राष्ट्रीय वीर बाल दिवस २०२३ या दिवशी साजरा करणे बाबत SCERT महाराष्ट्र चे निर्देश.

 भारत सरकार शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग, नवी दिल्ली, यांचे पत्र व भारत सरकारने गृह मंत्रालयाच्या अधिसूचना क्र. F. No.L७०१४१२१२०२२-IS-VII दिनांक ०९.०१.२०२२ नुसार

 साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ डिसेंबर १७०५ रोजी "वीर बाल दिवस" म्हणून साजरा करण्याचे निर्देशित केलेले असून त्यानिमित्ताने देशातील सर्व माध्यमांच्या शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. राज्य/केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांमध्ये २६ डिसेंबर २०२३ रोजी वीर बाल दिवसाचे स्मरण करण्यासाठी, दिवसभरात योग्य संवादात्मक आणि सहभागी कार्यक्रम आयोजित केले जावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांना. साहिबजादांच्या अनुकरणीय धैर्याचे, थीमला समर्पित विशेष संमेलने आयोजित करून, वीर बाल दिवसावरील लघुपट, साहेबजादेंच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या कथा कथन, वादविवाद, कविता, निबंध, चित्रे इत्यादी विविध थीमवर त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने उपक्रम शाळांमध्ये आयोजित करण्यात यावेत.

शाळांमध्ये डिजिटल प्रदर्शने लावण्यात यावी, शाळेचा परिसर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात यावा. सोशल मीडियाचा वापर करून प्रचार व प्रसार करावा. MyGov/My Bharat पोर्टलवर एक प्रश्नमंजुषा अपलोड केली जाईल, विद्यार्थ्यांना प्रश्नमंजुषामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जावे, या कार्यक्रमाचा अहवाल, फोटो सामाजिक शास्त्र विभागाच्या socialsciencedept@maa.ac.in या email वर पाठवण्यात यावा.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून शाळा, मुख्याध्यापक शिक्षक यांना आदेशित करावे. पालक, शालेय

व्यवस्थापन समिती यांना अवगत करावे या अनुषंगाने आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद, यांच्या संयुक्त विद्यमाने पत्र व्यवहार करण्यात यावा.

मूळ टिपणी मा. संचालक यांनी मान्य केली आहे.


(डॉ. नेहा बेलसरे)

उपसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे -३०



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.