बदली अपडेट 2023 - आंतरजिल्हा बदली अर्ज भरणारे/भरलेले शिक्षक यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना व लिंक.

आंतरजिल्हा बदली 2023

 संबधित शिक्षकांना पुढील बाबी अवगत कराव्यात. 

1) 2022 मध्ये आंतरजिल्हा बदली साठी अर्ज सादर केलेल्या मात्र बदली न झालेल्या शिक्षकांना सन 2023 च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत फक्त जिल्हा बदल करण्याची सुविधा आहे मात्र त्यांना बदली संवर्ग बदल करण्याची सुविधा नाही,तसेच त्यापैकी ज्यांना बदली नको आहे पण ज्यांनी मागील वर्षात अर्ज केले होते त्यांनी आपला पसंतीक्रम रद्द करावा म्हणजे त्यांची बदली होणार नाही.ज्या शिक्षकांना मागच्या वर्षीचे बदली फॉर्म मधील कोणतेही ऑप्शन /पर्याय बदलावयाचे नाहीत त्यांनी त्यांच्या अर्ज बाबत कोणतीही कृती करणे आवश्यक नाही.जुन्या निवडीसह त्याची बदली केली जाईल.

https://ott.mahardd.com/

2) 2019 मध्ये रुजू झालेल्या शिक्षकांनी दि.15/12/2023 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत प्रोफाइल दुरुस्ती साठी ईमेल केलेल्या सर्व शिक्षकांचे बदल आज दि.16/12/2023 रोजी सायंकाळी पूर्ण करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित पात्र शिक्षकांनी पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज अंतिम करावेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर संबंधित अर्ज व पात्रता अनुषंगाने सर्व आवश्यक दाखले/ प्रमाणपत्र तपासणीसाठी शिक्षकांना सादर करणे आवश्यक राहील याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज पडताळणी वेळी जे अर्ज अपात्र ठरतील ते प्रणाली मधून डिलिट करण्यात येतील व त्यांचा बदली प्रक्रियेत विचार होणार नाही.


त्यामुळे सर्व सबंधित शिक्षकांनी आपल्या नियुक्ती प्रवर्ग, मूळ प्रवर्ग व बदली संवर्गातील आपली पात्रात यानुसार अर्ज दि.17/12/2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अंतिम ( Submit) करावेत. Draft मोड मधील अर्ज बदली साठी विचारात घेतले जाणार नाहीत.


दि.17/12/2023 रोजी रात्री 11.59 पर्यंत सबंधित शिक्षक कितीही वेळा अर्ज Withdraw करून पुन्हा submit करू शकतात. 


     बदली नियंत्रण कक्ष

रायगड जिल्हा परिषद,अलिबाग


बदली पोर्टल लिंक 👇

https://ott.mahardd.com/


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.