बार्टी देणार SC मुला मुलींसाठी एमपीएससी (MPSC) चे 12 महिन्याची कोचिंग नाशिक/पुणे येथे मोफत, 9000 प्रतीमहिना 12 महिन्यासाठी व 25000 रुपये पुस्तकांसाठी वर्षाच्या शेवटी संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक.

बार्टी देणार SC मुला मुलींसाठी एमपीएससी (MPSC) चे 12 महिन्याची कोचिंग नाशिक/पुणे येथे मोफत, 9000 प्रतीमहिना 12 महिन्यासाठी व 25000 रुपये पुस्तकांसाठी वर्षाच्या शेवटी.. 


वाचा संपूर्ण माहिती... 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे

२८, क्वीन्स गार्डन, कॅम्प पुणे. -४११ ००१.

(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था )

 

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा - २०२३ - २४ या प्रशिक्षणासाठी पुणे व नाशिक येथे निःशुल्क, अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) साठी अर्ज मागविण्यात येत आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र युवक-युवतींनी

https://register.bartieducare.in/student/register 

लिंकवरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.


पुणे व नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण संस्थामार्फत अनुक्रमे पुणे करीता २०० व नाशिक करीता २०० अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी ४ टक्के जागा दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी (Person With Disability), ५% जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील (वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मातंग, मांग,मादगी, ई.) विद्यार्थ्यांकरिता आरक्षित असतील, एकूण जागांच्या ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येईल.


पात्रता :-


१) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२) उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.

३) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

४) उमेदवाराचे वय महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवेच्या अटी व शर्ती नुसार असावे. 

५) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ २४ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांस बसणेसाठी पात्र असावा.

६) रु.८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील.


विद्यार्थी निवडीचे निकष:-


> प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने गुणवत्ता यादीतील रु.८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेच्या धर्तीवर असेल.


प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :-


१) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १०/०७/२०२३ २) प्रशिक्षण कालावधी १२ महिन्यांचा राहील.

(३) पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा दि. ३०/०७/२०२३ रोजी घेण्यात येईल. उमेदवारांची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. ४) निवड झालेल्यापैकी पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दरम्यान रोज ४ तास व त्यापेक्षा जास्त कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच एकूण दरमहा ८० टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ९०००/- विद्यावेतन देण्यात येईल. (५) विद्याथ्यांना टेस्ट सिरीज (ऑनलाईन / ऑफलाईन) व विशेष शैक्षणिक साहित्य व पुस्तके यासाठी प्रती विद्यार्थी रक्कम रु.२५०००/- विद्याथ्यांना देण्यात येईल.


६) प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणतीही शासकीय/निमशासकीय खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही. ७) ज्या उमेदवरांनी यापूर्वी बार्टी पुणे मार्फत (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व UPSC नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण यापूर्वी घेतले असेल त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही.


८) सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा.महासंचालक, बार्टी तसेच शासनास राहतील.


(सुनिल वारे)

महासंचालक, बाटी, पुणे.




शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.