PM Poshan Update - पोषण आहारासाठी अंडी चे दर बाजारभावाप्रमाणे निश्चित होणार?

 शिक्षण विभागाचे उपसचिव इम्तियाज काझी यांचे महाराष्ट्र शिक्षक संघटनेला आश्वासन! 


 शासनाने शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना या महिन्यापासून आठवड्यातून एक दिवस अंडी व केळी हा सकस आहार देण्यास सुरुवात केली आहे. लवकरच बाजारभावाप्रमाणे अंडी व केळीचे दर निश्चित केले जातील, असे आश्वासन शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव इम्तियाज काझी यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ यांनी दिली.


नागपूर येथे पुरोगामी शिक्षक संघटना प्रतिनिधी मंडळाने शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव इम्तियाज काझी यांची भेट घेऊन अंडी व केळीसाठी निश्चित केलेला ५ रुपये हा दर बाजारभावापेक्षा कमी असल्याने सदरचा दर बाजारभावाप्रमाणे देण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत पुढील निधी देताना बाजारभाव पाहून निश्चित केला जाईल, असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी ज्या शाळांना अजूनही निधी प्राप्त झाला अशांना निधी लवकर पाठवण्यात यावा, सकस आहार निधी किमान १५ दिवस आधी खात्यावर जमा करण्यात यावा आदी मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

शिष्टमंडळात संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, विभागीय अध्यक्ष रवींद्र सैंदाणे, रवींद्र देवरे, बाबासाहेब बढे, महिला राज्य कोषाध्यक्षा रुखमा पाटील, महिला अध्यक्ष दीपा मोरे, प्रतिभा वाघ, सुरेखा बोरसे, रंजना राठोड, न्हानू माळी, कमलेश चव्हाण, कैलास सोनवणे, गोकुळ पाटील, संजय ठाकूर मुरलीधर नानकर आदींनी दिली आहे.महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.