शिक्षक बदली प्रक्रिया -२०२३ बाबत महत्वपूर्ण...!

 शिक्षक बदली प्रक्रिया -२०२३ बाबत महत्वपूर्ण ...


शिक्षक आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली बाबत महत्वपूर्ण...!
✍️थेट मंत्रालय स्तरावरून 
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबत आज दि.४ जुलै २०२३ रोजी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व अवर सचिव उर्मिला जोशी मॅडम यांचेशी केलेल्या चर्चेनुसार सविस्तर वस्तुनिष्ठ वृत्तांत देण्यात येत आहे.


प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने दोन्ही बदली प्रक्रिया पूर्वी प्रमाणे ऑनलाईन  कायम ठेऊन अविरत राबविण्यात यावी अशी आग्रही मागणी आज रोजी ग्रामविकास प्रधान सचिव यांना करण्यात आली.आंतरजिल्हा बदलीचा प्रलंबित टप्पा तत्काळ राबविण्यात यावा.तसेच जिल्हा अंतर्गत चे सुधारित धोरण तात्काळ निर्गमित करून प्रक्रिया राबविण्याबाबत मागणी करण्यात आली.दोन्ही बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेचा वस्तुनिष्ठ वृत्तांत येथे देण्यात येत आहे.जिल्हा अंतर्गत बदली बाबत➡️👉जिल्हा अंतर्गत बदली बाबत एका आठवड्यात म्हणजेच १२ जुलै पर्यंत समुपदेशन पद्धतीने प्रक्रिया राबविण्याबाबत पत्र निर्गमित होणार.


👉जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने सीईओ यांचे स्तरावरून समुपदेशन पद्धतीने होईल.


👉जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत सेवाज्येष्ठता हा निकष महत्वपूर्ण असेल.बदली संवर्ग राहतील.


👉जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत ज्या जिल्ह्यात रिक्त पदे असतील अश्या जिल्ह्यातच विनंती बदलीची संधी असेल.


👉प्रशासकीय बदल्या अतिशय कमी टक्केवारीत असतील.


👉शिक्षक भरती पूर्वी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सीईओ यांचे स्तरावर राबविली जाईल.


👉पूर्वी विस्थापित झालेल्या , गैरसोयीच्या पदस्थापना बदलण्याची एक संधी असेल.


👉जिल्हा अंतर्गत बदली बाबत करावयाची कार्यवाही बाबत ग्रामविकास स्तरावरून मार्गदर्शन पत्र निर्गमित केल्या जाईल.


👉या बदली प्रक्रिये नंतर मात्र जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया कायमची बंद असेल, अपवादात्मक परिस्थिती मध्ये विनंती बदली करता येईल.( जसे पती पत्नी एकत्रीकरण , गंभीर आजार अथवा तक्रार )


👉जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत यावेळी दिल्या जाणाऱ्या संधी मध्ये सर्वांची सोय होईल याची कुठलीच शाश्वती नाही.


👉 जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिये बाबतची कार्यवाही बाबत मार्गदर्शन तत्वे अंतिम झाले असून, फाईल माननीय मंत्री महोदय यांचे मण्याते करिता ठेवण्यात आलेली आहे.१२ जुलै पर्यंत पत्र निर्गमित होईल.


जिल्हा अंतर्गत बदली ऑनलाईन प्रक्रिया कायमची बंद होणार असल्याचे धोरण शिक्षण विभाग व ग्रामविकास विभाग यांचे संयुक्त निर्णयाने घेण्यात आलेले असले तरी याबाबत प्रखर विरोध प्रहार च्या वतीने करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे.आंतरजिल्हा बदली बाबत➡️


👉आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सीईओ यांचे स्तरावर आटोपल्यावर घेण्यात येईल.


👉आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही पूर्वी म्हणजेच २०२२ मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज केलेत त्यांचे करिता असेल.


👉आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही सुध्दा भरती प्रक्रिया पूर्वी होणार असली तरी ज्या जिल्ह्यात पदे रिक्त आहेत त्याच जिल्ह्यात होईल.


👉आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही सुध्दा सीईओ यांचे स्तरावर ऑफलाईन करण्याबाबत विचार.


👉आंतरजिल्हा बदली प्रक्रिया नव्याने राबविली जाणार नसून ,केवळ जुन्या अर्जदार शिक्षकांच्या टप्प्याटप्प्याने बदल्या होतील.


👉शिक्षक भरती पूर्वी होणारी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही शेवटची असेल.( यातील उरलेले बदली प्रतीक्षेतील शिक्षकांना भविष्यात रिक्त पदांवर बदली देण्यात येईल )यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद करण्यात येईल.


👉आंतरजिल्हा बदली प्रक्रिया झाल्यावर उर्वरित रिक्त पदांची माहिती अपडेट करून शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.


👉आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ज्या जिल्ह्यात रोस्टर अद्यावत नाही , अश्या जिल्ह्यांना वगळून असेल.साखळी बदलीचा विचार नाही.


👉एकूणच आंतरजिल्हा बदलीचा होणारा टप्पा हा अखेरचा असेल.
आंतरजिल्हा बदली बाबत आग्रही भूमिका प्रहार कडून घेण्यात आलेली असून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही  पूर्वी प्रमाणेच ऑनलाईन ठेऊन कुठल्याही परिस्थिती मध्ये ऑफलाईन करण्यात येऊ नये.आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सर्वांना संधी देण्यात यावी.बदली प्रक्रिया बंद केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


लवकरच दोन्ही बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने न्याय मागण्या बाबत मा.शिक्षणमंत्री व मा.ग्रामविकास मंत्री महोदय यांचे सोबत आमदार बच्चुभाऊ कडू यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये संघटनेची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.


महेश ठाकरे ,राज्याध्यक्ष 

(पुढील सविस्तर अपडेट लवकरच देण्यात येईल.)
जिल्हा अंतर्गत बदली -२०२३ चे अप्रूव्हल मिळाले आहे. लवकरच म्हणजे दोन दिवसात शासन आदेश निर्गमित होईल...

आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया या महिन्यात सुरू करण्यात येईल..

तशी आग्रही मागणी प्रहार च्या वतीने करण्यात आलेली आहे.लवकरच दोन्ही बदली बाबत सविस्तर पोस्ट ग्रामविकास स्तरावरून देण्यात येईल.महेश ठाकरे

राज्याध्यक्ष

प्रहार शिक्षक संघटना,महा. यांनी दिलेल्या माहितीवरून.ब्रेकिंग न्यूजआताच मिळालेल्या माहितीवरून....महाराष्ट्रातील राजकारणाचा कोणताही परिणाम न होता...आज किंवा उद्या जिल्हा अंतर्गत बदली बाबत... 

पत्र येणार म्हणजे येणार... विनंती बदलिची प्रक्रिया जिल्हा स्तरावरून होईल.


मा. Ceo यांच्या नियंत्रणाखाली प्रक्रिया सुरु होत आहे....वरील माहिती व्हाट्सअप वरून मिळालेली आहे..

अधिकृत असे शासनाचे परिपत्रक अद्याप निर्गमित झालेले नाही.शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.