सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू होणार?

 दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजीच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षक भरतीला प्रारंभ होणार असे संकेत मिळत आहेत.


दहा जिल्हा परिषदेच्या शिक्षक विभागाची बिंदू नामावली अंतिम झाली असून उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदू नामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठवण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत त्यामुळे सहा सहा वर्षाच्या भरतीच्या प्रतीक्षा आता संपणार असून पाच सप्टेंबर पूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल उघडले जाणार आहे.


दहा झेडपींची बिंदुनामावली अंतिम; शिक्षकदिनापूर्वी उघडणार 'पवित्र'


राज्यातील जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास ६२ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावरून भरली जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे. सुरवातीला प्रोफाईल तयार करून घ्यावे लागेल. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. दुसरीकडे, खासगी अनुदानित संस्थांना रिक्तपदांची जाहिरात 'पवित्र'वर अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार त्या खासगी संस्थेत पाठविले जातील. त्यांचीनिवड मुलाखतीतून होणार आहे. आता तातडीने बिंदुनामावली अंतिम  करून मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली जात आहे. पाच-सहा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर पवित्र पोर्टल सुरू होईल, अशी माहिती शिक्षण आयुक्तालयातील सूत्रांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


अंदाजे २३ हजार जागांची भरती


राज्यात मागे २०१७मध्ये शिक्षक भरती झाली होती, त्यानंतर टीईटी, टेट होऊनही भरती झाली नाही. विद्यमान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा परिषदांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचेही शिक्षकांअभावी हाल होऊ नये या हेतूने शिक्षक भरतीची घोषणा केली. त्यानुसार युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे. नुकत्याच झालेल्या संचमान्यतेनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणतः २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्तपदांचाही समावेश आहे.


या अगोदर शिक्षण मंत्र्यांनी विधान परिषदेत एका प्रश्नांची उत्तर देताना 17 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टल सुरू होईल व त्याचा टाईम टेबल देखील जाहीर केला होता परंतु बिंदू नामावली अंतिम झालेल्या नसल्यामुळे त्या वेळापत्रकानुसार पवित्र पोर्टल सुरू झालेले नाही.

पवित्र पोर्टल शिक्षक भरती वेळापत्रक


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.