येथे दिनांक 23 जून 1961 रोजी सुरू झाली. त्यावेळी कै. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे ही शाळा सातारा येथे सुरू झाली. तत्कालीन संरक्षणमंत्री कै. व्ही. के. कृष्णमेनन यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन झाले. एन. डी. ए. महाराष्ट्रात आहे पण एन.डी.एमध्ये महाराष्ट्र नाही असे म्हटले जाईल.त्याचा अर्थ असा की इंडिया ही संस्था महाराष्ट्रात असली तरी त्यात महाराष्ट्रातील मुले फार कमी आहेत.यामुळे सैन्यदलातही महाराष्ट्रीय अधिकारी फार कमी आहेत.ही उणीव भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातारा येथील केंद्रीय सैनिक शाळेत केला जातो. या प्रयत्नात शाळा बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाली आहे. शाळेतून बाहेर पडलेल्या मुलांपैकी 650 च्या वर मुले आज सैन्यदलात अधिकारी पदावर आहेत.ही संख्या एकूण बाहेर पडणाऱ्या मुलांच्या  1/3 येते.
       सैनिक शाळेत प्रवेश देताना मागासवर्गीय मुलांना काही प्रमाणात आरक्षण आहे. तसेच एकदा प्रवेश मिळाला की, त्या मुलाला पालकांच्या मासिक उत्पन्नाच्या प्रमाणात महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती देऊन गरीब पालकांच्या मुलांच्या या शाळेतील शिक्षणाचा भार उचलते, यामुळे समाजाच्या सर्व थरातील मुले या शाळेत शिक्षण घेऊ शकतात.

*सैनिक शाळा, सातारा: प्रवेश का घ्यावा?*

ही शाळा निवासी आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मुलांखेरीज इतर सर्वांना शाळेच्या वसतिगृहात राहावे लागते. त्यामुळे मुलगा स्वावलंबी होण्यास मदत होते. हल्ली घरोघर मर्यादीत मुले  असल्याने त्यांचे लाड होतात. त्यामुळे ते स्वावलंबी होण्यात अडचण येते. पण वसतिगृहात मुले आपोआप स्वावलंबी होतात.
वसतिगृह चालविण्यात मुलांचा सहभाग असतो. वसतिगृहात प्रत्येक बराकीचा एक प्रमुख असतो. चारी बराकिंचा मिळून मुलांपैकी एक  कुलप्रमुख व उपकुलप्रमुख असतो. संबंध शाळेचा मिळूनही मुलांपैकी एक प्रमुख व उपप्रमुख असतो. वर्गातही एक मुलगा प्रमुख असतो. यामुळे मुलातील नेतृत्वगुण वाढीस लागतात.
पाचगणीच्या निवासी शाळांच्या वार्षिक फी पेक्षा कमी फी सातारा सैनिक स्कूल ची आहे. शिवाय यातही उत्पन्नाच्या आधारावर आणखी सवलत मिळू शकते. यामुळे या मागासवर्गीय आरक्षणामुळे समाजाच्या सर्व थरातील मूल सैनिक शाळा, सातारा येथे प्रवेश घेऊ शकतात. पाचगणीच्या निवासी शाळा व महाराष्ट्रात निघालेल्या तथाकथित सैनिक शाळा फक्त श्रीमंतांचीच मुलं शिक्षण घेऊ शकतात.
सैनिक शाळा, सातारा येथे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे व बारावीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे बारावी व त्या पुढील प्रगत अभ्यास समजणे त्याला शक्य होते. प्रवेश परीक्षा मराठी, हिंदी व प्रादेशिक भाषा असल्याने व दोन वर्षे या मुलांकडे विशेष लक्ष दिले जाते.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य मुलालाही या शिक्षणाचा लाभ होऊ शकतो.
अकरावी व बारावीच्या मुलांची N.D.A. च्या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेण्यात येते. ही करताना केंद्रीय लोकसेवा आयोग घेत असलेल्या मुलाखतीचीही तयारी करून घेतात. त्यामुळे या शाळेतून बारावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आधुनिक मुलाखतीचे तंत्र आत्मसात केलेले असते. किती शाळात ही सोय आहे?
सैनिक शाळा, सातारा दहावी व बारावीच्या परीक्षांना मुलांना केंद्रीय परीक्षांना बसवते. या परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या परिक्षेंपेक्षा  कठीण आहेत हे खरे असले तरी त्याच एक मोठा फायदा इथल्या मुलांना होतो. तो असा की,देशस्तरावरच्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, आय.आय.टी., मेडिकल, इंजीनियरिंग वगैरे सर्व स्पर्धा परीक्षा केंद्रीय परीक्षा मंडळाच्या दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. त्यांना या शाळेचा विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो. महाराष्ट्रातल्या अनुदानित शाळांमधील मुलांना या परीक्षा कठीण .
सैनिक शाळेची क्रीडांगणे जितकी आहे तितकी महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्याच शाळेजवळ नसतील. त्यामुळे एकाच वेळी सर्व मुले खेळात भाग घेऊ शकतात. तसा घेणे सक्तीचेही आहे. सहावी व बारावी नियमितपणे खेळल्यामुळे येथील मुले सुदृढ तर होताच शिवाय त्यांच्यात खिलाडूवृत्तीसारखा चांगल्या गुणांचा ही विकास होतो.
क्रीडांगणाखेरीज शाळेत तरण तलाव आहे. प्रत्येक मुलाला पोहणे शिकविण्याची व्यवस्था केली जाते. पोहणे हा एक चांगला क्रीडाप्रकार आहे. तसाच तो चांगला व्यायाम प्रकारही आहे. त्याचा ही मुलांच्या प्रकृतीवर व मनोवृत्तीवर चांगला परिणाम होतो.
शाळेत अश्वारोहणचीही सोय आहे. आठवी पासून निवडक मुलांना अश्वारोहणचे शिक्षण दिले जाते. अश्वरोहनामुळे जिवंत प्राण्याला हाताळल्याने, त्याच्यावर प्रभुत्व मिळवता येते. याचा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर चांगला परिणाम होतो.


