नवोदय विद्यालय परीक्षा 2023 अपडेट - वर्ग अकरावीच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज जुलै 2023 मध्ये होणार परीक्षा

 नवोदय विद्यालय समितीने जाणीव केलेल्या सूचनेनुसार वर्ग अकरावी मध्ये रिक्त असलेल्या जागांवर सत्र 2023-24 मधील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे. 

नवोदय विद्यालयाची सुरुवात वर्ग सहावीपासून होते त्यामुळे वर्ग सहावीत सर्वात जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्ये प्रविष्ट होतात व वर्ग सहावी साठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश पूर्व परीक्षा देऊन नवोदय विद्यालयात दाखल होतात.

वर्ग सहावी मध्ये प्रविष्ट झालेले विद्यार्थी काही कारणामुळे नवोदय विद्यालय सोडून गेल्यास त्यांच्या रिक्त जागांसाठी वर्ग नववी मध्ये प्रवेश मिळतो व त्यासाठी देखील प्रवेश परीक्षा होते.

त्यानंतर वर्ग 10 वा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी अकरावी बारावी साठी राज्याच्या बोर्डाला पसंती देतात नवोदय विद्यालय सोडून इतर प्रवेश घेतात त्यामुळे अकरावी बारावी साठी नवोदय विद्यालयात काही जागा रिक्त होतात. वर्ग अकरावीत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी नवोदय विद्यालय समिती पुन्हा वर्ग दहावी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्व परीक्षा घेते व त्यांना रिक्त जागांवर नवोदय विद्यालयात प्रवेश देते.

वर्ग अकरावी मध्ये सत्र २०२३-२४ मधील प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज आपण नवोदय विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करू शकता.

नवोदय विद्यालय वर्ग अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी होणारी प्रवेश परीक्षा ही जुलै 2023 महिन्यात घेण्यात येणार असून याबाबतच्या सविस्तर सूचना लवकरच नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी व अधिकच्या माहितीसाठी आपण पुढील नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.


https://navodaya.gov.in/nvs/en/Home1
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments