इन्कम टॅक्स अपडेट - आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर कपाती बाबतची नवीन स्लॅब की जुना स्लॅब याची पसंती अगोदरच कळवावी लागणार

 महाराष्ट्र शासनाच्या अधिदान व लेखा कार्यालय मुंबई या कार्यालयातून निर्गमित परिपत्रकानुसार आर्थिक वर्ष 2023 24 साठी आयकर कपाती बाबतची पसंती कळवण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.


सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्याला अगोदरच त्याला नवीन स्लॅब निवडायचा की जुना स्लॅब निवडायचा हे कार्यालयाला दिनांक 31 मे 2023 पर्यंत कळवावे लागणार आहे. 

त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आर्थिक वर्ष 2023 24 साठी आयकर कपाती बाबतची पसंती कळविणे बाबत दिनांक 29 मे 2023 रोजी पुढील प्रमाणे पत्रनिर्गमित केले आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन Section 11SBAC नुसार आर्थिक वर्ष 2023-24 च्या आयकर परिगणनेसाठी New Tax Regime व Old Tax Regime असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत.

त्यानुसार योग्य Tax Regime चा पर्याय निवडून लेखी स्वरुपात या कार्यासनास आपले नाव, PAN No. सहीत दि. 12 जून, 2023 पूर्वी कळविण्यात यावा, ही विनंती. जेणेकरुन आपण निवडलेल्या Tax Regime नुसार देय होणारी TDS बजाती करता येईल. तसेच जे अधिकारी / कर्मचारी Old Regime हा पर्याय स्विकारतील त्यांनी त्यांच्या संभाव्य 80C, 80D, 80CCD व 80G गुंतवणूकीची माहिती सदर पर्यायासोबत आवश्यक कागदपत्रांसह दि. 12 जून, 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.


जे अधिकारी / कर्मचारी Regime निवडीचा पर्याय विहित दिनांकापर्यंत सादर करणार नाहीत त्यांची default New Tax Regime प्रमाणे आयकर परिगणना करुन TDS कपात केली जाईल. कृपया याची नोंद घ्यावी.





आर्थिक वर्ष २०२३ २४ मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन section 115BAC नुसार आर्थिक वर्ष २०२३ २४ च्या आयकर गणनेसाठी New Tax Regime व Old Tax Regime असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत.


परिपत्रकात नवीन स्लॅब व जुना स्लॅब याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे ते पुढील प्रमाणे.




आपण निवडलेले पर्याय कृपया या कार्यालयास apaopensdat.mum-mh@gov.in या email id वर आपल्या नाव, PPO no.. Bank Branch सहीत दि. ३१ मे २०२३ पूर्वी कळविण्यात यावा, ही विनंती. जेणेकरून आपण निवडलेल्या Tax Regime नुसार देय होणारी TDS बनाती करता येईल. तसेच Old Regime साठी निवृत्तीवेतनधारक ८०C COD. ८०CCD, व ८०G खाली गुतवणूक करणार असतील त्यांनी ३१ मे २०२३ पर्यंत या कार्यालयास अवगत करावे. गुंतवणूकी संबधित कागदपत्रे ३१ Oct २०२३ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.


निवृत्तीवेतनधारक Tax Regime ची निवड वेळेत कळवणार नाहीत त्यांची New Tax Regime मध्ये TDS वजाती करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यावी.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.