मा. आमदार सत्यजीत तांबे, विपस यांची मा. आयुक्त (शिक्षण) यांचे समवेत दिनांक २५/०४/२०२३ रोजी बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार संदर्भ क्र. २ अन्वये इतिवृत्तातील नमूद मुद्यांवर तात्काळ कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहे.
उपरोक्त विषयी विविध संघटनांकडून मागील तीन वर्षांपासून शिक्षकांच्या पावत्या मिळालेल्या नाहीत.
त्यामुळे पीएफच्या पावत्या मिळणेबाबतचे निवेदन संदर्भ ४ अन्वये मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालयाकडून या संचालनालयास प्राप्त झालेले आहे.
संदर्भ क्र. ३ अन्वये दिनांक २०/०४/२०२३ रोजी व्हीसीमध्ये सर्व अधीक्षक, वेतन पथक (प्राथमिक) यांना जीपीएफ च्या पावत्या तात्काळ देणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या.
सबब राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा- यांना मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जीपीएफच्या पावत्या तात्काळ देण्यात याव्यात. तसेच मागील तीन वर्षाच्या वर्षनिहाय पावत्या वाटप केल्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा. पीएफच्या पावत्या प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत मा. आमदार, लोकप्रतिनिधी व विविध संघटनांकडून पाठपुरावा करण्यात येत असल्याने सदर प्रकरणी प्रथम प्राधान्याने कार्यवाही करावी. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.
मा. लोकप्रतिनिधी यांचेकडून पीएफच्या पावत्या मिळालेल्या नाहीत याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
वरील प्रमाणे निर्देश..
शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे ०१ यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांना दिले आहेत
वरील शिक्षण संचालक यांचे आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments