वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण 2023-2024 मोबाईल/संगणक/लॅपटॉप वरून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीसाठी मार्गदर्शक सूचना

 शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कडे सोपविण्यात आलेली आहे. शिक्षक / मुख्याध्यापक / प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून सद्यस्थितीमध्ये सदरच्या पात्र सर्व शिक्षक पूर्ण करणे अनिवार्य आहे. तदनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मिळणार नाही, प्रशिक्षण प्रणालीवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक यांचेशी संपर्क करावा.


 शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र / मुख्याध्यापक / प्राध्यापक / प्राचार्य यांचे प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एकाच टप्यामध्ये पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक खालीलप्रमाणे सूचना सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी अवगत करावेत, प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे


• सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण है 

https://intyspringboard.onwingspan.com/web/en/login

या लिंकवर क्लिक करून आपणास सुरु करता येईल.


. सदरचे प्रशिक्षण हे पात्र प्रशिक्षणार्थ्यास दिनांक १० जुलै २०२३ पासून २४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे. प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरु झाल्यापासून एकूण ४५ दिवसांच्या कालावधी मध्येच याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये Infosys Springboard या नावाचे अॅप्लीकेशन प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून सदरच्या अॅपद्वारे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सदरचे अॅप्लीकेशन है

https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard

या लिंकवरून देखील प्रशिक्षणार्थी डाऊनलोड करू शकतात.


पात्र प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण (वरिष्ठ / निवड श्रेणी प्रशिक्षण हे पूर्ण करण्याकरीता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत आवश्यक आय.डी व पासवर्ड या पूर्वीच मोबाईल SMS / ई मेल द्वारे पाठविण्यात आलेला आहे.


प्राप्त आय. डी. वा पासवर्ड च्या साह्याने प्रशिक्षणार्थी अॅप्लीकेशन अथवा सोबतच्या लिंकच्या माध्यमातून पोर्टल वर जाऊन प्रशिक्षणास सुरुवात करू शकतात.


प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्वाचे


शिक्षकांना यापूर्वी नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या प्रशिक्षण प्रकारासाठी (वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी) पात्र असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.


प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सूचना

• सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करतांना प्रशिक्षणार्थ्यांना घटकनिहाय वाचनसाहित्य (३० मि.).


चित्रफिती अभ्यासणे (अंदाजे २ ते ३ तास), चाचणी सोडविणे (१५ मि.), स्वाध्याय पूर्ण करणे ( २ तास) तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरविण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी यांना प्रत्येक घटक पूर्ण झाल्यानंतर आवश्यक चाचणी सोडविण्यासाठी फक्त १५ मि. तर स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी २ तास वेळ राखीव आहे, त्यामुळे प्रशिक्षणार्थी यांनी आपली चाचणी ज्या वेळेस सोडवायची आहे त्याच वेळेस start बटन दाबावे. तसेच ज्या वेळेस आपले स्वाध्याय लिहून पूर्ण झाले असतील त्याच वेळेस start वर क्लिक करून पोर्टलवर ऑनलाईन नोंदवावे. विहित वेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित प्रशिक्षणार्थ्यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही, याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.


१. प्रत्येक घटकानंतर सदरच्या घटकावर आधारित चाचणी व स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


२. सर्व मोड्यूल्सनिहाय चाचण्या मिळून एकूण ४०% गुण पात्र प्रशिक्षणार्थ्यास प्राप्त करणे अनिवार्य राहील; तरच संबंधित प्रशिक्षणार्थ्यास डिजिटल प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहे.


३. सदरच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे, घटक सोडविणे, चाचणी व स्वाध्याय सोडविणे, प्रमाणपत्र डाऊनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी

http://training.scertmaha.ac.in/


या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ आपण पाहू शकता. तसेच सोबत जोडलेल्या SOP ची देखील मदत घेऊ शकता. मोबाईल SOP, Desktop SOP)


४. कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याने अथवा इतर शिक्षकाने सदरच्या प्रशिक्षणातील चाचणी / स्वाध्यायाशी संबंधित व्हिडीओ par आपल्या ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल वर अथवा इतर सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केल्यास संबंधित व्यक्ती माहिती तंत्रज्ञान कायदा २००५ कलम ६६ अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी. ५. स्वाध्याय व चाचणी सोडविताना घ्यावयाची आवश्यक काळजी ही सोबतच्या माहितीदर्शक चित्रफितीमध्ये सविस्तर विषद करण्यात आलेली आहे. सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या चित्रफिती काळजीपूर्वक पाहून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी.

सदरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना व महत्त्वपूर्ण बाबी या सर्व सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी महत्वाचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संबंधित जिल्हा यांचेशी संपर्क करावा.

८. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण म्हणजे संबंधित शिक्षक / प्राचार्य हे वरिष्ठ वेतन / निवड श्रेणीसाठी पात्र ठरतीलच असे नाही; याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.


९. प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये डिजिटल पद्धतीने डाउनलोड साठी http://training.scertmaha.ac.in/ येथे उपलब्ध होणार आहेत याची नोंद घेण्यात यावी.


१०. सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण प्रोफाईल मध्ये प्रशिक्षणार्थ्याचे नाव ज्या लिपीमध्ये (मराठी / इंग्रजी) असेल तसेच नाव प्रशिक्षणार्थ्याच्या डिजिटल प्रमाणपत्रावर येणार आहे याची नोंद घ्यावी. त्यामुळे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मराठी मध्ये असल्याने प्रशिक्षणार्थ्याने आपल्या प्रोफाईल मधील नाव हे मराठी मध्येच ठेवावे.


११. प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दररोज सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय.डी. व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे.


दैनिक शंका समाधान सत्र तपशील


Topic: SCERT Maharashtra's Senior and Selection Training Zoom Meeting


Time: 11.30 am to 12.30 pm


Meeting ID: 99156392904


Passcode: 175287


(कौस्तुभ दिवेगावकर)


संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadशैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.