वरिष्ठ वेतनश्रेणी/निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षण 2023 नोंदणी अपडेट.

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रसिद्ध संदर्भात शिक्षण अधिकारी माध्यमिक नागपूर यांनी दिनांक 19 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या पत्रामुळे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे.

सदर पत्रात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या 2021 मधील परिपत्रकाचा संदर्भ देऊन सदर पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर यांनी निर्गमित केले आहे.

सदर परिपत्रकानुसार या अगोदर प्रशिक्षण पूर्ण झालेली आहेत. परंतु यावर्षीच्या प्रशिक्षणा संदर्भात अद्याप विद्या परिषदेने कोणत्याही सूचना निर्गमित केलेल्या नाही. फक्त एका परिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे की या आठवड्यात नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.

2023 मधील वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अद्याप कोणतीही यावर्षीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याबाबत अधिकृत असे पत्र निर्गमित केलेले नाही.

जर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परिपत्रक निर्गमित केले तर आपल्याला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून लगेच सुचित करण्यात येईल.

विद्या परिषदेच्या वेबसाईटवर नोंदणी कशी करावी याबाबत देखील आपल्या ब्लॉगवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शिक्षक बांधवांनी फोन द्वारे/मेसेज द्वारे सदर प्रशिक्षण लिंक संदर्भात चौकशी केली असल्यामुळे हा पोस्ट प्रपंच! 


शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर यांचे संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर करा.

Download


अर्थातच नियमित अपडेट मिळवण्यासाठी.. 

 गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


 

Post a Comment

0 Comments