महाराष्ट्रातील शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 नुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरवणे बाबत एकूण आठ नियम.
सध्या तरी शासन निर्णयानुसार यावर्षीची संच मान्यता ही विद्यार्थ्यांच्या आधार वैध संख्येनुसार होणार आहे अर्थात असे झाल्यास काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर कारणांमुळे काही शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरू शकतात.
जर शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरत असेल तर कार्यरत असलेल्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी कोणाला अतिरिक्त ठरवावे याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती 1981 नुसार पुढील प्रमाणे नियम आहेत.
अतिरिक्त शिक्षक कर्मचारी नियम क्रमांक एक.
अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी
अशासकीय अनुदानित प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ अध्यापक विद्यालय येथील स्थायी शिक्षक / कर्मचाऱ्यांना सेवेत संरक्षण देण्यात आले आहे.
१. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ यातील नियम २५ अ, २६ व २७ यात स्थायी शिक्षक कर्मचारी यांच्या सेवा समाप्त करणे किंवा सेवेला संरक्षण देणे याबाबतचे नियम दिलेले आहेत. २. खालील कारणांमुळे स्थायी शिक्षक / कर्मचारी यांची सेवा समाप्त करावयाची असल्यास त्यांना सेवेत संरक्षण देण्यात येईल. ती कारणे अशी.
३. (अ) वर्ग तुकडयांची संख्या कमी होणे, (ब) विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होणे, (क) अभ्यासक्रमात बदल होणे, (ड) अभ्यासविषयक पाठयक्रम बंद होणे किंवा (इ) तत्सम स्वरूपाची अन्य कारणे.
(शासन निर्णय दि. २०.२.९६ यात अस्तित्वात असलेल्या तुकडयांच्या निश्चितीबाबत खालीलप्रमाणे निकषे दिली आहेत. शासन निर्णय दि. ३०२ २०.२.९६ अन्वये इ. ५ वी ते १० वीच्या दरम्यान त्या वर्गतुकडीची एकच तुकडी असेल आणि त्यात ४० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असेल तरी इतर अटींच्या आधीन राहून अस्तित्वात असलेली ती वर्ग तुकडी मान्य राहील. विद्यार्थी संख्या ७१ ते १२० दरम्यान असल्यास दोन तुकडया, १२१ ते १७० दरम्यान असल्यास तीन तुकडया. १७१ ते २२० दरम्यान असल्यास चार तुकडया, २२१ ते २७० दरम्यास असल्यास पाच तुकडया याप्रमाणे अस्तित्वात असलेल्या तुकडया मान्य राहतील. विद्यार्थी संख्या कमी झाल्यास तुकडी अमान्य होईल. परिणामी शिक्षक-कर्मचारी अतिरिक्त होतील.)
४. अतिरिक्त ठरविणे - व्यवस्थापक वर्ग, वरील परिच्छेद ३ अन्वये शिक्षक-कर्मचारी कमी होत असतील तर त्यांच्या सेवा समाप्त न करता अतिरिक्त म्हणून ठरवील.
५. शिक्षक / कर्मचारी याला अतिरिक्त ठरविताना पुढील बाबी विचारात घेण्यात येतील.
६. माध्यमिक शाळेच्या टप्प्याला म्हणजे इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतच्या तुकडयांची संख्या कमी करावयाची असेल त्या बाबतीत प्रशिक्षित पदवीधरांच्या प्रवर्गातील कनिष्ठतम शिक्षकाला अतिरिक्त ठरविण्यात येईल.
७. पूर्व माध्यमिक शाळेच्या टप्प्याला म्हणजे इयत्ता ५ वी ते ७ पर्यंतच्या तुकडयांची संख्या कमी करावयाची असेल त्या बाबतीत प्रशिक्षित अपदवीधर प्रवर्गातील कनिष्ठतम शिक्षकाला अतिरिक्त ठरविण्यात येईल. (एक) सेवेत प्रवेश करताना काही शिक्षक अप्रशिक्षित एस.एस.सी. किंवा (दोन) एस.एस.सी. एस.टी.सी. किंवा तत्सम प्रमाणपत्र
अतिरिक्त शिक्षक कर्मचारी नियम / २
धारक असतील आणि त्यांनी आपल्या अर्हता सुधारल्यामुळे (एक) अनुक्रमे अप्रशिक्षित पदवीधर किंवा (दोन) प्रशिक्षित पदवीधर म्हणून त्याचा प्रवर्ग बदलला असेल आणि त्याला अतिरिक्त ठरवावयाचे असेल तर त्यांना (एक) अप्रशिक्षित एस.एस.सी. किंवा (दोन) प्रशिक्षित एस.एस.सी. प्रमाणपत्रधारक इत्यादींसारख्या मुळच्या प्रवर्गात परत जाण्याचा विकल्प देण्यात येईल. त्यांनी तसे केल्यानंतर त्या प्रवर्गातील कनिष्ठतम शिक्षकाला अतिरिक्त ठरविण्यात येईल.
८. व्यवस्थापन एकापेक्षा अधिक शाळा चालवीत असेल त्या बाबतीत आणि चालवीत असलेल्या शाळांपैकी कोणत्याही एका शाळेत शिक्षक कर्मचारी अतिरिक्त ठरवावयाचा असेल त्या बाबतीत शिक्षक कर्मचारी वर्गात अतिरिक्त ठरविताना व्यवस्थापन चालवीत असलेल्या सर्व शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेचा विचार सामाईकपणे करण्यात येऊन कनिष्ठतम शिक्षक-कर्मचाऱ्याला अतिरिक्त ठरविण्यात येईल.
९. व्यवस्थापक वर्ग, सर्वसाधारणपणे कनिष्ठतम शिक्षक कर्मचारी याला अतिरिक्त ठरविल्याचे परंतु विषयवार शिक्षकाची गरज मागासवर्गीयांचे प्रमाण व अन्य योग्य कारणांमुळे सेवाज्येष्ठ शिक्षक कर्मचारी याला अतिरिक्त ठरवावयाचे असेल तर प्रकरणपरत्वे उपसंचालक किंवा शिक्षणाधिकारी यांची पूर्वमान्यता घेईल.
१०. शिक्षक कर्मचारी वर्गात कोणालाही अतिरिक्त ठरवावयाचे असेल तेव्हा अगोदरच सेवेत असलेल्या मागासवर्गीय व्यक्ती ज्येष्ठतेच्या सूत्रानुसार अतिरिक्त होणार असतील तरीही शाळेतील त्यांची संख्या विहित केलेल्या राखीव जागांच्या टक्केवारीपेक्षा अधिक नसेल तर त्यांना अतिरिक्त ठरविता येणार नाही. त्याच्याऐवजी मागासवर्गीयेतर शिक्षक-कर्मचारी वर्गापैकी इतर व्यक्तींना अतिरिक्त ठरविण्यात येईल.
११. संस्थेने अतिरिक्त ठरविण्याच्या निर्णयामुळे ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटत असेल तर त्याला प्रकरणपरत्वे संबंधित उपसंचालक किंवा शिक्षणाधिकारी यांचेकडे अपील दाखल करता येईल.
१२. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक कर्मचाऱ्याला प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेबाबत शिक्षणाधिकारी व कनिष्ठ महाविद्यालय किंवा कनिष्ठ अध्यापक विद्यालय याबाबत उपसंचालक सामावून घेण्याची कार्यवाही करील. कर्मचान्याला तसे पोच देय डाक नोंदणी पत्राद्वारे कळविण्यात येईल आणि त्याला इतरत्र सामावून घेण्यात येईपर्यंत त्याच व्यवस्थापनेत ठेवण्यात येईल.
१३. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक कर्मचाऱ्याने त्याला जेथे सामावून घेण्याचे ठरविले असेल, तेथे रूजू होण्यास नकार दिला तर त्याने सामावून घेण्याबाबतचा आपला हक्क गमावला आहे असे समजण्यात येईल, अशा बाबतीत अशा शिक्षक / कर्मचाऱ्याला व्यवस्थापक वर्ग नियमानुसार तीन महिन्यांची पूर्वसूचना देऊन किंवा तीन महिन्यांचा पगार देऊन त्याची सेवा समाप्त करील.
१४. कमी केलेली पदे पुनरुज्जीवित करण्यात आली असतील किंवा त्याच विषयासाठी जादा पदे निर्माण करण्यात आली असतील तर ज्या कर्मचाऱ्याला कमी केले त्याला घेतले जाईल.
अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी नियम / ३
करण्यात आले असेल व इतर शाळेत सामावून घेण्यात आले असेल अशा कर्मचाऱ्याला पोच देय डाक नोंदणी पत्राद्वारे त्या शाळेत पुन्हा कामावर रूजू होण्याची संधी व्यवस्थापक वर्ग प्रथम देईल. या प्रयोजनासाठी कर्मचाऱ्याने दरवर्षी व्यवस्थापनाला आपला पत्ता व आपली उपलब्धता एप्रिल महिन्यापूर्वी देय डाक नोंद पत्राद्वारे कळविली पाहिजे. कमी केलेल्या व अन्य शाळेत सामावून घेतलेल्या व्यक्तीला तिच्या मूळच्या शाळेत प्रत्यावर्तित होणे किंवा ज्या शाळेत तिला सामावून घेण्यात आले असेल त्याच शाळेत आपली सेवा पुढे चालू ठेवणे याबाबत विकल्पाधिकार असेल.
१५. कर्मचान्याने त्याला ज्या शाळेत सामावून घेण्यात आले असेल, त्याच शाळेत आपली सेवा पुढे चालू ठेवण्याबाबतचा विकल्प स्वीकारला तर किंवा व्यवस्थापक वर्गाने त्याची शाळेत पुन्हा नियुक्ती करण्याबाबत किंवा त्याला परत पूर्वीच्या शाळेत घेण्याबाबत विचारणा करण्यासंबंधीचे त्याला उद्देशून पाठविलेले पोच देय डाक पत्र मिळाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत कर्मचाऱ्याकडून लेखी उत्तर मिळाले नाही तर किंवा अशी विचारणा करण्याचे पत्र स्वीकारण्यास त्याने नकार दिला तर, व्यवस्थापक वर्गास इतर कोणत्याही अर्हताप्राप्त व्यक्तीची नेमणूक करून असे पद भरण्याची मोकळीक राहील.
१६. एखादा कर्मचारी मूळ शाळेत प्रत्यावर्तीत होण्याचा विकल्प स्वीकारील त्यावेळी त्याला त्याचे वेतन ज्येष्ठता इत्यादी बाबतीत व मूळ स्थितीवर पुनःस्थापित केले जाईल. १७. अतिरिक्त शिक्षक कर्मचारी याला ज्या शाळेत सामावून घेण्यात आले आहे त्याची सेवा नियमावली नियम २८ (१) च्या नियमानुसार (तात्पुरते म्हणून) समाप्त करण्यात येणार नाही.
१८. ज्याची सेवा नियम २५ (अ) प्रमाणे समाप्त करावयाची असेल तर त्यातील तरतुदींचा अवलंब करून करण्यात येईल. १९. अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी याला अन्य शाळेत ज्या तारखेला सामावून घेण्यात आले आहे त्याच तारखेला सेवाज्येष्ठता सूचीत संबंधित प्रवर्गात समावेश करण्यात येईल आणि नियमानुसार पदोन्नतीसाठी त्याचा विचार करण्यात येईल.
२०. शाळेतील विद्यार्थीसंख्या वर्गतुकडयांची संख्या कमी झाली असेल आणि त्याचा परिणाम म्हणून शिक्षक-कर्मचारी याचे वेतन दर्जा किंवा सवलत कमी झाली असेल अशा शिक्षक - कर्मचाऱ्याला नियम २६ (२) अन्वये अतिरिक्त म्हणून समजण्यात येणार नाही. अशा बाबतीत त्याला खालच्या वेतनावर, निम्न पदावर किंवा अर्धवेळ पदावर काम करावे लागेल. त्याने तसे करावयास नकार दिला तर सक्षम अधिकारी त्याची सेवा तीन महिन्यांची पूर्वसूचना देऊन समाप्त करावी असे कळवील.
२१) अतिरिक्त शिक्षक म्हणजे, तुकडी कमी झाल्यामुळे किंवा एखादा अभ्यासक्रम बंद झाल्यामुळे किंवा तत्सम स्वरूपाच्या अन्य कारणामुळे जो कायम शिक्षक कमी होईल त्याला अतिरिक्त शिक्षक म्हणता येईल.
अतिरिक्त शिक्षक कर्मचारी नियम / ४
२२) अतिरिक्त कर्मचारी म्हणजे तुकडी कमी झाल्यामुळे किंवा विद्यार्थीसंख्येत घट झाल्यामुळे किंवा तत्सम स्वरूपाच्या अन्य कारणांमुळे जो कायम कर्मचारी कमी होईल त्याला अतिरिक्त कर्मचारी म्हणता येईल.
