शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025 यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंच मुंबई द्वारा आयोजित.

*शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025

https://forms.gle/4127rF8ZKAqe4ivu5



वरील लिंक क्लिक करून भरण्यापूर्वी संपूर्ण पोस्ट काळजीपूर्वक वाचावी.

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने शिक्षक दिन आणि डॉ.कुमुद बन्सल यांचा स्मृतिदिन या निमित्ताने 'मूल्यांकनाच्या नव्या दिशा' या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

*निबंध स्पर्धेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे-

1) ही निबंध स्पर्धा प्राथमिक (इयत्ता 1 ते 5), उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिक (इयत्ता 6 ते 8) आणि माध्यमिक (इयत्ता 9 ते 12) या तीन स्तरांवरील शिक्षकांसाठी आहे. 

तथापि, सेवानिवृत्त शिक्षकही या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. परंतु पुरस्कारांसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही. मात्र सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

2) निबंधासाठी *'मूल्यांकनाच्या नव्या दिशा:'* हा मध्यवर्ती विषय असेल. या मध्यवर्ती विषयाच्या कोणत्याही एका साधनावर निबंध लिहिणे अपेक्षित आहे. पुढे पाच उदाहरणे केवळ नमुन्यादाखल दिली आहेत.


2.1.मूल्यांकनाच्या नव्या दिशा:

        पुस्तकासह चाचणी

2.2.मूल्यांकनाच्या नव्या दिशा:

      मूल्यांकनात रुब्रिकचा उपयोग

2.3.मूल्यांकनाच्या नव्या दिशा:

      समग्र प्रगतिपत्रक

2.4.मूल्यांकनाच्या नव्या दिशा:

        *पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचा सहभाग असलेले 360° मूल्यांकन

2.5.मूल्यांकनाच्या नव्या दिशा:

         *स्वतःच्या शिकण्याचे विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन*(Metacognition)

(Assessment as learning )

(हे मूल्यांकन विद्यार्थी स्वतः करतील त्यामुळे विद्यार्थी स्वतःच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा विचार करू लागतील येथून 'स्वत: शिकायचे कसे' हा प्रवास सुरू होईल.

निबंधाचा विषय निवडताना पुढील टिपणीचा उपयोग होऊ शकेल. या टिपणीत मूल्यांकनाची अनेक साधने दिली आहेत. 

- भाषा -

इयत्ता गट पद्धती तपशील

1 ते 5 शाब्दिक खेळ “शब्दसाखळी”, “अक्षरकोडी”, “कोणतं अक्षर हरवलं?”, “शब्द ओळखा”

6 ते 8 कथाकथन / भूमिका वठविणे कथेला नवा शेवट, लघुनाटिका, संवादवाचन, शब्दकोडी, 

इयत्ता 9 वी - 10 वी साठी विद्यार्थ्यांनी हस्तलिखित तयार करणे .

9 ते 12 विचारमंथन / वादविवाद दिलेल्या विषयावर भूमिका मांडणे, गटचर्चा, संपादकीय लेखन

- गणित -

इयत्ता गट पद्धती तपशील

1 ते 5 गणिती कोडी आकृती जुळवा, संख्यांची जोडणी, पॅटर्न ओळख, सापशिडी

6 ते 8 दैनंदिन जीवनातील गणित खरेदी-विक्री मोजमाप, नकाशा वाचन, वेळ व अंतर मोजणी

9 ते 12 प्रोजेक्ट पद्धत , सांख्यिकी सर्वेक्षण, डेटा विश्लेषण, 3D मॉडेल तयार करणे

- विज्ञान -

इयत्ता गट पद्धती तपशील

1 ते 5 निरीक्षण क्रिया पानांची रचना, प्राण्यांचे आवाज, हवामान बदल

6 ते 8 प्रयोग सादरीकरण साधे विज्ञान प्रयोग, ‘का झाले?’ प्रश्नोत्तरे, प्रकल्प

9 ते 12 संशोधन प्रकल्प स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास, नवीकरणीय ऊर्जेवर मॉडेल तयार करणे

- सामाजिक शास्त्रे -

इयत्ता गट पद्धती तपशील

1 ते 5 चित्रकथा ,इतिहासातील प्रसंग चित्रातून सांगणे.

