शासन निर्णय दिनांक ०६.०२.२०२३ नुसार अनुदान पात्र शाळांना वेतन अदा करणेबाबत कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तथापि या नंतरही जिल्हास्तर, विभागस्तर व संचालनालय स्तरावर शाळांना अनुदानास अपात्र / त्रुटी पात्र ठरविण्यात आले होते. तरी ज्या शाळांनी अद्याप पर्यंत अनुदाना करीता प्रस्ताव सादर केलेला नाही, त्रुटी मुळे अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत किंवा ज्या शाळांना शासन स्तरावरून पात्र घोषित न केलेल्या प्राथमिक शाळा / तुकड्या यांची माहिती संचालनालयास दिनांक ०४.०८.२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजे पर्यंत depmah2@gmail.com या ईमेलवर सोबत जोडलेल्या प्र पत्रा मध्ये सॉफ्ट व हार्डकॉपी सादर करावी. सदर माहिती दिलेल्या विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास दिनांक ०७.०८. २०२३ रोजी आपण स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावी लागेल याची नोंद घ्यावी.
तरी दिलेल्या विहीत कालावधीचे बंधन पाळावे.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक,
प्राथमिक शिक्षण संचालनालय.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments