संच मान्यता फायनल करण्यासाठी विद्यार्थ्याचे आधार १५ जून २०२३ पर्यंत वैध करून घेणेबाबत शिक्षण संचालकांचे निर्देश

 विद्यार्थ्याचे आधार १५ जून २०२३ पर्यंत वैध करून घेणेबाबत शिक्षण संचालकांचे निर्देश


सन २०२२ २०२३ अंतरिम संच मान्यता हि ३०/११/२०१२ रोजी असलेल्या पटसंययेपैकी सध्यस्थितीत वैध्य आधार असलेल्या विद्यार्थी संख्येवर केली आहे. सन २०२२-२३ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध्य करण्यासाठी येळेवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तथापी अद्यापही काही शाळातील विद्यार्थी Without Aadhar/Invalid/Mismatch मध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या असून देखील अवैध्य आधार संख्येमुळे शाळांच्या संच मान्यतेमध्ये मंजूर पदे कमी झालेली दिसून येत आहे.


शाळेतील Without Aadhar / Invalid / Mismatch मधील सर्व विद्यार्थ्याचे आधार वैध्य करण्यासाठी शाळांना दिनांक १५ जून २०२३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. सदर मुदतीनंतर सन २०२२-२३ ची संच मान्यता अंतिम करण्यात येणार असल्याने १५ जून पर्यंत आपल्या विभागातील व जिल्ह्यातील Without Aadhar / Invalid / Mismatch मधील सर्व विद्यार्थ्यांचे आधार तात्काळ वैध्य करन घ्यावेत. 14 जून २०२३ नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही. Without Aadhar/Invalid/Mismatch मधील विद्याथ्र्यांमुळे 19 जून २०२३ नंतरच्या सन २०२२-२३ च्या अंतिम संच मान्यतेमध्ये मंजूर पद संख्या गतवर्षीच्या मंजूर पदसंख्येच्या तुलनेत कमी झाल्यास त्यास ती शाळा व आपण जबाबदार असाल त्याबाबत १५ जून २०२३ नंतर कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.


Without Aadhar/Invalid / Mismatch मधील सर्व विद्यार्थ्याचे आधार १५ जून २०२३ पर्यंत वैध्य करून घेण्यासाठी आपल्या विभागातील व जिल्ह्यातील संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या काढून संबंधित शाळांशी संपर्क साधून त्यांच्या कडून सदर विद्यार्थ्याचे आधार तात्काळ वैध्य करन घ्यावेत त्यासाठी सर्व तालुक्यांना आधार मशिन देखील पुरवण्यात आलेल्या आहेत. सर्व शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या जिल्ह्यातील Without Aachar/ Invalid / Mismatch मधील


असलेल्या विद्यार्थ्याचा आढावा घेऊन संबंधित जिल्ह्यातून 19 जून २०१३ पर्यंत सर्व विद्यार्थ्याचे आधार वैध्य करून घ्यावेत.



वरील GR पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.