Ycmou B Ed Admission 2023-25 Second Selection Open Reserve Categories PDF Download Link & Instructions

 बी.एड. शिक्षणक्रमाच्या सन २०२३-२५ या तुकडीसाठी प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या प्रवेशेच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन प्रवेश अर्जाची मुळ कागदपत्र पडताळणी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर घेण्यात आली..


प्रथम कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार आणि आरक्षण निहाय प्रवेशासाठी यादी स्वतंत्र प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Download





https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/frmDistrictWiseAllotmentListPhase3.aspx?did=404


बी.एड. शिक्षणक्रमाच्या सन २०२३-२०२५ या तुकडीचे खुल्या व राखीव प्रवर्गातील (द्वितीय फेरी) प्रवेश फेरी सूचना

बी.एड. शिक्षणक्रमाच्या सन २०२३-२५ या तुकडीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रवेशेच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन प्रवेश अर्जाची मुळ कागदपत्र पडताळणी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर घेण्यात आली..

प्रथम कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार खुल्या व राखीव प्रवर्गातील प्रवेशासाठी यादी स्वतंत्र प्रसिद्ध करण्यात येत आहे.

१) निवड यादीतील उमेदवारांनी त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क रू. २३,०६०/- (माहितीपुस्तिकेतील पान क्र. २२ व २३ वर नमूद केल्याप्रमाणे) दिनांक १० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने डेबिट / क्रेडीट कार्ड, नेटबँकिंग युपीआय इत्यादीचा वापर करून भरावयाचे आहे. सदर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय संबंधित उमेदवाराच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहे. प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क भरल्यानंतरच आपला बी.एड. शिक्षणक्रमाचा सन २०२३-२०२५ या तुकडीसाठी प्रवेश निश्चित होईल. विहित मुदतीत प्रवेश शुल्क उमेदवारांनी अदा न केल्यास संबंधित उमेदवार बी.एड. प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल आणि पुढील प्रवेश प्रक्रिया फेरीसाठी विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

२) प्रथम वर्ष शुल्क यशस्वीपणे भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला पासवर्ड व लॉगीन आयडी टाकून प्रवेशाचे पत्र डाऊनलोड करता येईल. त्याच्या दोन प्रती काढून त्यातील एक प्रत आपल्या जिल्ह्यासाठी नियुक्त बी.एड. अभ्यासकेंद्रावर (माहितीपुस्तिकेतील पान क्र.२४ ते २७ वर नमूद केलेल्या ठिकाणी) जाऊन बी.एड. प्रथम वर्षाचे प्रवेशपत्र जमा करावे. तसेच पुढील पत्रव्यवहारासाठी संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा व कायमस्वरूपी पत्ता, मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती अभ्यासकेंद्रावर देण्यात यावा.

३) पुढील (द्वितीय) वर्षी पुन्हा बी.एड. ला आपला ऑनलाईन प्रवेश निश्चित करून त्यावेळी द्वितीय वर्ष विद्यापीठ शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे अनिवार्य असेल अन्यथा सदर विद्यार्थी बी.एड. द्वितीय वर्षासाठी प्रवेशित मानला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

४) जागा रिक्त राहिल्यास त्याच जिल्ह्यातील कागदपत्र पडताळणी झालेल्या पुढील उमेदवारांना गुणवत्तेनुसार संधी देण्यात येईल. 

५) प्रवेश शुल्क अदा करतांना प्रोफाईल अपूर्ण असल्यास Fill complete profile असा मेसेज आल्यास डाव्या हाताला असणाऱ्या लिंकपैकी Fill complete profile या लिंकचा वापर करून आपली प्रोफाईल पूर्ण करून प्रवेश शुल्क अदा करावे.

६) अभ्यासकेंद्रामार्फत आपणास बी.एड. शिक्षणक्रमातील अध्ययन साहित्य प्रथम संपर्कसत्रात देण्यात येईल. बी.एड. शिक्षणक्रमा संबंधित अध्ययन साहित्य विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर Books: Free Download (Pdf) या टॅबवर सॉफ्टकॉपीमार्फत PDF/E-book स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहे.

७) उमेदवारांना शुल्क अदा करतांना काही अडचण आल्यास कृपया ०२५३-२२३०५८० या क्रमांकावर संपर्क साधावा.


विद्यार्थी सैवा विभाग तथा

अध्यक्ष. बी.एड. प्रवेश समिती सन २०२३-२५


संचालक,

शिक्षणशास्त्र विद्याशाखा


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.