२३) अनुकंपा नियुक्ती म्हणजे कर्मचारी दुर्धर रोगाने आजारी पडल्यामुळे अकाली सेवानिवृत्त झाला. किंवा सेवेत असताना त्यास मृत्यु आला तर त्याच्या जवळच्या नातेवाईकास मान्यता काढून घेणे किंवा शाळा बंद करणे.
ठरविण्यात येत नाही. त्याला मर्यादित संरक्षण आहे ते असे.
1
ज्या प्रक्रियेने सेवेत नियुत्ती देण्यात येते त्या प्रक्रियेला अनुकंपा नियुक्ती म्हणतात. नियम २५ (अ) व्यवस्थापक वर्गाने स्वेच्छेने शाळा बंद केली किंवा शासनाने मान्यता घेतली अशा बाबतीत स्थायी शिक्षक कर्मचाऱ्याला नियम २६ (२) (१) नुसार अतिरिक्त काढून
१) (अ) व्यवस्थापकवर्गाने निर्णय घेऊन संपूर्ण शाळा किंवा त्याचा भाग बंद करण्याबाबत तीन महिने पूर्वसूचना दिली असेल आणि संबंधित शाळा किंवा त्याचा भाग बंद करण्यात आला असेल अशा बाबतीत स्थायी शिक्षक-कर्मचान्यांच्या सेवा आपोआप समाप्त होतील.
१) (ब) शिक्षण उपसंचालकाकडून शाळेची मान्यता काढून घेण्यासंबंधीची सूचना व्यवस्थापक वर्गाला प्राप्त होताच व्यवस्थापक वर्ग संबंधित स्थायी शिक्षक-कर्मचाऱ्यांना तीन महिन्याची पूर्व सूचना देऊन त्यांच्या सेवा समाप्त करील.
वरील १(अ) अनुसार बंद झालेल्या शाळेचे शिक्षक-कर्मचारी तसेच १ (ब) अनुसार मान्यता काढून घेण्यास प्रत्यक्ष जबाबदार नसलेले, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांची नावे शिक्षणाधिकारी व कनिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ अध्यापक विद्यालयातील शिक्षक-कर्मचाऱ्यांची नावे उपसंचालक प्रतीक्षासूचीवर घेतील व त्या नावाची, त्या जिल्ह्याची नव्याने उघडण्यात आलेल्या अनुदानित शाळांच्या किंवा अस्तित्वात असलेल्या ज्या अनुदानित शाळांना अतिरिक्त वर्ग किंवा तुकडया मंजूर करण्यात येतील अशा शाळांच्या व्यवस्थापकांना सामावून घेण्याकरिता शिफारस करतील.
वरील नियम २५ (अ) याला शासनाने दिनांक १५.११.९५ रोजी एका अधिसूचनेद्वारे दुरुस्ती प्रस्तावित केली आहे. त्यात 'अशी शाळा बंद होण्यास किंवा मान्यता काढून घेण्यास प्रत्यक्ष जबाबदार नाहीत अशांची नावे प्रतीक्षासूचीवर घेण्यात येतील व सक्षम अधिकारी शाळांच्या व्यवस्थापकांना सामावून घेण्याकरिता शिफारस करील. अशा अतिरिक्त शिक्षक कर्मचान्यांना ते व्यवस्थापन नियुक्ती देईल असे नमूद केले आहे.
अतिरिक्त पदे व मुद्दे
१. अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी यांच्या यादया सर्व तपशीलासह जिल्ह्यातील/ विभागातील सर्व संस्था प्रमुखाना पाठविण्यात येतील.
२. उपसंचालक / शिक्षणाधिकारी यांनी अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी यास सामावून होण्याचा आदेश दिला असेल तर व्यवस्थापक वर्गास त्याचे पालन करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.
अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी नियम / ५
३. उपसंचालक / शिक्षणाधिकारी अतिरिक्त शिक्षक-कर्मचान्याला ज्या शाळेत सामावून घेण्याचा आदेश देईल, त्यावेळी त्या शाळेच्या विषयाची गरज माध्यम आणि अन्य शिक्षणविषयक बाबींचा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विचार करील.
४. सक्षम अधिकाऱ्याने अतिरिक्त शिक्षक/कर्मचा-याची समावेशनाची कार्यवाही करीत असताना शासनाने विहित केलेले राखीव जागेचे प्रमाण नियमाप्रमाणे राहील याची दक्षता घेईल.
५. अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी यांचे वेतन तो अन्य शाळेत हजर होईपर्यंत तो ज्या संस्थेत अतिरिक्त झाला आहे त्या संस्थेत चालू राहील.
६. अतिरिक्त शिक्षकांना- कर्मचाऱ्यांना ज्या शाळेत सामावून घेण्यात आले असेल त्या शाळेत तो रूजू झाल्याच्या तारखेपासून त्याची संबंधित प्रवर्गात सेवाज्येष्ठता निश्चित करण्यात येईल.
७. अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी याला ज्या शाळेत सामावून घेण्यात आले आहे त्या शाळेत त्याच्या पूर्वीच्या शाळेत साठलेल्या रजा मिळण्याचा हक्क असेल.
८. अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी याला ज्या शाळेत सामावून घेण्यात आले आहे. त्याला तेथे तात्पुरता (टेंपररी) समजण्यात येणार नाही. ९. सरकारमान्य खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक-कर्मचारी यांना सर्वसाधारणपणे वरीलप्रमाणेच नियम लागू आहेत.
१०. महाविद्यालयातील अतिरिक्त शिक्षक-कर्मचारी यांच्याबाबतचे शासननिर्णय पुढे दिले आहेत.
अतिरिक्त शिक्षक कर्मचारी कायद्यातील तरतुद
महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम (कायदा) १९७७ यातील कलम ५ यात असे नमूद केले आहे की (१) व्यवस्थापन खाजगी शाळेतील प्रत्येक स्थायी / रिकामे पद शक्य तितक्या लवकर विहित करण्यात आलेल्या रीतीने अशा रिकाम्या पदासाठी यथोचित अर्हताप्राप्त व्यक्तीची नेमणूक करून भरील.
(परंतु असे रिकामे पद पदोन्नतीद्वारे भरण्यात यावयाचे नसेल तर व्यवस्थापन असे रिकामे पद भरण्याच्या बाबतीत कार्यवाही करण्यापूर्वी शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई किंवा यथास्थिती शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून त्यांनी अन्य शाळामध्ये समावेशनाकरिता ठेवलेल्या अतिरिक्त व्यक्तीच्या यादीमधून कोणतीही योग्य व्यक्ती उपलब्ध होण्याजोगी आहे किंवा कसे याची खात्री करून घेईल व अशी कोणतीही व्यक्ती उपलब्ध असेल त्याबाबतीत व्यवस्थापन त्या व्यक्तीची अशा रिकाम्या पदावर नेमणूक करील (ही तरतूद खाजगी प्राथमिक शाळांनाही लागू आहे.)
अतिरिक्त शिक्षक कर्मचारी
महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम १९८५ यातील नियम. २५ व २६ यात स्थायी शिक्षक कर्मचारी यांच्या सेवा समाप्त करणे किया सेवेत संरक्षण देणे याबाबतचे यम दिले आहेत ते येथे जसेच्या तसे दिले आहेत.
अतिरिक्त शिक्षक कर्मचारी नियम / 6
25. पदे रद्द केल्यामुळे सेवा समाप्ती (हा नियम क्रमांक PST/1087/11/SE-3-सेल, दिनांक 20.10.1987 द्वारे जोडला गेला आहे.)
-
1. कायमस्वरूपी कर्मचार्याच्या सेवा व्यवस्थापनाद्वारे शाळा बंद झाल्यामुळे पदे रद्द केल्यामुळे त्यांना तीन महिन्यांची आगाऊ सूचना दिल्यानंतर रद्द केली जाऊ शकते की शाळा बंद झाल्यास, त्यांच्या सेवा आपोआप बंद होतील. स्टँड समाप्त. मान्यता रद्द झाल्यामुळे शाळा बंद झाल्यास, अशी तीन महिन्यांची आगाऊ सूचना व्यवस्थापनाकडून स्थायी कर्मचार्यांना मिळाल्यानंतर देण्यात येईल.
उपसंचालकांकडून कारणे दाखवा नोटीस. स्पष्टीकरण - या उप-नियमाच्या हेतूंसाठी, शाळा बंद करण्याच्या अभिव्यक्तीमध्ये हे समाविष्ट असेल -
(i) संपूर्ण शाळा व्यवस्थापनाने एका माध्यमाद्वारे किंवा एक किंवा अधिक शिक्षण माध्यमांचा समावेश असलेल्या शाळेचा एक भाग एकापेक्षा जास्त माध्यमांतून शिक्षण देत असल्यास, संपूर्ण शाळा स्वेच्छेने बंद करणे; आणि
(ii) मान्यता रद्द केल्यामुळे शाळा बंद करणे ई विभाग.