6 ते 8 भूमिका साकारणे, ऐतिहासिक व्यक्तिरेखा वठविणे, नकाशा खेळ.

9 ते 12 केस स्टडी विश्लेषण, वर्तमान घडामोडींचे विश्लेषण, स्थानिक समस्यांवर उपाययोजना सुचविणे.


- कलाशिक्षण -

पोस्टर तयार करणे, हस्तकला, गीत-नृत्य सादरीकरण.


- शारीरिक शिक्षण व निरामयता– 

मिनी-गेम्स, गटातील नेतृत्व कौशल्याचे मूल्यांकन.


- कार्यशिक्षण /पूर्व व्यावसायिक शिक्षण / व्यावसायिक शिक्षण– 

समस्या सोडविणे, वेळ व्यवस्थापन, गट निर्णय क्षमता.


- आंतरविद्याशाखीय शिक्षण -

पर्यावरण शिक्षण ( 10 वी ), समाजातील व्यक्ती ( 9 वी )

मुलाखती, सर्वेक्षण, क्षेत्रभेट, प्रकल्प)

       वरील शालेय विषयांसाठी पुस्तकासह चाचणी ( Open Book Test ) च्या माध्यमातून विश्लेषण, चिकित्सक विचार, अन्वयार्थ लावणे, संदर्भ शोधणे, अर्थाची व्यापकता शोधणे यांसोबत विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला व सर्जनशीलतेला चालना देऊन तणावरहित मूल्यांकन करता येते.

    यांशिवाय Jigsaw puzzles, Reverse Engineering सारख्या कृतींचा भाषा, गणित व विज्ञान या विषयांच्या मूल्यांकनासाठी उपयोग करता येईल.


*"लर्निंग पोर्टफोलिओ” (Learning Portfolio)

 • विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कामांचे संकलन: प्रकल्प, निबंध, चित्रं, ऑडिओ/व्हिडीओ, अभिव्यक्ती.यामध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थी स्वतः अभिप्राय व प्रतिक्रिया लिहू शकतात. जर साहित्य व सोय उपलब्ध असेल तर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही ठेवता येईल (e-portfolio).

*Reflective Journals ( स्वतःला जाणून घ्या )*

प्रत्येक आठवड्याला विद्यार्थी स्वतःचे विचार लिहितात: काय शिकले? काय जमले/नाही जमले? यातून Metacognition (स्व-शिक्षणाची समज) विकसित होते.

“मित्र-मूल्यांकन” — Learning , Teaching and Feedback.दोन विद्यार्थी एकमेकांच्या कार्याचे निरीक्षण करून सूचना देतात.

शिस्त, सहभाग, सहकार्य, संवाद या बाबतीत मूल्यमापन करता येते.

“छोटे शिक्षक” उपक्रम

विद्यार्थी इतर वर्गात शिक्षण देतात, कार्यशाळा घेतात, त्यातून नेतृत्व, संवादकौशल्य, तयारी यांचे मूल्यमापन होते.

“रोल प्ले” व नाट्याद्वारे मूल्यांकन

 • विशिष्ट समस्यांवर आधारित भूमिका घेऊन विद्यार्थ्यांनी चर्चा करावी.त्यातून विचारशक्ती, सहानुभूती, समस्या सोडवण्याची क्षमता दिसून येते.

गटाने केलेल्या प्रकल्पांचे मूल्यमापन करताना वैयक्तिक कामाची नोंद : प्रकल्पानुसार / विषयानुसार निकष ठरवणे.

AI आधारित मूल्यांकनाबद्दलही निबंध लिहिता येईल.

वर सुचवल्यानुसार मूल्यांकनाचे एक साधन निवडून त्यावर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, राज्य अभ्यासक्रम आराखडा यांमधील मूल्यांकनाचा नवा दृष्टिकोन विचारात घेऊन निवडलेल्या विषयावर निबंध लिहिणे अपेक्षित आहे.


