शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024 बाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे निर्देश.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी 2024 साठी विद्यार्थ्यांची निवड करून आवेदन पत्र भरण्याची तयारी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) साठी दरवर्षी 9 ते 10 लाख विद्यार्थी प्रविष्ट होतात. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होणे, शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल वाढविणे आवश्यक आहे. विद्यार्थी निश्चित करून त्यांचे आवेदनपत्र भरणे तसेच त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे, त्यासाठी शाळांनी नियोजन करणे, तसेच वेळेत विद्यार्थ्यांची निवड व आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या मागील 5 वर्षांची सांख्यिकीय माहिती सोबत जोडली असून त्याचे अवलोकन केले असता त्यात बन्याच जिल्ह्यांमध्ये प्रविष्ठ विद्यार्थी संख्या विचारात घेता निकालाच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसून येते.


परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्याथ्यांची संख्या पाहता सन 2024 च्या परीक्षेसाठी शाळा सुरू होताच विद्याथ्यांची निवड करून आवेदनपत्र भरून घेण्याची कार्यवाही दि. 01/07/2023 पासून सुरू करण्याचे परिषदेचे नियोजन आहे. यामुळे वर्षांच्या सुरुवातीलाच विद्यार्थी निश्चित करून त्याप्रमाणे सदर परीक्षेची पूर्व तयारी करून घेता येईल. काही वेळा अर्हतेसाठी आवश्यक असणारे गुण विद्यार्थ्याने प्राप्त न झाल्यामुळे उपलब्ध संच वितरीत करता येत नाही, असे संच शिल्लक राहणे योग्य नाही.


त्या अनुषंगाने येणान्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच सर्व मुख्याध्यापकांची सभा घेऊन विद्यार्थी निवड करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन करावे व आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करण्याबाबतच्या आवश्यक सूचना आपलेस्तरावरून देण्याची कार्यवाही करावी. परिषदेच्या स्तरावरून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांची माहिती विभागीय स्तरावर सर्व अधिकान्यांची कार्यशाळा घेऊन यापूर्वीच माहे एप्रिलमध्ये देण्यात आलेल्या आहेत. याबाबत पुढील कार्यवाही व नियोजन आपले स्तरावरून करणे आवश्यक आहे. तशी कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना सादर करावा.


(डॉ. महेश पालकर) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- 01.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे 01.


(कृष्णकुमार पाटील)

शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे 01.






नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.