2. अनुदानित शाळांमधील कर्मचार्यांची नावे, ज्यांच्या सेवा उप-नियम (1) नुसार मान्यता रद्द झाल्यामुळे संपुष्टात आल्या आहेत आणि जे अशा मान्यता रद्द करण्यासाठी थेट जबाबदार नाहीत, त्यांची नावे प्रतीक्षा यादीत घेतली जातील. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी किंवा उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ शिक्षण महाविद्यालयाच्या बाबतीत उपसंचालक आणि त्याची शिफारस त्यांनी नव्याने उघडलेल्या अनुदानित शाळांच्या किंवा सध्याच्या अनुदानित शाळांच्या व्यवस्थापनांना केली जाईल. विचारार्थ अतिरिक्त विभाग किंवा वर्ग उघडण्याची परवानगी.
26. पदे रद्द केल्यामुळे छाटणी - (पूर्वीचा नियम 26 नवीन नियम 26 द्वारे नॉट क्र. PST/1087/11/SE- 3-सेल, दिनांक 20.10.1987 द्वारे बदलला आहे.)
1. कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला 3 महिन्यांची नोटीस दिल्यानंतर व्यवस्थापनाकडून सेवेतून काढून टाकले जाऊ शकते. खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव, म्हणजे,
(i) वर्ग किंवा विभागांच्या संख्येत घट झाल्यामुळे स्थापनेत घट;
अतिरिक्त शिक्षक कर्मचारी नियम / 7
(ii) विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्यामुळे स्थापना
(iii) काहींच्या संख्येवर परिणाम करणारा अभ्यासक्रमातील बदल
कर्मचाऱ्यांची श्रेणी;
(iv) अभ्यासाचा अभ्यासक्रम बंद करणे;
(v) तत्सम स्वरूपाचे इतर कोणतेही प्रामाणिक कारण.
2. उप-नियम (1) अंतर्गत सेवेतून छाटणी खालील अटींच्या अधीन असेल, म्हणजे - (i) ज्येष्ठतेचे तत्त्व सामान्यतः पाळले जाईल;
(ii) प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या बाबतीत शिक्षणाधिकार्यांची किंवा उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ शिक्षण महाविद्यालयांच्या बाबतीत उपसंचालकांची पूर्वपरवानगी अशा प्रकरणांसह छाटणीच्या प्रत्येक प्रकरणात व्यवस्थापनाकडून प्राप्त केली जाईल. ज्यातून सेवाज्येष्ठतेचे तत्त्व काढून टाकण्याचे प्रस्तावित केले आहे आणि त्याची विशेष कारणे सांगून, एखाद्या कनिष्ठ सदस्याची छाटणी करणे आवश्यक असताना कर्मचार्यातील वरिष्ठ सदस्याची छाटणी करण्याचा प्रस्ताव आहे;
(iii) अनुदानित शाळांतील कर्मचारी, ज्यांच्या सेवा छाटण्याचा प्रस्ताव आहे, त्यांना प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या बाबतीत शिक्षणाधिकार्यांनी किंवा उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ शिक्षण महाविद्यालयांच्या बाबतीत उपसंचालकांनी सामावून घेतले पाहिजे. अशा कर्मचार्यांच्या सामावून घेण्याचा आदेश नोंदणीकृत पोस्ट पोचपावती देय पत्राद्वारे जारी केला जाईल आणि जोपर्यंत ते आत्मसात होत नाहीत तोपर्यंत व्यवस्थापनाला उप-नियम (1) मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही कारणामुळे छाटणी लागू करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
3. कोणत्याही कर्मचाऱ्याने उपनियम (2) च्या खंड (iii) अंतर्गत त्याला ऑफर केलेला पर्यायी रोजगार स्वीकारण्यास नकार दिल्यास. तो शोषणासाठीचा दावा गमावेल आणि शाळेच्या व्यवस्थापनाला अशा कर्मचार्याला 3 महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण झाल्यानंतर सेवांमधून काढून टाकण्याची परवानगी दिली जाईल.
