वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणीची प्रशिक्षण पूर्ण करत असलेल्या शिक्षक बांधवांना पुढील प्रमाणे मेसेज दिसत आहे.
वरील मेसेज हा अनेक प्रशिक्षणार्थ्यांना दिसत असल्यामुळे हा स्प्रिंग बोर्ड वेब पोर्टलची तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात येते.
अशावेळी जर आपण मोबाईल वरून एप्लीकेशन वापरून प्रशिक्षण करीत असाल तर लॅपटॉप किंवा पीसीवर ब्राउझरवर लॉगिन करून प्रयत्न करून पहा.
किंवा मोबाईल मधील एप्लीकेशन आणि इन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करून लॉगिन करून पहा.
किंवा आपल्या मोबाईलची किंवा पीसी ची ब्राउझर हिस्टरी क्लिअर करून लॉगिन करून पहा.
वरील सर्व प्रयत्न करूनही होत नसेल तर.
वरील तांत्रिक अडचण दूर होण्यासाठी पोर्टल वरील हेल्पलाइनवर फोन करून अथवा ईमेल आयडी वर मेल करून सदर स्क्रीनशॉट स्प्रिंग बोर्ड ला पाठवावा त्यामुळे स्प्रिंग बोर्ड तांत्रिक अडचण दूर करून आपले प्रशिक्षण सुरळीत होईल.
Springboard-Support@Infosys.com
वरील मेलवर आपण आपली अडचण ईमेल करू शकता...
सदर अडचणीमुळे प्रशिक्षण पूर्ण होईल की नाही?
प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून मिळेल का?
प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मागील वर्षीच्या अनुभवानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुरेसा वेळ व प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देईल.
ज्यांचे प्रशिक्षण अपूर्ण आहे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण नक्कीच करून घेण्यात येईल याबाबत कोणीही मनात शंका ठेवू नये.
वरील तांत्रिक अडचण ही सर्वांची तांत्रिक अडचण आहे त्यामुळे कोणीही एकट्याने घाबरून जाण्याची कारण नाही.
सदर तांत्रिक अडचण स्प्रिंग बोर्ड ने सोडवल्यानंतर आपले प्रशिक्षण सुरळीत सुरू होईल.
त्यासाठी आपण वारंवार लॉगिन करू नका काही विशिष्ट कालावधीनंतर पोर्टलवर लॉगिन करून पहावे.
राज्यातील अनेक शिक्षक बांधवांचा मेसेज किंवा फोन द्वारे याबाबत चौकशी होत असल्यामुळे सदर पोस्ट प्रपंच.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
shasan mhantat tyala
ReplyDelete🙏
Delete