Udise Plus Aadhaar Validation Update - विद्यार्थी व शिक्षकांचे आधार वेलिडेशन यु डायस प्लस सन २०२२-२३ प्रणालीमध्ये नोंदणी पूर्ण करून घेणेबाबत

 यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक यांची माहिती सविस्तर नोंदणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. दि. ०६ जुलै, २०२३ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार २,०३, ७६.८६५ एवढे विद्यार्थ्यांपैकी ९१,६२,३४२ (४५%) विद्यार्थ्याचे आधार वेलिडेशन पूर्ण झालेले आहे आणि ७,४१,७९६ एवढे शिक्षकांपैकी ४,८९,००३ (६६%) शिक्षकांचे आधार वेलिडेशन पूर्ण झालेले आहे.


संदर्भिय भारत सरकारकडील पत्रानुसार समग्र शिक्षा योजनेतून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाच्या योजना मोफत पाठ्यपुस्तकें, मोफत गणवेश, HTE प्रवेश, द्विव्यांग विद्यार्थ्यांनांकरिता देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, स्कॉलरशिप इत्यादीकरिता विद्यार्थ्यांचे आधार वेलिडेशन १००% पूर्ण करून घेण्याकरिता नमूद केले आहे. त्याचप्रमाणे शासकीय व अनुदानित शाळांमधील १००% शिक्षकांचे वैलिडेशन पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. आधार बेलिडेशन करतांना तांत्रिक अडचणी येत असल्यास समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत जिल्हा व तालुका स्तरावरील संगणक प्रोग्रामर, MIS-Co-ordinator, डाटा एन्ट्री ऑपरेटर, टॅक्नोसेवी शिक्षक यांची मदत घेण्यात यावी. याबाबत आपणास कळविण्यात येते की, शासनाकडून देण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची आधार वेलिडेशन तात्काळ पूर्ण करून घेण्यात यावे कारण पुढील वर्षीचे बजेट याच शाळा, विद्यार्थी व शिक्षक संख्येवर आधारित असेल त्यामुळे कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही. याची खात्री करावी अन्यथा केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार नाही याची नोंद घ्यावी. सोबत यु डायस प्लस प्रणालीमधील दि. ०६ जुलै २०२३ रोजीचा जिल्हानिहाय विद्यार्थी व शिक्षक आधार बेलिडेशनबाबतचा अहवाल माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.


राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadशैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.