मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांनी दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली बाबत पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
हा आदेश जरी जिल्हा परिषद पालघर चा असला तरी ज्या संदर्भित शासन आदेशानुसार सदर आदेश काढण्यात आला आहे त्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय दिनांक 21 जून 2023 नुसार महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषद देखील अशा प्रकारचा आदेश निर्गमित करून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली बाबत कार्यवाही करू शकतात.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 21 जून 2023 रोजी चा शासन आदेश
संदर्भीय शासन निर्णयामध्ये जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी पदे विचारात घ्यावी व शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी, असे नमूद करण्यात आलेले आहे.
त्यानुसार सदर समुपदेशन प्रक्रिया करणेकरिता या अगोदर आपणास विहित नमूना देण्यात आला आहे. सदर नमुन्यातील माहिती दि.१८/०९/२०२३ पर्यंत या कार्यालयास संबंधित शिक्षकांच्या कागदपत्रासह सादर करावी. सदरची माहिती विहित मुदतीत व कागदपत्रासह सादर न केल्यास व त्यामुळे आपल्या गटातील प्राथमिक शिक्षकास समुपदेशनास संधी प्राप्त न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली असेल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
भानुदास पालवे, (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर
वरील आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
आंतरजिल्हा बदली बद्दल माहिती आहे का?
ReplyDeleteप्रक्रिया चालू आहे संबंधित जिल्हा परिषदेची संपर्क साधावा
ReplyDelete