आपण निवडलेल्या विषयाला अनुसरून प्रचलित (शाळेत सुरू असलेला) अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके विचारात घेऊन निबंध लिहावा. मूल्यांकनाचा नवा दृष्टिकोन आणि त्याविषयीचा तुमचा वर्गातील अनुभव, चिंतन विचारात घेऊन निबंध लिहिणे अपेक्षित आहे.


3) वरील विषयावर स्वानुभव व स्वचिंतनावर मराठी किंवा इंग्रजी भाषेत निबंध लिहिता येईल.


4) नोंदणीसाठी गुगल फाॅर्मची लिंक दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8:00 वाजता खुली करण्यात येत आहे. ती सोमवार,दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11.00 पर्यंत खुली राहील. या टप्प्यात शिक्षकांनी केवळ प्राथमिक स्वरूपाची माहिती भरणे अपेक्षित आहे. नोंदणी केलेल्या शिक्षकांचा एक व्हाट्सऍप ग्रुप तयार करण्यात येईल. या ग्रुपवर शिक्षकांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. 


5) दुसऱ्या टप्प्यात ग्रुपवरील शिक्षकांसाठी आणखी एका गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. त्यावर त्यांनी आपले निबंध अपलोड करावेत. निबंध 1000 ते आणि जास्तीत जास्त 1500 शब्दांपर्यंत स्वहस्ताक्षरात किंवा टाईप केलेले निबंध *दिनांक 26 ऑक्टोबर 2025* पर्यंत पीडीएफ स्वरूपात गुगल फाॅर्ममध्ये अपलोड करावेत.


6) निबंधाच्या पीडीएफ मध्ये कुठेही स्वतःचे नाव लिहू नये. अथवा आपली ओळख उघड होईल असा कुठलाही मजकूर त्यात असू नये. असे निबंध बाद केले जातील.


7) निबंधामधील मूल्यांकनाचा नवा दृष्टिकोन, वर्गातील अनुभवाचा आधार, आशय मांडणी, स्वतःचे विचार, उपयुक्तता इत्यादी बाबी विचारात घेऊन निबंधाचे मूल्यमापन करण्यात येईल. निबंध लिहिण्यासाठी शिक्षकांनी आवश्यक ते संदर्भ साहित्य वापरावे. परंतु निबंध मात्र स्वतः लिहावा.


8) निबंध स्पर्धेचा निकाल डिसेंबर 25 च्या तिसऱ्या आठवड्यात घोषित करण्यात येईल.


9) पारितोषिके :

प्राथमिक, उच्च प्राथमिक/ पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक या तीन स्तरांवर प्रत्येकी चार निबंधांना (तीन मराठी आणि एक इंग्रजी) गौरवपत्र आणि ग्रंथ देऊन राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येईल.


10) पारितोषिकप्राप्त निबंध शिक्षण विकास मंचच्या ब्लॉगवर देण्यात येतील. इतर निबंधांपैकी आणखी काही निवडक निबंधसुद्धा ब्लॉगवर देण्यात येतील. ब्लॉगचे संपादक मंडळ याबाबत विचार करून निर्णय घेईल.


11) नियुक्त केलेल्या परीक्षक समितीचा निर्णय स्पर्धकांना बंधनकारक राहील.


अधिक माहितीसाठी-

संजना पवार- 8291416216


डाॅ. वसंत काळपांडे,

मुख्य संयोजक,

शिक्षण विकास मंच,

यशवंतराव चव्हाण सेंटर.


राज्यस्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर.


यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ही निबंध स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी घेण्यात आली होती. या निबंध स्पर्धेसाठी दोन विषय देण्यात आले होते.

१-अशैक्षणिक कामे नसतील तर शिक्षक म्हणून आत्तापेक्षा अधिक मी काय-काय करू शकेन?

२- शिक्षकांना कोणत्या गोष्टीचे स्वातंत्र्य हवे आणि का?


या निबंधस्पर्धेस राज्यभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला. इंग्रजी आणि मराठी या दोन माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतून एकूण ८८० निबंध प्राप्त झाले. गोपनीयता राहावी यासाठी आलेल्या सर्व निबंधांना क्रमांक देण्यात आले. ज्या स्पर्धकांनी आपले नाव किंवा त्यांची ओळख पटेल असा मजकूर निबंधात लिहिला होता त्यांना बाद करण्यात आले. 

