सातव्या वेतन आयोग थकबाकी तिसरा हप्ता व राहिलेले पहिले व दुसरे हप्ते डिसेंबर 2023 वेतना सोबतच पारित करा शिक्षण संचालक प्राथमिक यांचे आदेश

 प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार माहे डिसेंबर 2023 चे वेतन देयके सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व राहिलेला पहिला व दुसरा हप्त्यासह पारित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


शासन निर्णयान्वये बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबर, २०२३ च्या वेतनासोबत ७ व्या वेतन आयोगाचे १,२,३ हप्ते व वैद्यकीय देयके अदा करावयाचे आहेत. वैद्यकीय देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करणेसाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

वैद्यकीय देयके अदा करताना ती आवक नोंद रजिस्टर मधील आवक ज्येष्ठतेने (प्रथम आवक प्रथम प्राधान्य) अशा ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावी.

क्षेत्रिस स्तरावर तांत्रिक कारणास्तव / शाळांनी देयके सादर न केल्याने सन २०२१-२२ मध्ये करावयाचा राहीलेला सातव्या वेतन आयोगाचा १ ला व २ रा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे. ७ व्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करत असताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर, २०२३ च्या वेतनासोबत अदा करणे आवश्यक आहे.

सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी कालमर्यादा विचारात घेता लेखाशिर्ष २२०२०१७३/३६ (जिल्हा परिषद शाळा), २२०२०२०८/३६ (खाजगी प्राथमिक शाळा व मनपा/नपा/नप/कटक मंडळे शाळा) या लेखाशिर्षामध्ये माहे डिसेंबर, २०२३ चे वेतन व सातव्या वेतन आयोगाचा राहीलेला १,२ व तसेच नियमित देय असलेला ३ रा हप्ता अदा करणेबाबत यथा नियम कार्यवाही करण्यात येईल.

उर्वरीत लेखाशिर्षाबाबत स्वतंत्र आदेश देण्यात येतील. भविष्यात वैद्यकीय देयकाबाबत तसेच ७ वा वेतन आयोगाचा पहिला, दुसरा व तिसरा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबधित विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी.

उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार पुर्णपणे खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.


(शरद गोसावी)

अध्यापन संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे-01
वरील परिपत्रक PDF Download👇

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.