वक्तृत्व स्पर्धा, गायन, अभिनय इ. अनेक अभ्यासानुवर्ती कार्यक्रम शाळेत नियमितपणे वर्षभर सुरू असतात. त्यात अनेक विद्यार्थी भाग घेतात. शिक्षक वर्ग त्यांना मार्गदर्शन करतो. या सर्वांचा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर फार चांगला परिणाम होतो.
खेळ, अभ्यासानुवरती कार्यक्रम, अभ्यास वगैरे अनेक गोष्टी शाळेत चालत असल्यामुळे त्या सर्वांचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असते. तसेच प्रत्येक कार्यक्रम ठराविक दिवशी, ठराविक वेळेत पार पाडणे आवश्यक असते. त्यामुळे एक प्रकारचा नियमितपणा आपोआपच मुलांच्या अंगी मुरतो.
सहावीपासून अकरावी पर्यंत सर्वांना एन.सी.सी. चे प्रशिक्षण सक्तीचे आहे. त्यामुळे व वरील 11 क्रमांकामुळे एक प्रकारची शिस्तबद्धता मुलांच्या अंगी बानते. आपला देश जर जगात क्रमांक एकचा देश व्हायचा असेल तर शिस्तबद्ध तरुणांच्या पिढ्या आम्हाला निर्माण कराव्या लागतील आणि त्या करण्यात या अठरा केंद्रीय सैनिक शाळांचा फार मोठा वाटा आहे. आपला मुलगा शिस्तबद्ध व्हावा हे कुठल्या पालकास वाटत नाही?
केंद्रीय सैनिक शाळा सातारा येथे सहावी पासून बारावी पर्यंत जे विविध उपक्रम शाळेत सतत चालू असतात त्यांचा नैसर्गिक परिणाम म्हणून इथल्या प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास होतो. म्हणूनच जरी त्याची सैन्यदलातील अधिकारी होण्यासाठी एन. डी .ए मध्ये निवड झाली नाही तरी तो दुसऱ्या व्यवसायामध्ये ही निश्चितपणे यशस्वी होतो असा आतापर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनुभव आहे.

*सैनिक शाळा माहिती पत्रकासाठी खालील लिंक वर क्लिक करून  सैनिक शाळा असा मेसेज करा*


सैनिक शाळांची स्थापनाच मुळी विशिष्ट उद्दिष्ट (N.D.A. प्रवेश, सैन्यदलात अधिकारी) ठेवून झालेली असल्यामुळे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनेच शाळा चालवली जात असल्याने येथील सर्व विद्यार्थी इतर शाळातील विद्यार्थ्यांना पेक्षा वरचढ ठठरतात
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच 6 वी ते 12 वी पर्यंत सामान्यज्ञान हा विषय शिकवतात याचा फायदा त्यांना कोणत्याही स्पर्धा परीक्षेला बसताना व मुलाखतीच्यावेळी होतो.
केंद्रीय सैनिक शाळा, सातारा: प्रवेशाची प्रक्रिया-
        आधुनिक शास्त्रीय शोधांमुळे आधुनिक युद्धांचे तंत्रही बदलले आहे. त्यात अत्याधुनिक यंत्रांचा, अवजारांचा उपयोग होतो. ही यंत्रे अद्यावत ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे ती यंत्रे, अवजारे, हाताळणारे व त्यांच्यावर देखरेख ठेवणारे दोन्ही लोक अत्यंत तल्लख असणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणात प्रवेश घेणारे लोकही तसेच असावे लागतात. सैनिक शाळा एन. डी. ए. च्या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेत असल्यामुळे ज्या ला सैनिक शाळेत प्रवेश घ्यायचा तो दहा वर्षाचा मुलगा तलक, ज्याची एन. डी. ए. च्या प्रवेश परीक्षेची तयारी होऊ शकेल असा लागतो.
          म्हणूनच सैनिक शाळेत प्रवेश देण्यापूर्वी मुले पारखून घ्यावे लागतात. याची पहिली पायरी म्हणजे लेखी परीक्षा. या परीक्षेत गणित, भाषा, बुद्धिमापन व सामान्य ज्ञान या चार विषयांचा समावेश असतो. त्यांचा अभ्यासक्रम केंद्रीय परीक्षा मंडळाच्या इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमाप्रमाणे असतो. त्याची पूर्ण कल्पना या पुस्तकाच्या अभ्यासानंतर येऊ शकेल.**अधिक माहिती साठी संपर्क*
*नवनाथ धांडोरे यांचे*
- *प्रसन्न पब्लिकेशन
 83 2988 2997*
-

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.