PM-Poshan Update - प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी / मदतनीस यांना प्रशिक्षण देणेबाबत.

 महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 12 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी / मदतनीस यांना प्रशिक्षण देणेबाबत  पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांमध्ये योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी / मदतनीस यांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री घोषणशक्ती निर्माण योजनेतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना अन्न सुरक्षा में मानदे कायद्यानुसार प्रशिक्षण देण्यासाठी स्वारस्याची अभिव्यक्ती प्रक्रियेद्वारे श्री. अॅनालिटीकल टेस्टिंग अॅन्ड रिसर्च लॅब, जळगाव या संस्थेची संचालनालय स्तरावरुन निवड करण्यात आलेली आहे. योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार प्रशिक्षण देण्याकरीता उक्त संस्थेस संचालनालय स्तरावरून संदर्भ क्र. २ अन्वये कार्यादेश देण्यात आला आहे. त्यानुषंगाने आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.


१. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार प्रशिक्षण देण्यासाठी स्वारस्याची अभिव्यक्ती प्रक्रियेद्वारे श्री. अॅनालिटीकल टेस्टिंग अॅन्ड रिसर्च लॅब, जळगाव या संस्थेची निवड करुन प्रशिक्षणाचे कामकाज करण्याकरीता संचालनालय स्तरावरून करारनामा करून कान देण्यात आलेले आहे. २. स्वयंपाकी तथा मदतनीस यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रती स्वयंपाकी याकरीता निश्चित करण्यात आलेल्या दरामध्ये (प्रती स्वयंपाकी / मदतनीस करीता रु. ६०० GST) याप्रमाणे संबंधित संस्थेस निकषानुसार प्रशिक्षण व प्रशिक्षण साहित्य (पेन, नोटपॅड, माहिती पुस्तिका देणे बंधनकारक आहे. ३. प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक सुविधा याकरीता येणारा खर्च करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे. प्रशिक्षणाकरीता अल्पोपहार, प्रशिक्षण साहित्य, प्रशिक्षकांचे मानधन व प्रवास खर्च, प्रशिक्षण प्रमाणपत्र याबाबतचा खर्च संस्थेस करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सदर संस्थेस कोणत्याही स्वरुपाचे देयक / मानधन क्षेत्रिय स्तरावरून देऊ नये,


४. स्वयंपाकी / मदतनीस यांना प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी रक्कम रु. १०० याप्रमाणे उपस्थिती मानधन अनुज्ञेय करण्यात आलेले आहे. सदरचे मानधन प्रशिक्षणास उपस्थित राहिलेल्या स्वयंपाकी / मदतनीस यांना PFMS प्रणालीद्वारे जिल्हा परिषद स्तरावरुन वितरीत करण्यात यावे. उक्त बाबीकरीता सर्व जिल्ह्यांना संचालनालय स्तरावरुन अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. ५. अधीक्षक प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना) / गटशिक्षणाधिकारी यांनी संस्थेसोबत समन्वय साधुन केंद्रस्तर / बीटस्तर / तालुकास्तर / मोठवा शाळा या ठिकाणी स्वयंपाकी/ मदतनीस यांना प्रशिक्षण ६. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व अधीक्षक (प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना) / गटशिक्षणाधिकारी देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे.


यांनी संबंधित संस्थेकडून प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तीचे नाव, दुरध्वनी क्रमांक, संस्थेचे अधिकृत ओळखपत्र, इत्यादी माहिती घ्यावी.


७. जिल्ह्यामध्ये कार्यरत स्वयंपाकी/ मदतनीस याची माहिती संबंधित संस्थेरा परिशिष्ट-अ मधील नमुन्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात यावी. ८. स्वयंपाकी/ मदतनीस यांना प्रशिक्षण देण्याच्या कामकाजावर जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद तसेच तालुका स्तरावर अधीक्षक प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना/ गटशिक्षणाधिकारी, महानगरपालिका स्तरावर प्रशासन अधिकारी यांचे सनियंत्रण राहील.


९. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांना अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार (FOSTAC MDM Basic Traning) प्रशिक्षण देण्यासाठी तालुका/बीट / केंद्रस्तर/क्षेत्रिय कार्यालयाने निश्चित केलेल्या प्रशिक्षण स्थळावर प्रशिक्षित मनुष्यबळ पाठवणे संस्थेस अनिवार्य आहे.


१०. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांना क्षेत्रिय अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात यावे. त्यानुषंगाने क्षेत्रिय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद स्तरावरुन आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत. ११. जलस्वयंपाकी तथा मदतनीस यांना अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार (FOSTAD MDM Basic Traning) प्रशिक्षण दिल्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांचेकडून प्रमाणित करून त्याची प्रत संचालनालयास सादर करणे अनिवार्य राहील, १२. जिल्ह्यामधील स्वयंपाकी तथा मदतनीस यांना अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार (FOSTAC MDM Basic Traning) प्रशिक्षण दिल्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद आणि बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कामकाजाचा अहवाल शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रमाणित करून यासोबतच्या परिशिष्ट- ब नुसार संचालनालयास सादर करावा.


१३. प्रधानमंत्री ती निर्माण योजनेसंदर्भात केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशांची / नियमांची तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ ची अंमलबजावणी संस्थेने करणे अनिवार्य आहे. १४. प्रशिक्षणाच्या वेळी क्षेत्रीय अधिकारी उपस्थित असल्यास प्रशिक्षणाविषयी संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांना अवगत करून देण्याची जबाबदारी संस्थेची आहे.


१५. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार (FOSTAC MDM Basic Traning) प्रशिक्षण दिल्याबाबतचे प्रमाणपत्र स्वयंपाकी / मदतनीस यांना उपलब्ध करून देणे संस्थेस अनिवार्य आहे.


१६. योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये कार्यरत स्वयंपाकी/ मदतनीस यांना प्रशिक्षण देण्याचे कामकाज सुरु 5 होत असल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी/ शिक्षक / मुख्याध्यापक यांना माहिती आपल्या स्तरावरून देण्यात यावी, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी/ मदतनीस यांना अन्न सुरक्षा मानदे कायदा, २००६ नुसार (FOSTAC MDM Basic Traning) प्रशिक्षण देण्याची कार्यवाही संचालनालय स्तरावरुन नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेसोबत समन्वय साधुन सुरळीतपणे पार पाण्यात यावी.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.