महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करून 2022 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
दि. २७/१०/२०२३ च्या शासनपत्राचे कृपया अवलोकन करावे.
पत्र पाहण्यासाठी 👉 Click Here
२. सन-२०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन-२०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने बिंदुनामावली बदली पोर्टल वर अपलोड करण्यासाठी आज दुपारी १२.०० वा. पासून Vinsys IT Services (1) Pvt. Ltd, व्दारे पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी सर्व जिल्हा परिषदांनी आपआपल्या जिल्ह्यातील बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरु करावी. तसेच ज्या जिल्हा परिषदांनी बिंदुनामावली यापुर्वी अपलोड केली असेल त्यांनी पुन्हा अद्ययावत बिंदुनामावली अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
(पो.द. देशमुख)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments