निवृत्ती वेतन योजना प्रकार

 निवृत्ती वेतन योजना प्रकार

1) नियत वयोमान निवृत्तीवेतन :-

        ज्यांना नियत वय पुर्ण झाल्यानंतर सेवेतून नियमानुसार निवृत्‍त होण्याचा हक्क असतो किंवा नियत वयोमान व कर्मचाऱ्याला देण्यात येणारे निवृत्तीवेतन म्हणजे नियत वयमान निवृत्ती वेतन होय.

सहाव्या वेतन आयोगानुसार दिनांक २७/२/२००९ रोजी व त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या तथा होणाऱ्या कर्मचाऱ्यासं अंतीम वेतनाच्या ५०% अथवा मागील १० महीन्यातील सरासरी वेतनाच्या ५०% यापैकी जी रक्कम अधिक असेल ती सेवानिवृत्तीवेतन ठरते._


2) पुर्णसेवा निवृत्ती वेतन :-

    नियतवयोमानापुर्वी २० किंवा ३० वर्षाची अर्हताकारी सेवा पुर्ण झाल्यावर अथवा वयाची ५०-५५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर काही कर्मचारी स्वेच्छेने निवृत्त होतात. तर कधी कधी लोकहिताच्या कारणास्तव सक्तीने सेवानिवृत्त केल्या जाते त्यास देण्यात येणारे निवृत्तीवेतन म्हणजे पुर्णसेवा निवृत्ती वेतन होय.


3) रुग्णता निवृत्ती वेतन (Invalid Pension):- 

कर्मचाऱ्यांच्या नियतवयोमानपुर्वी मानसिक किंवा शारिरीक विकलांगतेमुळे अथवा कर्मचारी कामाकरिता असमर्थ असल्यास नियम ७२ मध्ये विहीत केलेले वैद्यकीय प्रमाणपत्रा सादर केल्यानंतर कर्मचाऱ्यास सेवानिवृत्‍त होण्यास परवानगी दिल्या जाते. अश्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तीवेतन देण्यात येते.


4) अनुकंपा निवृत्तीवेतन (Compassionate Pension)

सरकारी कर्मचारी सेवेत असताना त्याच्या गैरवर्तणुक किंवा नादारीबल शासकीय सेवेतुन काढुन टाकल्यास किंवा सेवानिवृत्त होण्यास भाग पाडलेल्या कर्मचाऱ्यास अनुकंपा निवृत्तीवेतन खेरीज कोणतेही निवृत्तीवेतन मंजुर केले जाणार नाही.


5) भरपाई निवृत्तीवेतन :-

   जर सरकारी कर्मचाऱ्यांना नियत वयमानपुर्वी सेवा निवृत्ती किंवा पूर्ण सेवा निवृत्तीवेतन मिळण्यापुर्वी वैद्यकीय प्रमाणपत्राखेरीज अन्य कारणावरुन आणि त्याची स्वतःची कोणतीही चुक नसतांना कार्यमुक्त करण्यात येते, अशा वेळी देण्यात येणारे निवृत्तीवेतन म्हणजे भरपाई निवृत्तीवेतन म्हणतात.


6) जखम वा इजा निवृत्तीवेतन :-रकारी सेवेत असतांना अपघात वा आजारी झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनास जखम अथवा इजा निवृत्तीवेतन म्हणतात. नियम ८५ ते ९९ मधील तरतुदीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निश्चित करण्यात येते.


7)असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन:

 अपघात किंवा आजारी निवृत्तीवेतनाच्या प्रकरणी एखाद्या कर्मचाऱ्यास मृत्यु आल्यास त्याच्या कुटुबियांना देण्यात येणारे निवृत्ती वेतनास असाधारण निवृत्ती वेतन म्हणतात.


8) कुटुंब निवृत्तीवेतन :-

   सरकारी कर्मचारी शासकीय सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यु झाला किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असतांना मृत्यु आल्यास त्याच्या कुटुबियांना जे निवृत्तीवेतन देण्यात येते त्याला कुटुंब निवृत्तीवेतन असे म्हणतात.सध्या कुटुंब निवृत्तीवेतनाची गणना अंतीम मुळ वेतनाच्या ३०% दराने परीगणित करण्यात येते.शासकीय कर्मचारी सेवानिवृत्ती नंतर मृत्यु पावला तर कर्मचाऱ्याच्या मृत्युच्या दिनांका नंतरच्या दिनांकापासुन सात वर्षाच्या कालावधीकरिता किंवा मृत सेवानिवृत्त कर्मचारी ज्या दिनांकास वयाची ६५ वर्षे पुर्ण करेल तोपर्यंत त्याच्या कुटुंबीयांना

१) अंतीम वेतनाच्या ५०% रक्कम

२) अनुज्ञेय कुटुंब निवृत्तीवेतनाच्या दुप्पट किंवा

३) मंजुर सेवानिवृत्तीवेतन यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन मिळते.


आमच्या जुन्या बांधवाना ही फक्त जुनी पेन्शन माहीत आहे पण जुन्या पेन्शनचे प्रकार निश्चितच माहीत नाही मी पण नेहमी कधी कधी 5 प्रकार सांगितलो आहे मला ही 8 प्रकार माहीत नव्हते आज माहिती मिळाली म्हणून ही माहिती विशेषकरून माझ्या वरिष्ठ बांधवांसाठी.. 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.