        त्यानंतर उर्वरित निबंधांची विषयानुसार विभागणी करण्यात आली. विषयनिहाय प्रत्येकी दहा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण पाच फेऱ्यांमध्ये निबंधांची तपासणी करण्यात आली. पहिल्या फेरीत परीक्षकांना त्यांच्या विषयाचे निबंध विभागून देण्यात आले. या फेरीत प्रत्येकाच्या वाट्याला सरासरी ३० ते ४० निबंध आले. मिळालेल्या सर्व निबंधाची तपासणी करून त्यास ए,बी,सी,डी अशी श्रेणी देण्यात आली. दुसर्‍या फेरीत पुन्हा सर्व निबंध तपासून त्यांना पहिल्या फेरीप्रमाणेच श्रेणी देण्यात आली. मात्र परीक्षकांना पहिल्या फेरीत मिळालेले निबंध आणि दुसऱ्या फेरीत मिळालेले निबंध त्याच विषयाचे असले तरी भिन्न स्पर्धकांचे होते. ज्या निबंधाला दोन्ही परीक्षकांनी ए श्रेणी दिली आहे अशाच निबंधांची निवड तिसऱ्या फेरीसाठी करण्यात आली.  बी, सी, डी श्रेणी मिळालेले निबंध बाद करण्यात आले. तिसऱ्या फेरीत प्रत्येक परिक्षकाला सरासरी  ८ ते १० निबंध मिळाले. या फेरीत प्रत्येक परिक्षकाला दिलेल्या निबंधातून पुरस्कारासाठी ५ निबंध निवडायचे असतील तर ते कोणते असावेत हे सूचवण्यास सांगितले गेले. तिसऱ्या फेरीमध्ये प्रत्येक परिक्षकाने निवडलेल्या पाच निबंधांना १ ते ५  असा गुणानुक्रम देऊन चौथी फेरी पूर्ण झाली. पाचव्या आणि अंतिम फेरीत संयुक्त क्रमांक पद्धती (Composite Rank Method) वापरून चार निबंधांची निवड करण्यात आली. इंग्रजी माध्यमाचा लक्षणीय प्रतिसाद लाभल्यामुळे त्यांचे दोन स्वतंत्र परिक्षकांमार्फत परीक्षण करून तिसऱ्या फेरीत एकमताने दोन्ही विषयांचा प्रत्येकी एक निबंध निवडण्यात आला. परिक्षक म्हणून शिक्षण विकास मंचच्या जिल्हा समन्वयक शिक्षकांनी आपले शाळेतील काम सांभाळून चोखपणे परीक्षण केले.



राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२४ अंतिम निकाल


अशैक्षणिक कामे नसतील तर शिक्षक म्हणून आत्तापेक्षा अधिक मी काय-काय करू शकेन?


१) शशिकांत नारायण कुंभार 

शाळा - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केसे.

जिल्हा - सातारा  


२) दिपाली प्रविण जाधव

शाळा- जिल्हा परिषद प्राथमिक , गारवडी

जिल्हा - सातारा

३) स्वाती विठ्ठल जोशी 

शाळा - मराठी विद्या मंदिर, तांबूळवाडी.

जिल्हा - कोल्हापूर


४) शुभांगी प्रकाश निंबाळकर

शाळा - जि. प. शाळा नारळवाडी     

जिल्हा- सातारा 


शिक्षकांना कोणत्या गोष्टीचे स्वातंत्र्य हवे आणि का?

१) नाव - सौ. नर्मदा नरेश कनकी. 

शाळा - नू.म.वि मराठी शाळा, सोलापूर. 

जिल्हा - सोलापूर.


२) कृष्णा निवृत्ती साळी.

शाळा:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजूर. 

जिल्हा - ठाणे


३) नितिन बाजीराव समुद्रे 

शाळा - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिलोंडा 

जिल्हा - पालघर


४) सुरेखा तानाजी जगदाळे.

शाळा - जि.प.प्राथ. शाळा मेघलदरेवाडी

जिल्हा - सातारा 


इंग्रजी माध्यम


अशैक्षणिक कामे नसतील तर शिक्षक म्हणून आत्तापेक्षा अधिक मी काय-काय करू शकेन?

