दिनांक १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात 'साक्षरता सप्ताह' राबविणेबाबत शिक्षण संचालकांचे परिपत्रक

 देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यास अनुसरून संदर्भ क्र. २ नुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत 'उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमाची सन २०२२ २०२७ या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून 'जन जन साक्षर' व राज्य शासनाकडून 'साक्षरतेकडून समृद्धीकडे' हे घोषवाक्ये देण्यात आलेले आहे.


संदर्भ क्र.१ नुसार दिनांक ८ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात दिनांक १ सप्टेंबर ते दिनांक ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये 'साक्षरता सप्ताह' राबविणेबाबतचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. सदर साक्षरता सप्ताह दरम्यान उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवावेत. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी व उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम Mobile App वर स्व- नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सदरच्या 'साक्षरता सप्ताह' कालावधीमध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने बार्ड/ गाव / शाळा / महाविद्यालय स्तरावर आयोजित करावयाचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेले आहेत.


'उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरच्या साक्षरता सप्ताहाची आपल्या व आपल्या अधिनस्त यंत्रणांकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. सदर कार्यक्रमांतर्गत निरक्षरांना प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन दि. ८ सप्टेंबर २०२३ या जागतिक साक्षरता दिनी राज्यास सुरू करण्यात यावे. सदरच्या अध्ययन-अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत उपलब्ध साधारणपणे १००० उपलब्ध FLN व्हिडीओ, दिक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या FLN संबंधित व्हिडीओ व उजास भाग-१,२,३,४ ची मदत घेण्यात यावी.


शिक्षणाधिकारी (योजना) जि.प सर्व यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक १ सप्टेंबर ते दिनांक ८ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणान्या विविध उपक्रमाची माहिती/ निवडक फोटो रोज शिक्षणाधिकारी (योजना) WhatsApp group a directorscheme.mh@gmail.com या email वर न चुकता पाठवावेत जेणे करून केंद्र शासनाच्या google tracker वर माहिती/ निवडक फोटो सादर करणे सोयीचे होईल.


सहपत्र - १) संदर्भीय पत्र क्र. १

२) लोगो


(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.