4. छाटण्यात आलेल्या पदांचे पुनरुज्जीवन केले असल्यास किंवा त्याच विषयासाठी अतिरिक्त पदे निर्माण केली असल्यास, व्यवस्थापनाने, छाटणी केलेल्या आणि इतर शाळेत सामावून घेतलेल्या कर्मचाऱ्याला संबोधित केलेल्या नोंदणीकृत पोस्ट पोचपावती पत्राद्वारे, त्याला पुन्हा-ची पहिली संधी द्यावी लागेल. शाळेत सेवांमध्ये सामील होणे. यासाठी कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाशी संपर्क साधावा. साठी त्याचा पत्ता आणि उपलब्धता.
अतिरिक्त शिक्षक कर्मचारी नियम / 8
नोंदणीकृत पोस्टाने पाठवलेल्या पत्राद्वारे दरवर्षी एप्रिलपूर्वी नोकरी.
5. छाटलेल्या व्यक्तीला कदाचित इतर शाळेत सामावून घेतले गेले असेल, त्याला त्याच्या मूळ शाळेत परत जाण्याचा किंवा ज्या शाळेत तो सामावून घेतला गेला आहे तेथे चालू ठेवण्याचा पर्याय असेल.
6. जर कर्मचार्याने ज्या शाळेत त्याला सामावून घेतले आहे त्या शाळेत सुरू ठेवण्याचा पर्याय निवडल्यास, किंवा व्यवस्थापनाने त्याला पुन्हा ऑफर देण्याबाबत त्याला संबोधित केलेले पत्र मिळाल्याच्या तारखेपासून पंधरवड्याच्या आत कर्मचाऱ्याकडून कोणतेही लेखी उत्तर न मिळाल्यास -शाळेत नियुक्ती किंवा परत पाठवणे किंवा अशी ऑफर असलेले पत्र प्राप्त करण्यास त्यांनी नकार दिल्यावर, व्यवस्थापन इतर काही पात्र व्यक्ती किंवा व्यक्तींची नियुक्ती करून पद किंवा पदे भरण्यास मोकळे असेल.
7. कर्मचाऱ्याने मूळ शाळेत परत जाण्याचा निर्णय घेतल्यास, त्याला वेतन, सेवाज्येष्ठता इत्यादींमध्ये त्याच्या मूळ पदावर पुनर्संचयित केले जाईल.
8. कर्मचार्याने ज्या शाळेत तो सामावून घेतला होता आणि मधल्या काळातही त्याला त्याच्या पूर्वीच्या शाळेत पुन्हा प्रवेश घेण्याची संधी दिली गेली नसतानाही चालू ठेवण्याचा पर्याय निवडल्यास. नियम 28 च्या उप-नियम (1) अन्वये व्यवस्थापनाद्वारे त्याच्या सेवा तात्पुरत्या मानून संपुष्टात आणल्या जाणार नाहीत. गढून गेलेल्या कर्मचार्यांच्या सेवा नियम 25A अन्वये संपुष्टात आणणे आवश्यक असल्यास किंवा या नियमानुसार त्यांची छाटणी करणे आवश्यक आहे. नियम 25A अन्वये विहित केलेली प्रक्रिया किंवा या नियमात जशी स्थिती असेल ती लागू होईल. तथापि, ज्या शाळेत तो सामावून घेतो त्या शाळेत पदोन्नतीच्या हेतूने त्याची ज्येष्ठता त्याच्या प्रवेशाच्या तारखेपासून संबंधित श्रेणीमध्ये निश्चित केली जाईल.
9. जर विद्यार्थी, वर्ग किंवा विभागांची संख्या कमी झाल्यामुळे कर्मचार्याच्या प्रमाणावर किंवा त्याच्या दर्जावर परिणाम होत असेल तर, उपनियम (2) च्या खंड (iii) मधील तरतुदींनुसार स्वीकार्य शोषणाची सुविधा स्वीकार्य होणार नाही. त्याला आणि त्याला परिस्थितीनुसार खालच्या स्तरावर किंवा निम्न पदावर किंवा अर्धवेळ पदावर काम करावे लागेल. अशा कर्मचाऱ्याने अशा पदावर काम करण्याची इच्छा दर्शविल्यास, उप-नियम (२) च्या खंड (iii) मध्ये नमूद केलेले अधिकारी व्यवस्थापनाला तीन महिन्यांची नोटीस दिल्यानंतर किंवा परिस्थितीनुसार, त्याची छाटणी करण्यास परवानगी देतील. आधीच दिलेला असल्यास सूचना कालावधी पूर्ण झाल्यानंतर.
܀܀܀
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
Download
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
0 Comments