१) हेमंत किसन गवळे 

शाळा - बी. एन. एन. कॉलेज, भिवंडी 

जिल्हा - ठाणे 


शिक्षकांना कोणत्या गोष्टीचे स्वातंत्र्य हवे आणि का?

१) तनुजा शंकरसिंग पेनवाल 

शाळा - नवोदय इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, किसननगर 

जिल्हा - ठाणे


सर्वोत्तम दहा निबंध वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा


https://bit.ly/4gDa8K0


डाॅ. माधव सूर्यवंशी,

मुख्य समन्वयक, 

शिक्षण विकास मंच, 

यशवंतराव चव्हाण सेंटर.

योगेश कुदळे

शिक्षण विभाग प्रमुख,

यशवंतराव चव्हाण सेंटर.

विशेष निवेदन,


शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण राज्यातून या स्पर्धेसाठी भरघोस प्रतिसाद मिळाला. यासाठी सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार. 


या स्पर्धेचा निकाल ११ नोव्हेंबर २०२४ रोजी आपण घोषित करणार होतो पण राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे हे काम वेळेत पूर्ण झाले नाही. या स्पर्धेचा निकाल आता शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी घोषित करण्यात येणार आहे.

धन्यवाद. 🙏


डाॅ.माधव सूर्यवंशी,

मुख्य समन्वयक,

शिक्षण विकास मंच, 

यशवंतराव चव्हाण सेंटर. 

योगेश कुदळे,

शिक्षण विभाग प्रमुख,

यशवंतराव चव्हाण सेंटर.





 यशवंतराव चव्हाण सेंटर

विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा

शिक्षण विकास मंच


> शिक्षक दिनानिमित्त आयोजित


`शिक्षकांसाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२४`


- विषय -

१) अशैक्षणिक कामे नसतील तर शिक्षक म्हणून आत्तापेक्षा अधिक मी काय-काय करू शकेन?

२) शिक्षकांना कोणत्या गोष्टीचे स्वातंत्र्य हवे आणि का?



शिक्षकांसाठीच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेस आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. निबंध लेखन स्पर्धेस दिलेला वेळ कमी होता, यासाठी अनेक शिक्षकांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यास अनुसरून ३१ आक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.


निबंध स्पर्धेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे-



१) ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरांवरील शिक्षकांसाठी आहे.


२) आपले निबंध मराठी किंवा इंग्रजी या भाषेत असावेत.


३) शब्दमर्यादा कमीत कमी आठशे आणि जास्तीत जास्त बाराशे इतकी आहे.


४) हस्ताक्षरात किंवा टाईप केलेले निबंध  पीडीएफ स्वरूपात खालील मेल आयडीवर पाठवावेत. 

*education@chavancentre.org*


*महत्त्वाचे:-*l

       i) ईमेलचा विषय (Subject) या रकान्यात शिक्षकांसाठी भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२४ लिहावे.

       ii) ईमेलच्या मजकुरात( compose email) खालील बाबींचा समावेश असावा.

        स्वतःचे नाव

        शाळेचे नाव

        संपर्कासाठी पत्ता आणि फोन नंबर

        निबंधाचे शीर्षक 

        निबंधाची शब्दसंख्या      


५) निबंधाच्या पीडीएफ मध्ये कुठेही स्वतःचे नाव लिहू नये अथवा आपली ओळख उघड होईल असा कुठलाही मजकूर त्यात असू नये.

६) निबंध स्पर्धेचा निकाल ११ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या दिवशी घोषित करण्यात येईल. 

७) गुणानुक्रमे दोन्ही विषयांच्या प्रत्येकी पहिल्या पाच अशा एकूण दहा निबंधांना पारितोषिक, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येईल.

८) नियुक्त केलेल्या परीक्षक समितीचा निर्णय स्पर्धकांना बंधनकारक राहील.


अधिक माहितीसाठी-

संजना पवार- 8291416216


डाॅ. वसंत काळपांडे,

मुख्य संयोजक,

शिक्षण विकास मंच,

यशवंतराव चव्हाण सेंटर.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.